भारताचे नभांगणातील सौंदर्यदर्शन! शुभांशू शुक्ला यांनी ISS वरून टिपलेला भारताचा जादुई टाइमलॅप्स ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Timelapse Video : भारताच्या अंतराळ इतिहासात नवा अभिमानास्पद अध्याय लिहिला गेला आहे. भारतीय हवाई दलाचे अधिकारी आणि चाचणी वैमानिक ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी अलीकडेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) भारताचा एक अनोखा टाइमलॅप्स व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओतून दिसणारा भारत प्रेक्षकांना एखाद्या “खिडकीतून पृथ्वीला पाहण्याचा” अद्भुत अनुभव देतो.
शुक्ला यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये भारताचे पूर्व किनारे, हिमालयाचा भव्य पट्टा आणि देशभर घोंघावणाऱ्या वादळांचे अप्रतिम दृश्य टिपले आहे.
शुक्ला यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, “हा टाइमलॅप्स पाहताना प्रेक्षकांना असे वाटावे की ते आयएसएसच्या खिडकीत बसले आहेत.” त्यांनी हा व्हिडिओ लँडस्केप मोडमध्ये आणि उच्च स्क्रीन ब्राइटनेससह पाहण्याचा सल्लाही दिला आहे.
*- Watch the video in landscape with screen brightness high. While on orbit I tried to capture pictures and videos so that I can share this journey with you all. This is a Timelapse video of Bharat from space. The @iss is moving from south to north from the Indian Ocean. We are… pic.twitter.com/ETEARm88tz — Shubhanshu Shukla (@gagan_shux) August 22, 2025
credit : social media
३९ वर्षीय शुभांशू शुक्ला हे अॅक्सिओम-४ मोहिमेचा भाग म्हणून अंतराळात पोहोचले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sergio Gor : भारत-अमेरिका संबंधांच्या कठीण टप्प्यात ट्रम्पचे निर्णायक पाऊल, सर्जियो गोर यांच्याकडे ‘राजदूत’ पदाची धुरा
शुक्ला यांचा जन्म १० ऑक्टोबर १९८५ रोजी लखनऊ येथे झाला. त्यांचे कुटुंब साधारण मध्यमवर्गीय असून विमानचालन किंवा अंतराळ क्षेत्राशी त्यांचा थेट संबंध नव्हता. पण बालपणी पाहिलेल्या एअरशोमुळे त्यांच्या मनात उड्डाणाची आणि अंतराळाची गोडी निर्माण झाली.
शुक्ला स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेट आणि क्रू ड्रॅगन यानातून अंतराळात गेले. प्रक्षेपणानंतर अवघ्या दहा मिनिटांत कॅप्सूल कक्षेत प्रवेश करताच शुक्ला हिंदीत म्हणाले “यह एक अद्भुत यात्रा थी!” हा क्षण ऐकताच भारतीयांना पुन्हा एकदा १९८४ मधील राकेश शर्मा यांची आठवण झाली.
शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर तब्बल १८ दिवसांचा मुक्काम केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Xi Jinping Tibet visit : राजकीय स्थिरतेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे प्रगतीशील पाऊल; तिबेट वारीमागे नेमके कारण काय?
१९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी “सारे जग से अच्छा” असे उद्गार काढून भारतीयांना भावूक केले होते. ४० वर्षांनंतर शुभांशू शुक्ला यांच्या या प्रवासाने पुन्हा एकदा देशवासीयांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू आणले. त्यांच्या व्हिडिओमुळे जगाला “असा भारत जो तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल” हे खरे वाटते.






