Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aptus Housing Finance चा नफा २६ टक्क्यांनी वाढला; तिसऱ्या तिमाहीत २३९ कोटींची कमाई

आर्थिक वर्ष २६ च्‍या तिसऱ्या तिमाहीसाठी एकूण उत्‍पन्‍न वार्षिक २२ टक्‍के वाढीसह ५६९ कोटी रूपये होते. आर्थिक वर्ष २६ च्‍या नऊमाहीसाठी एकूण उत्‍पन्‍न वार्षिक २७ टक्‍के वाढीसह १,६५२ कोटी रूपये होते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 07, 2026 | 07:13 PM
Aptus Housing Finance चा नफा २६ टक्क्यांनी वाढला; तिसऱ्या तिमाहीत २३९ कोटींची कमाई
Follow Us
Follow Us:

 

  • Aptus Housing Finance चा नफा २६ टक्क्यांनी वाढला
  • तिसऱ्या तिमाहीत २३९ कोटींची कमाई
मुंबई,फेब्रुवारी – २०२६: अॅप्‍टस व्‍हॅल्‍यू हाऊसिंग फायनान्‍स इंडिया लिमिटेड या आघाडीच्‍या हाऊसिंग फायनान्‍स कंपनीने ३१ डिसेंबर २०२५ रोजी समाप्‍त झालेल्‍या तिमाही व नऊमाहीसाठी आपल्‍या आर्थिक निकालांची घोषणा केली आहे.

कामगिरीची वैशिष्‍ट्ये

एयूएम डिसेंबर २०२५ पर्यंत १२,३३० कोटी रूपये राहिला, ज्‍यामध्‍ये वार्षिक २१ टक्‍के वाढ झाली. आर्थिक वर्ष २६ च्‍या तिसऱ्या तिमाहीत वितरण वार्षिक ११ टक्‍के वाढीसह १,०३० कोटी रूपये होते. आर्थिक वर्ष २६ च्‍या नऊमाहीमध्‍ये वितरण वार्षिक ९ टक्‍के वाढीसह २,७६८ कोटी रूपये होते. आर्थिक वर्ष २६ च्‍या तिसऱ्या तिमाहीसाठी एकूण उत्‍पन्‍न वार्षिक २२ टक्‍के वाढीसह ५६९ कोटी रूपये होते. आर्थिक वर्ष २६ च्‍या नऊमाहीसाठी एकूण उत्‍पन्‍न वार्षिक २७ टक्‍के वाढीसह १,६५२ कोटी रूपये होते.
आर्थिक वर्ष २६ च्‍या तिसऱ्या तिमाहीसाठी निव्‍व्‍ळ नफा* वार्षिक २६ टक्‍के वाढीसह २३९ कोटी रूपये होता. आर्थिक वर्ष २६ च्‍या नऊमाहीसाठी निव्‍वळ नफा* वार्षिक २६ टक्‍के वाढीसह ६८५ कोटी रूपये होता.

आर्थिक वर्ष २६ च्‍या तिसऱ्या तिमाहीसाठी आरओए व आरओई अनुक्रमे ७.९ टक्‍के व २०.२ टक्‍के होते. आर्थिक वर्ष २६ च्‍या नऊमाहीसाठी आरओए व आरओई अनुक्रमे ७.९ टक्‍के व २०.० टक्‍के होते, जे उद्योगामध्‍ये सर्वोत्तम होते.

 नवीन कामगार संहितेमुळे होणारा अतिरिक्‍त खर्च वगळून, मागील सेवा खर्च ३.८५ कोटी रूपये (करानंतर निव्वळ २.९९ कोटी रूपये).

कामगिरीची मुख्‍य वैशिष्‍ट्ये

(कोटी रूपये)
तपशील
आर्थिक वर्ष २६ ची तिसरी तिमाही
आर्थिक वर्ष २५ ची तिसरी तिमाही
वार्षिक वाढ
आर्थिक वर्ष २६ ची नऊमाही
आर्थिक वर्ष २५ ची नऊमाही
वार्षिक वाढ

