Ayesha Shroff said Jackie turned ₹1 lakh into ₹100 crore after a party deal
Jackie Shroff Sony Entertainment Television investment : बॉलीवूडमधील अनेक स्टार्स चित्रपटांमधून नाव व पैसा कमावतात. पण फक्त अभिनयावर समाधान न मानता काही कलाकार व्यवसाय, गुंतवणूक आणि पार्टनरशिपमधूनही आपले साम्राज्य उभारतात. यात एक मोठं नाव म्हणजेच “जॅकी दादा” उर्फ जॅकी श्रॉफ आणि त्यांची पत्नी आयशा श्रॉफ. या जोडप्याच्या आयुष्यातील एका निर्णयाने त्यांना पार्टी हॉलमधून थेट करोडपती क्लबमध्ये पोहोचवलं. १ लाख रुपयांची छोटीशी गुंतवणूक कशी १०० कोटींमध्ये रुपांतरित झाली, याची कहाणी खरीच प्रेरणादायी आहे.
२००३ साली जॅकी आणि आयशाच्या निर्मितीतील बूम हा चित्रपट मोठा फ्लॉप ठरला. पण त्याच्या काही वर्षांपूर्वी या जोडप्याने घेतलेला एक निर्णय त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. मुंबईतील मरीन ड्राइव्हवरील आरजी क्लबमध्ये झालेल्या एका पार्टीतून या कराराची सुरुवात झाली. तेव्हा सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन भारतात पाय रोवण्यासाठी सज्ज होतं. आणि हाच क्षण श्रॉफ दांपत्याने ओळखला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Tariffs : ट्रम्पची आर्थिक खेळी! अमेरिकेवरील $37.18 ट्रिलियनचे कर्ज फेडण्यासाठी हा भाला मोठ्ठा ‘Tariff’ तमाशा
अलीकडेच झेरोधाशी बोलताना आयशा श्रॉफ यांनी हा किस्सा उलगडला. त्यांनी सांगितलं की, सुमारे २० वर्षांपूर्वी त्यांनी व जॅकीने मिळून सोनी टीव्हीमध्ये हिस्सा खरेदी केला. आयशाच्या मते, ही गुंतवणूक सहज नव्हती. सात जणांच्या त्यांच्या टीममध्ये वेगवेगळे कौशल्य असले तरी सोनीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तब्बल एक वर्ष कठोर परिश्रम करावे लागले. अखेर ती मेहनत रंगली आणि त्यांचा ₹१ लाखांचा हिस्सा १५ वर्षांत तब्बल ₹१०० कोटींमध्ये बदलला.
आयशा सांगतात की, सोनीसोबतचा करार सहज साधला गेला नाही. त्यासाठी त्यांनी एक भन्नाट युक्ती केली. त्यांनी जॅकीला सुचवलं “बॉलिवूडमधील मोठ्या स्टार्सना घेऊन एक ग्रँड पार्टी टाकू या!” त्यानुसार मुंबईच्या आरजी क्लबमध्ये जोरदार पार्टी ठेवण्यात आली. ही पार्टी सकाळी ६ पर्यंत रंगली आणि चित्रपटसृष्टीतील नामांकित चेहरे त्यात सहभागी झाले. या पार्टीचा प्रभाव इतका जबरदस्त होता की दुसऱ्याच दिवशी लॉस एंजेलिसहून सोनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला. कराराच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या झाल्या आणि आयशा-जॅकीच्या आयुष्यातील सुवर्णपान लिहिलं गेलं.
त्या एका करारामुळे जॅकी-आयशाचा प्रवास पूर्णपणे बदलला. पार्टी हॉलमध्ये सुरू झालेली कहाणी थेट करोडपती क्लबमध्ये संपली. १ लाख रुपयांची छोटी गुंतवणूक योग्य वेळी, योग्य ठिकाणी व योग्य लोकांसोबत केल्यास कशी अफाट संपत्ती निर्माण करू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे जॅकी व आयशा श्रॉफ.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Timelapse Video : भारताचे नभांगणातील सौंदर्यदर्शन! शुभांशू शुक्ला यांनी ISS वरून टिपला भारताचा जादुई टाइमलॅप्स
आज बॉलीवूडमधील तरुण पिढी फक्त चित्रपटांवर नाही, तर स्टार्टअप्स, गुंतवणूक, OTT कंपन्या व ब्रँड कोलॅबोरेशनवरही भर देते. जॅकी श्रॉफ-आयशाची ही कथा त्यांना नक्कीच प्रेरणा देणारी आहे.