Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले!

अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर कंपनीवर तीन वर्षांसाठी सरकारी कंपनीच्या निविदेत सहभागी होण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. या कारवाईनंतर कँपनीच्या शेअरची किंमत ४१.४७ रुपयांपर्यंत खाली आली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 08, 2024 | 09:28 PM
अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले!

अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले!

Follow Us
Close
Follow Us:

अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर कंपनीवर सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कारवाई केली आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता.८) बाजार उघडताच रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. ३ ऑक्टोबर रोजी रिलायन्स पॉवरचा शेअर ५४ रुपयांवर गेला होता. मात्र कारवाईनंतर आता शेअरची किंमत पडली असून, आज तो ४१.४७ रुपयांवर आला आहे.

तीन वर्षांसाठी सरकारी निविदा प्रक्रियेसाठी बंदी

रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स NU BESS लिमिटेड या कंपनीला तीन वर्षांसाठी सरकारी कंपनीच्या निविदेत सहभागी होण्यापासून बंदी घातल्यामुळे आता अनिल अंबानी यांना धक्का बसला आहे. निविदेत सहभागी होण्यासाठी अनिल अंबानींच्या कंपनीतर्फे बोगस कागदपत्र सादर केली गेली. यासाठी त्यांच्या कंपन्यांवर ही कारवाई होत असल्याचे निवेदन सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिले आहे.

कागदपत्रांमध्ये आढळल्यात त्रुटी

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने यासंबंधी वृत्त दिले आहे. त्यानुसार, महाराष्ट्र एनर्जी जेनरेशन लिमिटेड. ज्याचे नाव आता रिलायन्स NU BESS लिमिटेड असे आहे. या कंपनीकडून सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. विदेशी बँकाद्वारे अर्नेस्ट मनीसाठी जी बँक गँरंटी देण्यात आली होती, ती बोगस असल्याचे लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

हे देखील वाचा – गौतम अदानींनी एका झटक्यात बांग्लादेशकडून मिळवले 1450 कोटी; 7000 कोटींची थकबाकी!

काय म्हटलंय सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने

सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले की, निविदा भरणारी कंपनी मेसर्स रिलायन्स पॉवर लिमिटेडची उपकंपनी असल्यामुळे त्यांनी मूळ कंपनीच्या ताकदीचा वापर करून आर्थिक पात्रता पूर्ण केल्या होत्या. जेव्हा या प्रकरणाची तपशीलवार तपासणी करण्यात आली तेव्हा आढळले की, रिलायन्स NU BESS ने घेतलेले सर्व निर्णय हे त्यांची पालक कंपनी रिलायन्स पॉवरच्या सल्ल्यानुसार घेतले होते.

या कारवाईनंतर रिलायन्स पॉवर कंपनीकडून उत्तर देण्यात आले आहे. ही अनावश्यक कारवाई असून, आम्ही याविरोधात कायदेशीर कारवाई करू, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. “या प्रकरणात १६ ऑक्टोबर २०२४ रोजी तिसऱ्या पक्षाविरोधात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे फौजदारी तक्रार दाखल केली आहे. आम्ही कायद्याच्या प्रक्रियेचे पालन करू. तसेच कंपनीच्या ४० लाखांहून अधिक भागधारकांच्या हितासाठी आमच्यावरील अनावश्यक कारवाईला कायदेशीर आव्हान देऊ.

रिलायन्स पॉवर कंपनी नुकतीच कर्जमुक्त

अनिल अंबानींच्या रोजा पॉवर सप्लाय कंपनीने नुकतेच सिंगापूरच्या कंपनीचे ४८५ रुपयांचे कर्ज फेडले होते. यामुळे रोजा पॉवर सप्लाय ही कर्जमुक्त कंपनी बनली होती. सिंगापूरच्या कंपनीचे एकूण १३१८ कोटींचे कर्ज फेडल्यामुळे अनिल अंबानींना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र रिलायन्स पॉवरवर आता निविदेत भाग घेण्यापासून रोखल्यामुळे त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.

Web Title: Anil ambani company banned big shock to anil ambani reliance company was banned for three years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 09:28 PM

Topics:  

  • anil ambani

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.