Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशु सिंघल यांची महानगर गॅस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती

आशु सिंघल (Ashu Singhal), कार्यकारी संचालक, (सीएसपीए, आरएम, टीक्युएम आणि एसडी), गेल, यांनी २३ डिसेंबर २०२२ रोजी महानगर गॅस लिमिटेडच्या (MGL) व्यवस्थापकीय संचालकाचा पदभार स्वीकारला आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Dec 26, 2022 | 06:35 PM
आशु सिंघल यांची महानगर गॅस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सिंघल हे एनआयटी, सिल्चर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असून त्यांनी ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये स्पेशलायझेशनसह बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (एमबीए) पदवी संपादन केली आहे. येथे रुजू होण्यापूर्वी, ते गेल (इंडिया) लिमिटेड येथे कार्यकारी संचालकाच्या रूपाने कॉर्पोरेट स्ट्रॅटजी, प्लॅनिंग अँड ॲड्व्होकसी, रिस्क मॅनेजमेंट, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट विभागांचे प्रमुख होते, व त्याच वेळी त्या संस्थेचे चिफ रिस्क ऑफिसर म्हणून देखील कार्यरत होते. ते ओएनजीसी पेट्रो ॲडिशन्स लि. (ओपीएएल) च्या आणि तालचेर फर्टिलायझर लि. (टीएफएल) च्या मंडळावर संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. ह्यापूर्वी ते महानगर गॅस लि. (एमजीएल) च्या मंडळावर संचालक राहिलेले आहेत.

सिंघल ह्यांच्याकडे हायड्रोकार्बन क्षेत्राचा ३१ वर्षांचा समृद्ध अनुभव आहे ज्यामध्ये कॉर्पोरेट नीती, मोठ्या पातळीवरील प्रकल्पांची अंमलबजावणी उदाहरणार्थ देशभरात गॅस पाइपलाइन्स, पेट्रोकेमिकल आणि एलएनजी अशांसारख्या विभिन्न कार्यक्षेत्रांचा समावेश होतो. त्यांनी गेलच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सर्वोच्च व्यवस्थापनासोबत जवळून काम केले आहे, त्याबरोबरच विविध बहुस्तरीय संस्था, औद्योगिक संघटना, समित्या आणि विचार मंचांमध्ये नैसर्गिक वायूच्या पुरस्कारासाठीच्या कार्यक्रमांतर्गत हितसंबंधींचा सहभाग वाढवणाऱ्या उपक्रमांसाठी मध्यस्थाचे काम केले आहे.

जवळपास रु. २०,००० कोटी एवढा केपेक्स असणाऱ्या अनेक महाप्रकल्पांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात सिंघल ह्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे ज्यामध्ये देशभरात गॅस पाइपलाइन्स बसवणे आणि पाटा, उ.प्र. येथे नैसर्गिक वायू आधारित संकलित पेट्रोकेमिकल विस्तार प्रकल्प राबवणे इ. चा समावेश होतो. त्यांनी गेलमध्ये प्रॉफिट मॅक्झिमायझेशनच्या कामाचे नेतृत्व केले ज्यामुळे कामकाजातील कार्यक्षमता, खर्चातील घट आणि उत्पन्नातील वाढीमार्फत रु. १००० कोटींहून अधिक लाभ जमा / वसूल करता आला.

गेलचे चीफ रिस्क अँड स्ट्रॅटजी ऑफिसर म्हणून – त्यांनी यशस्वीपणे एलएनजी कंत्राटांमधील मूल्य जोखीम, निर्देशांक जोखीम (एचएच, ब्रेंट), आणि चलन जोखीम हाताळली ज्यांचा नक्त नफ्यावर परिणाम होतो. सिंघल ह्यांनी भारतीय औद्योगिक शिष्टमंडळाचे युएस सरकारच्या ख्यातनाम इंटरनॅशनल लीडरशीप प्रोग्रॅममध्ये प्रतिनिधित्व देखील केले आहे.

Web Title: Ashu singhal appointed as managing director of mahanagar gas limited nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2022 | 06:35 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.