Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कस्टम ड्युटी-जीएसटी कमी करूनही कॅन्सरची औषधे स्वस्त होईनात; … शेवटी सरकारने काढला ‘हा’ आदेश

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राबाबत मोठी घोषणा केली होती. त्यानुसार आता केंद्र सरकारने फार्मास्युटिकल कंपन्यांना तीन कॅन्सरविरोधी औषधांच्या किमती कमी करण्याचे आदेश दिले आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 29, 2024 | 09:29 PM
कस्टम ड्युटी-जीएसटी कमी करूनही कॅन्सरची औषधे स्वस्त होईनात; ... शेवटी सरकारने काढला 'हा' आदेश

कस्टम ड्युटी-जीएसटी कमी करूनही कॅन्सरची औषधे स्वस्त होईनात; ... शेवटी सरकारने काढला 'हा' आदेश

Follow Us
Close
Follow Us:

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ च्या संपूर्ण अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राबाबत मोठी घोषणा केली होती. त्यानुसार आता केंद्र सरकारने फार्मास्युटिकल कंपन्यांना तीन कॅन्सरविरोधी औषधांच्या किमती कमी करण्याचे आदेश दिले आहेत. 23 जुलै रोजी 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्करोगाच्या तीन औषधांवरील कस्टम ड्युटी शून्यावर आणण्याची घोषणा केली होती. यानंतर, 9 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कर्करोगाच्या औषधांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला होता. त्यानंतर आता सरकारने फार्मास्युटिकल कंपन्यांना हे आदेश दिले आहेत.

हे देखील वाचा – धनत्रयोदशीला देशभरात 50 हजार कोटींचा व्यवसाय? सोन्या-चांदीची शानदार विक्री, कॅटची माहिती!

सरकारच्या आदेशानंतर आता नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने (एनपीपीए) परिपत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये या औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना तीन कर्करोगविरोधी औषधांची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने ट्रॅस्टुझुमॅब, ओसिमरटिनिब आणि ड्यूरवालुमॅब या औषधांवरील एमआरपी (कमाल किरकोळ किंमत) कमी करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे.

हे देखील वाचा – धनत्रयोदशीच्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद, बॅंक निफ्टी 1060 अंकांच्या उसळीसह बंद!

रसायन आणि खत मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 2024-25 च्या अर्थसंकल्पात या तीन कर्करोगविरोधी औषधांना कस्टम ड्युटीमधून सूट देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यादृष्टीने हा आदेश जारी करण्यात आला आहे. वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत महसूल विभागाने 23 जुलै 2024 रोजी एक अधिसूचना जारी केली होती. ज्यामुळे या तीन कर्करोगाच्या औषधांवरील कस्टम ड्युटी शून्यावर आणली होती. याशिवाय, महसूल विभागाने 8 ऑक्टोबर 2024 रोजी या तीन कर्करोगाच्या औषधांवरील जीएसटी दर 10 ऑक्टोबर 2024 पासून, 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती.

हे देखील वाचा – 5000 रुपयांत सुरु केला बिझनेस, आज आहे 400 कोटींच्या कंपनीचा मालक; वाचा… प्रेरणादायी यशोगाथा!

याशिवाय रसायन आणि खत मंत्रालयाने म्हटले आहे की, बाजारातील या तीन कॅन्सर औषधांची एमआरपी कमी करावी आणि कर आणि शुल्कातील कपातीचा फायदा ग्राहकांना द्यावा. यामुळे एनपीपीएने 28 ऑक्टोबर 2024 रोजी सर्व औषध उत्पादक कंपन्यांना एमआरपी कमी करण्यास सांगितले आहे. याशिवाय, उत्पादक कंपन्यांना डीलर्स, राज्य औषध नियंत्रक आणि सरकार यांना किंमतीतील बदलांशी संबंधित किंमत सूची जारी कराव्या लागतील आणि एनपीपीएला किंमतीतील बदलांची माहिती देखील द्यावी लागेल. असेही सरकारने म्हटले आहे.

Web Title: Anti cancer drug prices even with customs duty gst reduction government issued order

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 09:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.