Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वसामान्यांना झटका… पावसाळा संपताच सिमेंटच्या दरात वाढ, घर बांधणीचा खर्च वाढणार!

पावसाळा संपताच बांधकाम व्यवसायातील प्रमुख साधन सामग्री असलेल्या सीमेंटच्या दरातही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना घर खरेदी करणे किंवा घर बांधणे यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 04, 2024 | 07:55 PM
सर्वसामान्यांना झटका... पावसाळा संपताच सिमेंटच्या दरात वाढ, घर बांधणीचा खर्च वाढणार!

सर्वसामान्यांना झटका... पावसाळा संपताच सिमेंटच्या दरात वाढ, घर बांधणीचा खर्च वाढणार!

Follow Us
Close
Follow Us:

पावसाळा संपताच देशातील बांधकाम व्यवसायाला झळाळी मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच सळईच्या दरात प्रति टन १५०० ते २००० रुपये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता बांधकाम व्यवसायातील प्रमुख साधन सामग्री असलेल्या सीमेंटच्या दरातही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना घर खरेदी करणे किंवा घर बांधणे यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे.

तीन राज्यांमध्ये वाढल्यात सिमेंटच्या किंमती

नुकतीच यावर्षीच्या मॉन्सूनने परतीची वाट धरली आहे. ज्यामुळे बांधकाम व्यवसायाला चांगली सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. सध्या सिमेंटच्या दरात प्रति गोणी 10 ते 30 रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने ५० किलोच्या सिमेंटच्या गोणी झाली असून, त्यामुळे घर बांधण्याचा खर्च वाढत असल्याचे दिसून येत आहे. घर बांधण्यासाठी सिमेंट हा सर्वात मोठा घटक आहे. सिमेंटच्या दरात वाढ झाल्याने घर बांधण्याचा खर्च वाढण्याची परिस्थिती दरवर्षी दिसून येते. हिमाचल प्रदेशात सिमेंटच्या किमतीत वाढ झाली आहे. याशिवाय आज देशातील 3 मोठ्या राज्यांमध्ये सिमेंटच्या वाढलेल्या किमती लागू करण्यात आल्या आहेत.

हे देखील वाचा – घर बांधणे महागले! देशातील सळईंच्या किंंमतीत मोठी वाढ, सर्वसामान्यांना खिशाला आणखी झळ बसणार!

यंदा सुरुवातीला नाही वाढलेत सिमेंटचे भाव

यंदा देशात लोकसभा निवडणुका झाल्या आणि आचारसंहिता लागू झाल्यामुळे देशातील बांधकामे काही महिने बंदच होती. त्यामुळे देशात बांधकामाची कामे वेगाने होऊ शकली नाहीत. त्यामुळे देशभरातील सिमेंटच्या मागणीत घट झाली होती. याचा थेट परिणाम म्हणून सिमेंटचे घसरलेले दिसून आले. त्यामुळे या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सिमेंटच्या दरात वाढ झाल्याचा धक्का सर्वसामान्यांना जाणवला नाही. मात्र, आता सिमेंटच्या दरात पुन्हा उसळी झालेली पाहायला मिळत आहे.

शेअर बाजारातील घसरणीचा सिमेंट कंपन्यांना फटका

आज शेअर बाजारातील घसरणीचा फटका सर्व सिमेंट कंपन्यांनाही बसला असून, अंबुजा सिमेंटमध्ये सर्वाधिक 2.18 टक्क्यांची घसरण झाली आहे. एसीसी सिमेंटमध्ये 2.07 टक्के घट झाली आहे. याशिवाय शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम अनेक सिमेंट कंपन्यांवर दिसून येत आहे. आज दिवाळखोरीत निघालेल्या केवळ 4 सिमेंट कंपन्या आहेत. इंडिया सिमेंट्स, जेके लक्ष्मी सिमेंट्स, सागर सिमेंट्स आणि उदयपूर सिमेंट्स अशी त्यांची नावे आहेत.

Web Title: A shock to the common people monsoon ends the price of cement will increase building a house cost will increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 07:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.