Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरगुती गॅस पुरवठ्याचे स्वरूप बदलणार, यापुढे असा मिळणार ग्राहकांना गॅस; अदानींनी सुरु केलाय मोठा कार्यक्रम!

अदानी टोटल गॅस लिमिटेडने अहमदाबादच्या शांतीग्राममध्ये पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवठ्यामध्ये 2.2-2.3 टक्के ग्रीन हायड्रोजन मिसळण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने लिंक्डइनवर ही माहिती दिली आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेड हा अदानी समूह आणि फ्रेंच ऊर्जा कंपनी टोटल एनर्जीज यांचा संयुक्त उपक्रम आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 07, 2024 | 09:40 PM
घरगुती गॅस पुरवठ्याचे स्वरूप बदलणार, यापुढे असा मिळणार ग्राहकांना गॅस; अदानींनी सुरु केलाय मोठा कार्यक्रम!

घरगुती गॅस पुरवठ्याचे स्वरूप बदलणार, यापुढे असा मिळणार ग्राहकांना गॅस; अदानींनी सुरु केलाय मोठा कार्यक्रम!

Follow Us
Close
Follow Us:

गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने भारतातील सर्वात मोठा हायड्रोजन मिश्रण कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम नैसर्गिक वायूमध्ये हायड्रोजन मिसळण्याचा आहे. समूहाने त्याची सुरुवात अहमदाबादपासून केली आहे. याअंतर्गत, कंपनीने घरांना स्वयंपाकासाठी पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूमध्ये ग्रीन हायड्रोजन मिसळण्यास सुरुवात केली आहे. उत्सर्जन कमी करणे आणि निव्वळ शून्य लक्ष्य गाठणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

अदानी टोटल गॅस लिमिटेडने सांगितले की, आम्हाला अदानी शांतीग्राम, अहमदाबाद येथे आमची हायड्रोजन ब्लेंडिंग सिस्टीम आणि इन-सीटू हायड्रोजन जनरेशन यशस्वीरित्या सुरू झाल्याची घोषणा करताना आनंद होत आहे.’ कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प 4,000 घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना अखंडित हायड्रोजन-मिश्रित नैसर्गिक वायू प्रदान करणार आहे.

सध्या सरकारी वीज कंपनी एनटीपीसी गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील कावास येथील घरांना ग्रीन हायड्रोजन मिश्रित नैसर्गिक वायू पुरवते. सरकारी गॅस कंपनी गेल (इंडिया) लिमिटेड मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये सीएनजी पुरवठ्यासाठी एक छोटा पथदर्शी प्रकल्पही चालवत आहे. त्यात ग्रे हायड्रोजनची भर पडली आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेडचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प आहे.

हे देखील वाचा – …ना आयआयटी, …ना आयआयएममधून शिक्षण; साध्या कॉलेजच्या ‘या’ इंजिनिअरला गुगलकडून 1.64 कोटींची ऑफर!

कंपनी हळूहळू नैसर्गिक वायूमध्ये ग्रीन हायड्रोजनचे मिश्रण 5 टक्के आणि नंतर 8 टक्के करेल. तसेच ते शांतीग्रामच्या पलीकडे अहमदाबादच्या इतर भागांमध्ये आणि नंतर शहर गॅस परवाना असलेल्या सर्व भागांमध्ये पुरवठा विस्तारित करेल. अदानी टोटल गॅस लिमिटेडने सांगितले की, हे यश आमच्या कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या आणि स्वच्छ ऊर्जा सोल्यूशन्समध्ये संक्रमण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, नैसर्गिक वायूमध्ये हायड्रोजन मिसळल्याने हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी केले जात आहे. याद्वारे ते ऊर्जा सुरक्षा वाढवत आहे. एटीजीएलचे सीईओ सुरेश पी मंगलानी म्हणाले की, कंपनीचा हा उपक्रम भारताच्या ऊर्जा क्षेत्राला डिकार्बोनाइज करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ग्रीन हायड्रोजनमध्ये शून्य कार्बन उत्सर्जन होते. भविष्यातील इंधन म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. चाचण्यांमध्ये असे दिसून आले आहे की पाइपलाइन किंवा उपकरणांवर कोणताही परिणाम न होता नैसर्गिक वायूमध्ये 10 टक्के हायड्रोजन जोडले जाऊ शकते.

अदानी टोटल गॅस लिमिटेड सध्या 2.2-2.3 टक्के मिसळत आहे. हळूहळू ते 5 टक्के आणि शेवटी 8 टक्के केले जाईल. सध्या नियामकांनी ठरवलेली ही मर्यादा आहे. पाईपलाईन आणि उपकरणांच्या मटेरियल ग्रेड आणि भिंतीच्या जाडीमध्ये फरक असल्यास 30 टक्के पर्यंत मिक्स करणे शक्य आहे. हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जागतिक ऊर्जा संक्रमणामध्ये हायड्रोजन महत्त्वपूर्ण आहे. हायड्रोजन जीवाश्म इंधन आणि बायोमास, पाणी किंवा दोन्हीच्या मिश्रणातून काढला जाऊ शकतो. मात्र, उत्पादनाचा उच्च खर्च एक आव्हान आहे.

Web Title: Adani group started program to blend green hydrogen with natural gas supplied through pipeline

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 08:17 PM

Topics:  

  • Adani Group

संबंधित बातम्या

Aamby Valley, बुडत्याला ‘Adani’ चा सहारा, एकत्र 88 जागांची करणार खरेदी
1

Aamby Valley, बुडत्याला ‘Adani’ चा सहारा, एकत्र 88 जागांची करणार खरेदी

Sanghi Industries Share: ७० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ स्वस्त अदानी शेअरला प्रचंड मागणी, तुमच्याकडे आहे का?
2

Sanghi Industries Share: ७० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ स्वस्त अदानी शेअरला प्रचंड मागणी, तुमच्याकडे आहे का?

हिंडेनबर्ग रिसर्च प्रकरणात SEBI कडून अदानी ग्रुपला क्लीन चिट, ‘या’ 9 शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता
3

हिंडेनबर्ग रिसर्च प्रकरणात SEBI कडून अदानी ग्रुपला क्लीन चिट, ‘या’ 9 शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता

Adani Power वर मोहन यादव सरकारने दाखवला विश्वास, रू 21,000 कोटीचे दिले कंत्राट
4

Adani Power वर मोहन यादव सरकारने दाखवला विश्वास, रू 21,000 कोटीचे दिले कंत्राट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.