गौतम अदानींनी एका... दिवसात 4251 कोटी कमावले, वाचा... कशी झाली इतकी मोठी कमाई!
अदानी समूहाची मालकी असलेल्या अदानी कुटुंबाने शुक्रवारी (ता.२३) ४,२५१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अंबुजा सिमेंटचे शेअर्स विकून, समुहाला हे पैसे मिळाले आहे. आता अदानी समुह मिळालेले हे पैसे आपल्या समूहातील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणार आहे. या विक्रीद्वारे अदानी समुह 125 अब्ज किमतीच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करत आहे. यामध्ये जीक्यूजी पार्टनर्स, नॅशनल पेंशन सिस्टम ट्रस्ट आणि एसबीआय लाईफ इंश्योरन्स या कंपन्यांनी अदानी समुहाचे शेअर्स विकत घेतले आहे.
शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर
स्टॉक एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, जीक्यूजी पार्टनर्सने अंबुजा सिमेंटमध्ये सर्वाधिक 1679 कोटी रुपयांची हिस्सेदारी खरेदी केली आहे. नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्टने 525 कोटी रुपयांची हिस्सेदारी घेतली आहे. तर एसबीआय लाइफ इन्शुरन्सने सुमारे 500 कोटी रुपयांची हिस्सेदारी घेतली आहे. सध्याच्या घडीला अदानी समुह आपल्या कंपन्यांमधील भागीदारी कमी करत आहे. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स सध्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहेत.
हेही वाचा – गौतम अदानी बांगलादेशला अंधारात ठेवणार, वीजपुरवठा थांबवणार? पाहा… काय आहे नेमकं कारण
इतर कंपन्यांमधील हिस्सेदारीही विक्री करणार?
दरम्यान, अदानी समूहाची पुढील दशकभरात पायाभूत सुविधा क्षेत्रात 100 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याची योजना आहे. यातून ते चालू आर्थिक वर्षात 15 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार, अनेक गुंतवणूकदार खरेदीसाठी पुढे येत आहे. अशा स्थितीत अदानी समुहाकडून भविष्यातही इतर कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी विकणे सुरू ठेवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंबुजा सिमेंटचा शेअर शुक्रवारी (ता.२३) ६३३ रुपयांवर बंद झाला आहे. त्यामुळे ही सकारात्मक बाब मानली जात आहे.
अंबुजा सिमेंटमध्ये ६७.३ टक्के इतका
अंबुजा सिमेंटमधील शेअर्सच्या विक्रीनंतर, अदानी कुटुंबाकडे आता अंबुजा सिमेंटमध्ये ६७.३ टक्के इतका हिस्सा आहे. अदानी समूहाने मे 2022 मध्ये स्विस फर्म होल्सिमकडून ही कंपनी खरेदी केली होती. इतकेच नाही तर येत्या काळात अदानी समुहाकडून अदानी पॉवरमधील आपला हिस्सा 3 टक्क्यांनी कमी केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, ही विक्री कधी होणार? याबाबत माहिती समोर आलेली नाही.