गौतम अडानीला कोणता चेक आणि का मिळणार (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
देशातील तिसरे सर्वात मोठे औद्योगिक घराणे असलेल्या अदानी समूहाने अदानी विल्मारमधील आपला हिस्सा विकण्याची घोषणा केली आहे. यातून समूहाला सुमारे 2 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1,71,39,85,00,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. हिंदू बिझनेसलाइनने दिलेल्या वृत्तानुसार, अदानी समूह आपल्या तीन प्रकल्पांमध्ये ही रक्कम गुंतवेल. यामध्ये विमानतळ, ग्रीन हायड्रोजन आणि नवीन प्रकल्प यांचा समावेश आहे.
यातील मोठा हिस्सा विमानतळ व्यवसायात गुंतवला जाऊ शकतो असेही या वृत्तातून सांगण्यात आले आहे. समूहाने रिफायनरी, पेट्रोकेमिकल आणि केमिकल व्यवसायात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी थाई कंपनी इंडोरामासोबत संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे (फोटो सौजन्य – iStock)
सुत्रांकडून मिळाली माहिती
अहवालात सूत्रांच्या हवाल्याने विल्मारमधील भागभांडवल विक्रीतून मिळालेल्या रकमेपैकी $1 ते 1.2 अब्ज डॉलर्स विमानतळावर गुंतवले जातील. त्याचप्रमाणे ग्रीन हायड्रोजन व्यवसायात 300 दशलक्ष ते 500 दशलक्ष डॉलर्स खर्च केले जातील. उर्वरित रक्कम अदानी एंटरप्रायझेस अंतर्गत डिजिटलसारख्या नवीन उपक्रमांवर खर्च केली जाईल. गेल्या आठवड्यात, समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने एमएफसीजी कंपनी अदानी विल्मारमधून बाहेर पडण्याबद्दल याआधीच सांगितले होते. या कंपनीत अदानी समूहाचा 44 टक्के हिस्सा आहे. सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार, त्याचे मूल्य सुमारे $2 अब्ज असेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे, जी अत्यंत मोठी रक्कम असल्याचेही दिसून येत आहे आणि इतकी मोठी रक्कम ही नक्कीच गुंतवणुकीसाठी मोठी मानली जाते
Share Market Crash: HMPV ची दहशत, शेअर बाजार झाला क्रॅश; 800000 कोटींचे नुकसान
काय आहे अडानी समूहाची योजना
अदानी समुहाचे म्हणणे आहे की ते आपल्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करू इच्छित आहेत आणि नॉन-कोअर व्यवसायातून बाहेर पडू इच्छित आहेत. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स अनेक विमानतळ अपग्रेड करत आहे. नवी मुंबई विमानतळही यावर्षी सुरू होण्याची शक्यता आहे, जे अदानी समूहाद्वारे तयार करण्यात आले आहे.
विमानतळांच्या विस्तारासाठी काही निधी राखून ठेवण्यात आला आहे तर काही रक्कम नवीन विमानतळ ताब्यात घेण्यासाठी गुंतवण्यात येणार आहे. अदानी न्यू इंडस्ट्रीज ग्रीन हायड्रोजनमध्ये गुंतवणूक करत आहे. 2027 पर्यंत 1 दशलक्ष टन वार्षिक क्षमता गाठण्याचे त्याचे लक्ष्य आहे असे सध्या समोर येत आहे.
अब्जावधींची गुंतवणूक
विल्मारमधील गुंतवणुकीचा पैसा अशा पद्धतीने अदानी समूह फिरवणार असल्याचे आता या वृत्तातून समोर आले आहे. तर सध्या अडानीच्या नावावर अनेकदा राजकारण करत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे या पैशांचा उपयोग कशा पद्धतीने केला जाणार आहे हेदेखील आता समोर आले आहे. ही गुंतवणूक अदानी समूहाच्या भविष्यासाठी नक्कीच चांगली तरतूद ठरू शकते असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे. अदानींची ही योजना यशस्वी होण्यासाठी पुढे कोणती गुंतवणूक करण्यात येईल आणि कशा पद्धतीने याबाबत निर्णय घेतले जातील याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.