अदानी समूहाकडून साम्राजाचा विस्तार; 8100 कोटींमध्ये ओरिएंट सिमेंट कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा!
देशभरातील सिमेंट उद्योगातील आदित्य बिर्ला समूहाचा वरचष्मा काही लपून राहिलेला नाही. आदित्य बिर्ला समूहाची सिमेंट कंपनी अल्ट्राटेक सिमेंट आणि अदानी समूहाच्या सिमेंट कंपन्यांमध्ये नेहमीच वर्चस्वाची स्पर्धा पाहायला मिळते. अल्ट्राटेक सिमेंटने इंडिया सिमेंटमधील हिस्सा खरेदी केल्यानंतर आता अदानी समूहाची पाळी आहे. अदानी समूह जर्मन कंपनी हायडेलबर्ग मटेरिअल्सच्या भारतातील सिमेंट कंपन्यांची खरेदी करू शकतो. यासाठी अदानी समूहाने जर्मन कंपनीशी बोलणी सुरू केली आहे.
बाजारातील हिस्सा वाढवण्यासाठी कंपन्या खरेदीत व्यस्त
एका नामांकित इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, अदानी समूहाची सिमेंट कंपनी अंबुजा सिमेंट भारतातील हेडलबर्ग मटेरियल्सच्या सिमेंट कंपन्यांना 1.2 अब्ज डॉलर किंवा 10,000 कोटी रुपयांना खरेदी करू शकते. अदानी समूह आणि अल्ट्राटेक सिमेंट त्यांचा बाजारातील हिस्सा वाढवण्यासाठी सिमेंट कंपन्यांच्या खरेदीत व्यस्त आहेत. हेडलबर्ग ही जगातील सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी भारतात देखील आहे.
हे देखील वाचा – आता संपूर्ण जग पिणार अमुलचे दूध; अमेरिकेनंतर युरोपीय बाजारात उतरणार ब्रॅंड!
हेडलबर्ग सिमेंटचा शेअर 258 रुपयांवर
अदानी समूहाने हेडलबर्ग सिमेंट कंपन्यांची खरेदी केल्याची बातमी समोर आल्यानंतर, हेडलबर्ग सिमेंटचा शेअर 258 रुपयांवर पोहोचला आहे. जो याआधी 218 रुपयांवर बंद झालेल्या किमतीपेक्षा 18.34 टक्क्यांनी अधिक वाढला आहे. दरम्यान, गेल्या काही काळात हा शेअरवरील स्तरावरून खाली घसरला होता. जो 233.64 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर अंबुजा सिमेंटचे शेअर्स 3.50 टक्क्यांच्या घसरणीसह 589.50 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
26 टक्के स्टेकसाठी खुली ऑफर
अदानी समूहाने 2022 मध्ये होल्सिंग ग्रुपकडून 6.4 बिलियन डॉलरमध्ये अंबुजा सिमेंट आणि एसीसी खरेदी करून सिमेंट क्षेत्रात प्रवेश केला होता. यानंतर अदानी समूहाने संघी सिमेंट ५१८५ कोटी रुपयांना आणि पेन्ना सिमेंट १०४२२ कोटी रुपयांना विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. तर अल्ट्राटेक सिमेंटने इंडिया सिमेंटमधील 32.72 टक्के भागभांडवल खरेदी केले आहे. विशेष म्हणजे 26 टक्के स्टेकसाठी खुली ऑफरही आणली आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)