एयूएम
१२,३३०
१०,२२६
२१ टक्‍के
१२,३३०
१०,२२६
२१ टक्‍के

वितरण
१,०३०
९३०
११ टक्‍के
२,७६८
२,५४०
९ टक्‍के

एकूण उत्‍पन्‍न
५६९
४६५
२२ टक्‍के
१,६५२
१,३०५
२७ टक्‍के

निव्‍वळ नफा
२३९*
१९१
२६ टक्‍के
६८५*
५४४
२६ टक्‍के

एकूण एनपीए (टक्‍के)
१.६ टक्‍के
१.३ टक्‍के
२८ बीपीएस
१.६ टक्‍के
१.३ टक्‍के
२८ बीपीएस

निव्‍वळ एनपीए (टक्‍के)
१.२ टक्‍के
१.० टक्‍के
२२ बीपीएस
१.२ टक्‍के
१.० टक्‍के
२२ बीपीएस

ओपेक्‍स (टक्‍के)
२.७ टक्‍के
२.६ टक्‍के
१६ बीपीएस
२.७ टक्‍के
२.६ टक्‍के
५ बीपीएस

आरओए (टक्‍के)
७.९ टक्‍के
७.७ टक्‍के
२८ बीपीएस
७.९ टक्‍के
७.७ टक्‍के
१८ बीपीएस

आरओई (टक्‍के)
२०.२ टक्‍के
१८.८ टक्‍के
१४७ बीपीएस
२०.० टक्‍के
१८.५ टक्‍के
१५० बीपीएस

US-India Trade Deal: कृषी क्षेत्रासंबंधी महत्त्वाचा निर्णय! अनेक वस्तूंवर अमेरिकेकडून 0% टॅरिफ, पीयूष गोयल यांची महत्त्वाची अपडेट

नवीन कामगार संहितेमुळे होणारा अतिरिक्‍त खर्च वगळून, मागील सेवा खर्च ३.८५ कोटी रूपये (करानंतर निव्वळ २.९९ कोटी रूपये)

या निकालांबाबत मत व्‍यक्‍त करत व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. पी. बालाजी म्‍हणाले, ”आर्थिक वर्ष २६ च्‍या तिसऱ्या तिमाहीमध्‍ये विकास गती कायम राहिली, ज्‍याला व्‍यवसायामध्‍ये स्थिर वाढ आणि सतर्क पोर्टफोलिओ व्‍यवस्‍थापनाचे पाठबळ मिळाले. आर्थिक वर्ष २६ च्‍या तिसऱ्या तिमाहीत एयूएम वार्षिक २१ टक्‍के वाढून १२,३३० कोटी रूपयांपर्यंत पोहोचला, तसेच वितरण वार्षिक ११ टक्‍के वाढून १,०३० कोटी रूपयांपर्यंत पोहोचले.

आम्‍ही कॅलेंडर वर्षादरम्‍यान ३७ नवीन ठिकाणी उपस्थिती निर्माण करत आमचे नेटवर्क ३३५ शाखांपर्यंत वाढवले. अधिक पुढे जात नवीन राज्‍यांमध्‍ये शाखा विस्‍तारीकरणवर लक्ष केंद्रित केले जाईल, तसेच विद्यमान राज्‍यांमधील कमी पोहोच असलेल्‍या निवडक भागांमध्‍ये उपस्थिती वाढवण्‍यावर भर दिला जाईल.
मालमत्ता दर्जासंदर्भात एकूण एनपीए व निव्‍वळ एनपीए अनुक्रमे १.५६ टक्‍के आणि १.१८ टक्‍के यावर स्थिर राहिले. संकलनातील हंगामी चढ-उतारामुळे (सणासुदीच्‍या काळासह) ३० हून अधिक डीपीडीमध्ये किंचित वाढ झाली, जो ६.४८ टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे.

नफ्यासंदर्भात, आर्थिक वर्ष २६ च्‍या नऊमाहीमध्‍ये एकूण उत्‍पन्‍न वार्षिक २७ टक्‍के वाढीसह १,६५२ कोटी रूपयांपर्यंत वाढले. निधी खर्चामध्‍ये ८.४ टक्‍के कपात झाल्‍यामुळे आर्थिक वर्ष २६ च्‍या नऊमाहीमध्‍ये आमचे स्‍प्रेड्स ८.९ टक्‍क्‍यांपर्यंत सुधारले. आर्थिक वर्ष २६ च्‍या नऊमाहीमध्‍ये ओपेक्‍स गुणोत्तर २.७ टक्‍क्‍यांपर्यंत स्थिर राहिले, ज्‍यामुळे ऑपरेटिंग नफा वार्षिक २८ टक्‍के वाढीसह ९३३ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. आर्थिक वर्ष २६ च्‍या नऊमाहीसाठी क्रेडिट खर्च आमच्‍या अंदाजित रेंजमध्‍ये ५० बीपीएसवर स्थिर राहिला.

