(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
नेहमीचे पनीर दुधापासून बनलेलं असतं. त्यात दुधातील प्रथिने, चरबी आणि कॅल्शियम यांसारखी पोषक तत्वे असतात. याउलट, अॅनालॉग पनीरमध्ये वनस्पती प्रथिने आणि स्टार्चचा वापर केला जातो. अशा स्वरुपाचं पनीर मार्केटमध्ये विकण्यासाठी आणलं जातं. त्यात नेहमीच्या पनीरमध्ये असलेले कोणतेही पोषक घटक नसतात. अशा स्वरुपाचं पनीर विकण्याची परवानीग नाही. त्यामुळे पॅकेज केलेले पदार्थ खरेदी करताना, नेहमी पाठीमागील घटक आणि पोषणविषयक माहिती वाचावी.
कर्नाटक अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागांतर्गत १७ ऑगस्ट २०२६ रोजी एक अधिसूचना जारी केली आहे. ज्यात अॅनालॉग किंवा नॉन-डेअरी पनीरसह बऱ्याच इतर घटकांचा समावेश आहे.
तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवत असाल आणि तुमच्या जेवणात असलेलं पनीर खरं आहे की नाही याची ओळख तुम्ही कशी कराल? हा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा त्याचं उत्तर हेच आहे की उघड्या डोळ्यांनी ते खरे चीज आहे की बनावट, हे तुम्ही ओळखू शकत नाही. त्यामुळे, सामान्य माणूस काहीही करू शकत नाही; अन्न विभागाने या दिशेने ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे.






