...ना आयआयटी, ...ना आयआयएममधून शिक्षण; साध्या कॉलेजच्या 'या' इंजिनिअरला गुगलकडून 1.64 कोटींची ऑफर!
बेंगळुरू येथील एका टेक इंजिनिअरला गुगलकडून 1.64 कोटी रुपयांच्या नोकरीची ऑफर मिळाली आहे. ही व्यक्ती आयआयटी किंवा आयआयएम सारख्या कोणत्याही नामांकित संस्थेतून पासआउट झालेली नाही किंवा त्याच्याकडे कोणतीही भारीभरकम पदवी नाही. त्याच्याकडे केवळ 10 वर्षांचा अनुभव आहे. यानंतर इंटरनेटवर याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. काही लोक 10 वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तीसाठी हा पगार खूप जास्त असल्याचे म्हणत आहे. तर काहीजण याला कमी पगार असल्याचे म्हणत आहे.
जेपी मॉर्गन डेव्हलपर कार्तिक जोलापारा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्या व्यक्तीच्या ऑफर लेटरचा स्क्रीनशॉट शेअर केल्यावर ही बाब समोर आली आहे. हा माणूस अज्ञात टियर 3 प्रकारातील कॉलेजचा विद्यार्थी आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडे संगणकशास्त्राची कोणतीही पदवी नाही. त्यामुळे ‘क्रेझी ऑफर्स’ या मथळ्यासह तंत्रज्ञान क्षेत्रात याबाबत सध्या चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.
(फोटो सौजन्य – istock)
पॅकेजमध्ये काय आहे समाविष्ट?
गुगलने वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता पदासाठी 1.64 कोटी रुपयांचे पॅकेज ऑफर केले आहे. यामध्ये वार्षिक मूळ वेतन 65 लाख रुपये, वार्षिक बोनस 9 लाख रुपये, 19 लाख रुपये स्वाक्षरी बोनस आणि 5 लाख रुपये पुनर्स्थापना बोनस समाविष्ट आहेत. अशा प्रकारे वर्षाचा एकूण पगार 1.64 कोटी रुपये होतो.
what 10YOE can get you 😛
– crazy offers pic.twitter.com/1RVG5QRo8N— Kartik Jolapara (@codingmickey) September 28, 2024
कार्तिकने याबाबत आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ’10 वर्षांच्या अनुभवानंतर तुम्हाला काय मिळेल? संगणक विज्ञान पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीसाठी ही ऑफर किती महत्त्वाची आहे, यावर त्यांनी भर दिला. तथापि, अनेक लोक ही ऑफर टियर 3 कॉलेज ग्रॅज्युएटसाठी योग्य मानतील. मात्र, इंटरनेटवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी पारंपारिक शहाणपणाचा भंग केल्याबद्दल उमेदवाराचे कौतुक केले. तर इतरांना असे वाटले की उद्योग मानके लक्षात घेता पॅकेज जास्तीचे असल्याचे म्हटले आहे.
एका यूजरने लिहिले आहे की, ‘टीयर 3 कॉलेज ग्रॅज्युएट, ज्याच्याकडे सीएस डिग्री नाही. त्याला ही नोकरी कशी मिळाली? कौतुक करण्यासारखे आहे!’
अन्य एका युजरने लिहिले आहे की, ‘मी समान अनुभव असलेल्या लोकांना अधिक कमावताना पाहिले आहे. काही वापरकर्त्यांना वाटले की, ही ऑफर गुगलसारख्या मोठ्या कंपनीसाठी खूप कमी आहे. एकाने उत्तर दिले आहे की, ‘मला 10 वर्षांच्या अनुभवासाठी अधिक अपेक्षा होती. तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये हे पॅकेज असामान्य नाही.