Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel Recharge : एयरटेल ग्राहकांना मोठा धक्का! प्लॅन्सच्या किमतीत थेट वाढ; 299 चा प्लॅन आता ‘इतका’ महागला

Airtel Recharge : टेलिकॉम दिग्गज कंपनी एयरटेलनेआपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा धक्का देत मोबाईल रिचार्जच्या दरांमध्ये १६ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. या दरवाढीमुळे कंपनीचा अत्यंत लोकप्रिय असलेला ₹२९९ चा प्लॅन महागला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 12, 2026 | 06:18 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • एयरटेल ग्राहकांना मोठा धक्का!
  • प्लॅन्सच्या किमतीत थेट वाढ
  • 299 चा प्लॅन आता ‘इतका’ महागला
Airtel Recharge : जर तुम्ही एयरटेल ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण या बातमीने तुमच्या खिशावरील भार वाढणार आहे. भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे आता एअरटेलने ( Airtel Recharge ) आपल्या २९९ रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत थेट वाढवला आहे. त्यामुळे सामान्यांना परवडणारं रिचार्ज बरंच महागलं आहे. विविध रिचार्ज प्लॅन्सच्या किमती ५% ते १६% ने वाढवण्यात आल्या आहेत. मात्र, या संदर्भात कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. पण नेमकी किती वाढ झाली आहे. पूर्वी हे प्लॅन कसे होते आणि आता ते कितीपर्यंत वाढले आहेत?

Jaya Hind Industries : जय हिंद इंडस्ट्रीजची मोठी घोषणा! पुढील 2 वर्षांत 600 कोटींची गुंतवणूक; उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्लॅन?

भारती एअरटेलने देशभरातील अनेक लोकप्रिय प्लॅन्स बंद केले आहेत. यामध्ये २९९ रुपये, ५५९ रुपये, ६१९ रुपये आणि ६४९ रुपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे. हे प्लॅन्स आता कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिसत नाहीत.

२९९ रुपयांचा रिचार्ज आता ३४९ रुपयांमध्ये

कंपनीने आपले सर्वात लोकप्रिय एंट्री-लेव्हल अनलिमिटेड प्लॅन्स बंद करण्यास, मिड-रेंज पॅक्सची वैधता कमी करण्यास आणि दैनंदिन डेटा कनेक्शन चालू ठेवण्यासाठी लागणारा एकूण खर्च वाढवण्यास सुरुवात केली आहे. या छुप्या बदलांमुळे, भारतातील लाखो प्रीपेड वापरकर्त्यांसाठी किमान मासिक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

सुरुवातीच्या किमतीत इतकी वाढ

अधिकृत वेबसाइट आणि ॲपवरून ₹299 चा प्लॅन म्हणजे ज्यामध्ये 28 दिवसांचा समावेश होता आणि दररोज 1GB–1.5GB डेटा मिळत होता. तो प्लॅन काढून टाकल्यानंतर, आता ₹349 चा पॅक दैनंदिन डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसाठी सर्वात स्वस्त पर्याय बनला आहे, ज्यामुळे सुरुवातीच्या किमतीत ₹50 ची वाढ करण्यात आली आहे.

रिचार्ज जुनी किंमत  नवीन किंमत
बेस 1.5GB/दिवस (28 दिवस ) ₹299  बंद
सर्वात स्वस्त अनलिमिटेड पॅक ₹299 ₹349
56-दिवसांचा डेली डेटा पॅक ₹579 ₹619
84-दिवसांचा लाँग-टर्म पॅक ₹859 ₹899
84-दिवसांचा मिड-टियर पॅक ₹799 बंद

56 आणि 84-दिवसांचे रिचार्ज किती महागले?

५६ दिवसांच्या वैधतेच्या डेली डेटा पॅकची किंमत, जी पूर्वी ₹५७९ होती, ती आता ₹६१९ झाली आहे.
८४ दिवसांच्या वैधतेच्या लॉंग-टर्म डेली डेटा बंडलची किंमत ₹८५९ वरून ₹८९९ पर्यंत वाढवण्यात आली आहे. काही विशिष्ट भागांमध्ये, या दरवाढीसोबत बोनस लाभांमध्ये किंवा एकूण डेटा मर्यादा कमी करण्यात आली आहे.

Sony Pictures Network : सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाची भव्य फेस्टिव्ह स्लेट सादर! भेटीला येत आहेत तुमचे आवडते दिग्गज कलाकार

Web Title: Airtel recharge hikes tariffs by up to 16 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • airtel
  • Airtel Data Plan
  • Airtel news
  • Business News
  • Marathi News
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Chandrapur News: हिरवाईने नटलेला ताडोबा पुन्हा गजबजणार! जंगल सफारी १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू;  बुकिंगला जोरदार प्रतिसाद
1

Chandrapur News: हिरवाईने नटलेला ताडोबा पुन्हा गजबजणार! जंगल सफारी १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू; बुकिंगला जोरदार प्रतिसाद

Nagpur News : देशातील पहिले दंतचिकित्सा केंद्र नागपुरात
2

Nagpur News : देशातील पहिले दंतचिकित्सा केंद्र नागपुरात

Raigad News: रस्ता पूर्ण होण्याआधीच महावितरणचे खोदकाम सुरु; महामार्ग विभागाने दिले काम थांबवण्याचे आदेश
3

Raigad News: रस्ता पूर्ण होण्याआधीच महावितरणचे खोदकाम सुरु; महामार्ग विभागाने दिले काम थांबवण्याचे आदेश

KARJAT: कर्जतच्या प्रकल्पांवरून आमदार थोरवेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल; गंभीर आरोप
4

KARJAT: कर्जतच्या प्रकल्पांवरून आमदार थोरवेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल; गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.