तिमाहीसाठी निव्‍वळ नफा* वार्षिक २६ टक्‍के वाढीसह २३९ कोटी रूपये राहिला. तिमाहीसाठी आरओए व आरओई अनुक्रमे ७.९ टक्‍के आणि २०.२ टक्‍के राहिले. आर्थिक वर्ष २६ च्‍या नऊमाहीसाठी निव्‍वळ नफा* वार्षिक २६ टक्‍के वाढीसह ६८५ कोटी रूपये राहिला, तसेच आरओए व आरओईमध्‍ये अनुक्रमे ७.९ टक्‍के आणि २०.० टक्‍के वाढ झाली, जे उद्योगामध्‍ये सर्वोत्तम आहेत. या कामगिरीमधून वैविध्‍यपूर्ण उत्‍पादन पोर्टफोलिओ आणि उत्‍पन्‍न विभागांमधील व्‍यापक ग्राहकवर्गाचा पाठिंबा दिसून येतो, ज्‍यामुळे बाजारपेठेतील चढ-उतारादरम्‍यान संतुलन व स्थिरता मिळते.

तंत्रज्ञान आणि डेटा-केंद्रित निर्णय प्रक्रिया आमच्‍या विकासासाठी व जोखीम शिस्‍तबद्धतेसाठी महत्त्‍वाचे घटक आहेत, ज्‍यामुळे आम्‍हाला विविध भौगोलिक क्षेत्रांमध्‍ये विश्वसार्हपणे विस्‍तार करण्‍यास मदत झाली आहे. आम्‍ही डिजिटायझेशनमध्‍ये आघाडीवर आहोत, जेथे ९२ टक्‍क्‍यांहून अधिक करार डिजिटल पद्धतीने केले जात आहेत आणि ९४ टक्‍क्‍यांहून अधिक संकलन डिजिटल चॅनेल्‍सच्‍या माध्‍यमातून होत आहे. अकाऊंट अॅग्रीगेटर डेटा आणि क्रेडिट ब्‍युरो माहितीचा वाढता वापर आमच्या कर्ज मंजुरी प्रक्रियेला अधिक अचूक बनवत आहे. यामुळे पोर्टफोलिओचा दर्जा सुधारत आहे, मोठ्या कर्जांच्या आणि सक्षम ग्राहक वर्गातील वाढीस चालना मिळत आहे.
गेल्‍या काही तिमाहींमध्‍ये आम्‍ही उच्‍च दर्जाचा ग्राहकवर्ग तयार करण्यासाठी मोठ्या रकमेच्या कर्ज विभागाकडे वळण्याचा आमचा हेतू व्‍यक्‍त करत आहोत. या धोरणाला अनुसरून आम्ही ७ लाख रूपयांपेक्षा कमी कर्ज मंजूरी बंद केली आहे, ज्यामुळे या वर्षातील कर्ज वितरणात काही प्रमाणात घट दिसून आली आहे. असे असताना देखील चालू आर्थिक वर्षात एयूएममध्‍ये २० ते २१ टक्‍के वाढ होईल, अशी आम्‍हाला अपेक्षा आहे. भविष्‍याकडे वाटचाल करत आम्‍हाला भर करण्‍यात येणाऱ्या नवीन शाखा, चॅनेलचा विस्‍तार, उच्‍च एटीएस, एनआयएमबाबत तडजोड न करता गृहकर्ज व्‍याजदारांमध्‍ये काहीशी वाढ आणि सुधारित उत्‍पादकतेसह एयूएममध्‍ये २२ ते २४ टक्‍के वाढीची अपेक्षा आहे.”

महाराष्ट्राचे रिअल इस्टेट क्षेत्र नव्या उंचीवर! शहरी विकासाच्या पुढील टप्प्यासाठी राज्य सज्ज; राष्ट्रीय परिषदेत उमटला ठसा

Web Title: Aptus housing finances profit increased by 26 percent earning 239 crore in the third quarter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
1

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
2

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
3

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा
4

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.