बांधकाम व्यवसायाला "अच्छे दिन", सळईचे दर नरमले; घर बांधायचंय... मग आत्ताच ठेवा मागवून!
बांधकाम क्षेत्रासाठी आनंदाची बातमी आहे. कोणतेही बांधकाम असो… आलिशान घर, इमारत किंवा बंगला यांच्या बांधकामामध्ये सळई हा खूप महत्वाचा भाग असतो. तुम्ही देखील आता आपले स्वप्नातील आलिशान घर बांधण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. बिल्डिंग मटेरियल अर्थात सळईच्या दरात प्रति टनामागे तब्बल ५ ते ६ हजार रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे आता बिल्डिंग आणि घर बांधणीसाठी सळई खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बांधकाम खर्च करण्याची ही तुमच्यासाठी मोठी संधी असणार आहे.
का झालीये सळईच्या दरात घसरण?
सध्याच्या घडीला पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. ज्यामुळे बांधकाम व्यवसायाला सध्या काहीसा ब्रेक लागला आहे. मात्र, आता आगामी काळात तुम्ही एखादे मोठे बांधकाम करण्याचा विचार करत असाल, तर आत्ताच सळई खरेदी करून ठेवणे तुमच्यासाठी योग्य असणार आहे. आत्ताच सळई मागवून ठेवल्यास, तुमचा घर बांधकामावरील खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत देशभरातील सर्वच भागांमध्ये सळईचे दर सध्या मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.
हेही वाचा : 20 हजार नोकऱ्या, 20,000 कोटींची गुंतवणूक; ‘या’ जिल्ह्यात उभारला जाणार टोयोटाचा प्लांट!
देशातील प्रमुख शहरातील सळईचे दर (प्रति टनांमध्ये) – विना जीएसटी
दोन महिन्यापूर्वी सध्याचे दर
मुंबई 53,200 रुपये/टन 45,400 रुपये/टन
जालना 52,200 रुपये/टन 45,500 रुपये/टन
दिल्ली – 42,500 रुपये प्रति टन
चेन्नई 52,500 रुपये/टन 47,500 रुपये/टन
हैद्राबाद – 43,000 रुपये प्रति टन
जयपुर – 44,600 रुपये प्रति टन
कोलकाता – 42,000 रुपये प्रति टन
हेही वाचा : जीएसटीच्या मुद्द्यावरून नितीन गडकरींचे अर्थमंत्र्यांना पत्र; …म्हणाले ‘हे’ करावेच लागेल!
कुठे पाहाल तुमच्या शहरातील सळईचे दर?
तुम्हाला एखादे बांधकाम करायचे आहे. त्यासाठी तुमचा सळई खरेदी करण्याचा विचार असेल तर तुम्ही आपल्या शहरातील सळईचे भाव एका क्लिकवर पाहू शकतात. तुम्ही आपल्या शहरातील सळईचे दर Ironmart (ayronmart.com) या संकेतस्थळाला भेट देऊन तपासू शकतात. या संकेतस्थळावर दाखवण्यात आलेले सळईचे दर हे प्रति टनासाठी असून, त्यामध्ये १८ टक्के जीएसटीचा समावेश नाहीये. तो सळई खरेदी केल्यानंतर अतिरिक्त लागू असणार आहे.