
भारतातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रात उद्यम पोर्टलवर नोंदणीकृत ९.४ कोटींपेक्षा जास्त उद्योगांचा समावेश आहे, जे देशाच्या सकल अंतर्गत उत्पादनात (जीडीपी) ३०% पेक्षा जास्त योगदान देतात. तरीही, अनेक छोट्या व्यवसायिकांना त्यांच्या व्यावसायिक गरजांनुसार विशेष तयार केलेल्या औपचारिक क्रेडिट उत्पादनांची सुविधा उपलब्ध नाही. उद्योजक जसजसे डिजिटल खरेदी, जीएसटी-सुसंगत नोंदणी आणि संरचनात्मक आर्थिक प्रक्रियांचा अवलंब करत आहेत, तसतशी त्यांचा खर्च, रोख प्रवाह आणि व्यावसायिक कामकाज अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करणाऱ्या उपायांची मागणी वाढत आहे.
Amazon मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! सणासुदीच्या काळात 160000 हून अधिक जागांची भर्ती, मिळणार विशेष लाभ
अॅमेझॉन पे इंडियाचे संचालक (क्रेडिट अँड लेंडिंग) मयंक जैन म्हणाले, “अॅमेझॉन पेने लाखो भारतीय ग्राहकांसाठी क्रेडिट सुविधा सुलभ केली आहे. आता आम्ही छोट्या व्यवसायिकांसाठीही तेच करत आहोत. अॅमेझॉन पे कोटक बिझनेस क्रेडिट कार्ड ही सुविधा अॅमेझॉन बिझनेसच्या ७०% ग्राहक वर्ग असलेल्या एकल व्यावसायिक आणि लहान व्यवसायिकांपर्यंत पोहोचवते. या लहान व्यवसायिकांच्या गरजा—अॅमेझॉन बिझनेसवरील खरेदीवर पारदर्शक रिवॉर्ड्स आणि क्रेडिटची उपलब्धता—लक्षात घेऊनच आम्ही हे कार्ड तयार केले आहे. कोटक महिंद्रा बँकेसोबत भागीदारी करून, आम्ही अॅमेझॉनची लाखो व्यवसायांपर्यंत असलेली पोहोच आणि कोटकचे एसएमई कर्जांमधील कौशल्य एकत्र आणत आहोत, जेणेकरून देशभरातील उद्योजकांसाठी एक उत्तम आर्थिक पर्याय निर्माण करता येईल.”
कोटक महिंद्रा बँकेचे क्रेडिट कार्ड्स विभाग प्रमुख फ्रेडरिक डिसोझा म्हणाले, “लहान व्यवसाय हे भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आहेत. मर्यादित संसाधने आणि कर्मचार्यांच्या बळावरही ते प्रत्येक शहरात वस्तूंचा पुरवठा करतात, रोजगार निर्मिती करतात आणि व्यापार सुरू ठेवतात. त्यांची उद्योजकता खरोखरच कौतुकास्पद आहे आणि या आत्मविश्वासाला योग्य साधनांची जोड मिळणे आवश्यक आहे. हे कार्ड या व्यवसायांच्या वास्तविक कामकाजाच्या पद्धतीनुसार लाभ प्रदान करेल;
ज्यामध्ये रोख प्रवाह सुलभ करणारा व्याजमुक्त क्रेडिट कालावधी, मोठ्या खरेदीसाठी नो-कॉस्ट ईएमआय, आणि व्यवसायाच्या वाढीसाठी आधीच होत असलेल्या खर्चावर कॅशबॅकचा समावेश आहे. अॅमेझॉन पेच्या माध्यमातून, आम्ही ते आधीच विश्वास ठेवतात अशा प्लॅटफॉर्मवरून देशभरातील व्यवसायांपर्यंत ही सुविधा पोहोचवू शकत आहोत.”