Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आनंद महिंद्रांचे भडकलेल्या ग्राहकाला उत्तर, 1991 पासून सांगितली स्टोरी, वाचा… सविस्तर!

सुशांत मेहता नावाच्या व्यक्तीने महिंद्रा कारवर आणि कंपनीच्या सेवेवर संतापून ‘एक्स’वर एक पोस्ट केली होती. यावर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी उत्तर दिले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 04, 2024 | 09:05 PM
आनंद महिंद्रांचे भडकलेल्या ग्राहकाला उत्तर, 1991 पासून सांगितली स्टोरी, वाचा... सविस्तर!

आनंद महिंद्रांचे भडकलेल्या ग्राहकाला उत्तर, 1991 पासून सांगितली स्टोरी, वाचा... सविस्तर!

Follow Us
Close
Follow Us:

सुशांत मेहता नावाच्या व्यक्तीने महिंद्रा कारवर आणि कंपनीच्या सेवेवर संतापून ‘एक्स’वर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, ‘आपण आपल्या कार, सर्व्हिस सेंटर, स्पेअर पार्ट्सच्या समस्या आणि कर्मचाऱ्यांचे वर्तन दुरुस्त केले तर बरे होईल.’ यावर कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी उत्तर दिले आहे.

एखाद्या कारचे डिझाईन किंवा त्या कंपनीची सर्व्हिस न आवडणे आणि यावरुन ग्राहकांच्या तक्रारी येणे, ही गोष्ट खूप सामान्य आहे. अशा वेळी लोकांचा भडका उडणेही अगदी स्वाभाविक आहे. नुकतेच एका व्यक्तीने कंपनीच्या कारडिझाइन, सर्व्हिस, क्वालिटी आणि विश्वासार्हतेवर निशाणा साधत टीकात्मक ट्विट केले तेव्हा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महिंद्राने आपली नवीन इलेक्ट्रिक वाहन रेंज BE6e आणि XEV 9e लॉन्च केल्यानंतर हे ट्विट करण्यात आले आहे.

कितीये देवेंद्र फडणवीस यांची एकूण संपत्ती; जे घेणार आहे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ!

काय होती या व्यक्तीची तक्रार?

सुशांत मेहता नावाच्या व्यक्तीने महिंद्रा कंपनीच्या सेवेबद्दल आणि कारबद्दल एक्सवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये मेहता यांनी लिहिले होते की, आपण आपल्या कार, सर्व्हिस सेंटर, स्पेअर पार्ट्सच्या समस्या आणि कर्मचाऱ्यांचे वर्तन सुधारले तर बरे होईल. आपले प्रत्येक उत्पादन त्यांच्यासाठी आहे जे संशोधन करत नाहीत. प्रसारमाध्यमे तक्रारींनी भरलेली आहेत. मी गाड्यांच्या लूकबद्दल बोलणार नाही.

मेहता पुढे लिहितात, ‘सौंदर्यशास्त्राचा विचार केला तर तुमच्या गाड्या ह्युंदाईसमोर उभ्या राहत नाहीत. आपण एकतर आपल्या गरजेपेक्षा जास्त करत आहात किंवा आपण खूप काही करून शेणासारखे डिझाईन तयार करतात.

 

You’re right, Sushant.

We have a long way to go.

But please consider how far we have come.

When I joined the company in 1991, the economy had just been opened up.

A global consulting firm strongly advised us to exit the car business since we had no chance, in their view, of… pic.twitter.com/xinxlBcGuV

— anand mahindra (@anandmahindra) December 1, 2024

काय उत्तर दिलंय आनंद महिंद्रा यांनी?

आनंद महिंद्रा यांनी सुशांत मेहता यांच्या एक्स पोस्टला उत्तर देताना म्हटले आहे की, ‘आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. पण आपण किती पुढे आलो आहोत, याचा विचार करा. 1991 मध्ये मी कंपनीत रुजू झालो तेव्हा अर्थव्यवस्था नुकतीच खुली झाली होती. एका जागतिक सल्लागार कंपनीने आम्हाला कार व्यवसायातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला.

कारण त्यांच्या मते आम्हाला त्यात प्रवेश करणाऱ्या परदेशी ब्रँड्सशी स्पर्धा करण्याची कोणतीही संधी नव्हती. तीन दशकांनंतरही आम्ही तिथेच आहोत आणि जोरदार स्पर्धा करत आहोत.’ ‘आपल्या पोस्टप्रमाणे यशस्वी होण्याची भूक भागवण्यासाठी आम्ही सर्व संशय आणि अगदी उद्धटपणाचा वापर केला आहे. होय, आपल्याला मैलांचा पल्ला गाठायचा आहे. सातत्यपूर्ण सुधारणा हाच आमचा मंत्र राहील.’

Web Title: Anand mahindras reply to an angry customer a story told since 1991

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 09:05 PM

Topics:  

  • Anand Mahindra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.