एआयएक्स कनेक्ट-एअर इंडिया एक्सप्रेसच्या विलीनीकरणास मंजुरी, टाटा समूहाचे साम्राज्य विस्तारणार!
केंद्रिय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) आज एआयएक्स कनेक्टचे एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. या विमान वाहतूक कंपन्या टाटा समूहाचा एक भाग आहेत. दरम्यान, आता भविष्यात एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणाचा मार्ग देखील खुला होणार आहे. ज्यासाठी काही प्रस्तावावर आधारित प्रक्रिया सुरू आहे. 1 ऑक्टोबर 2024 पासून, एआयएक्स कनेक्टची सर्व विमाने एआयएक्सच्या एअर ऑपरेटर प्रमाणपत्र (एओसी) मध्ये हस्तांतरित करण्यात आली आहे.
हे देखील वाचा – ‘हा’ शेअर सलग पाचव्या दिवशी अप्पर सर्किटवर; 5 वर्षात दिला 38 हजार टक्के परतावा!
टाटा समूहासाठी मोठी बातमी
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयात एआयएक्स कनेक्टचे एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये विलीनीकरणासाठी अनेक दिवसांपासून हालचाली सुरू होत्या आणि आज त्याला मंजुरी मिळाल्याने टाटा समूहाचे विमान वाहतूक क्षेत्रातील साम्राज्य आणखी मोठे होणार आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
विलीनीकरणानंतर एक एकीकृत ब्रँड तयार होणार
23 जुलै रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) मोठ्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा केला होता. अशाप्रकारे, एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये एआयएक्स कनेक्टचे विलीनीकरण पूर्ण झाले आहे. या विलीनीकरणानंतर एक एकीकृत ब्रँड तयार होणार आहे. अनेक महिने ही प्रक्रिया सुरू होती. या एकीकरण प्रक्रियेअंतर्गत अनेक प्रकारचे विलीनीकरण करण्यात आले. यामध्ये दोन्ही कंपन्यांचे प्रामुख्याने मानवी संसाधनांसाठी म्हणजेच एचआर आणि फ्लाइट नेटवर्क ऑपरेशन्ससाठी सहकार्य होते. एव्हिएशन रेग्युलेटर डीजीसीएने मंगळवारी अधिकृतरित्या सांगितले आहे की, एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये एआयएक्स कनेक्टचे विलीनीकरण पूर्ण झाले आहे.
हे देखील वाचा – केवळ 99 रुपयांत मिळणार ब्रँडेड दारु, या राज्य सरकारकडून नवीन एक्साईज पॉलिसी लागू!
काय म्हटलंय डीजीसीएने आपल्या प्रसिद्धीपत्रकात
डीजीसीएने आपल्या प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली आहे की, या विलीनीकरणानंतर कंपनीच्या हवाई प्रवाशांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. यासाठी सुरळीत पावले उचलली जात आहेत. या जॉइंट युनिट एअरलाइनमधील फ्लाइट ऑपरेशन्स कोणत्याही अडचणीशिवाय सुरू राहतील. प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी विमान प्रवास मिळावा, यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. असेही नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हटले आहे.