तुम्ही बुधवारी (ता.१७) बँकेसंदर्भात काही आर्थिक व्यवहार करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील बहुतेक शहरांमध्ये बँका बंद राहणार आहे. इतकेच नाही तर बुधवारी (ता.१७) शेअर बाजार देखील बंद राहणार आहे. त्यामुळे आता १७ तारखेला शेअर बाजारात कोणतेही ट्रेंडिंग होणार आहे. बुधवारी मोहरमच्या पार्श्वभूमीवर देशातील जवळपास सर्वच भागांमध्ये बँका बंद राहणार आहे. याशिवाय मोहरममुळे शेअर बाजाराला देखील सुट्टी असणार आहे.
१७ जुलैला कुठे-कुठे असेल बँकांना सुट्टी?
१७ जुलैला मोहरम असल्यामुळे देशातील सर्वच भागांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) सुट्ट्यांच्या यादीनुसार देशातील सर्वच भागांमध्ये उद्या बँका बंद असणार आहे. याशिवाय महाराष्ट्रात आषाढी एकादशी, याशिवाय अन्य राज्यांमध्ये मोहरमसह आशूरा, यू तिरोज सिंग यांसारखे उत्सव साजरे केले जाणार आहे. परिणामी, या सणांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, नवी दिल्ली, बिहार, झारखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, मेघालय, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, मिझोराम, कर्नाटक, मध्य प्रदेश, त्रिपुरा या राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे.
जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात ‘या’ दिवशी बँका बंद राहणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) सुट्ट्यांच्या यादीनुसार, जुलै महिन्यात बँकांना अधिक सुट्ट्या मिळाल्या आहेत. त्यानुसार बँकांना चार रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार या नियमित सुट्ट्या असतातच. याशिवाय सण, उत्सव, राष्ट्रीय आणि राज्य हॉलिडे यामुळे देखील बँका बंद असणार आहे. जुलै महिन्यातील शिल्लक दिवसांचा विचार केल्यास, पुढील दिवशी बँका बंद राहणार आहे.
16 जुलै 2024 – हरेलाच्या निमित्ताने डेहराडूनमधील बँकांना सुट्टी असेल.
17 जुलै 2024 – मोहरमसह अन्य सणांच्या निमित्ताने पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, नवी दिल्ली, बिहार, झारखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, मेघालय, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, मिझोराम, कर्नाटक, मध्य प्रदेश, त्रिपुरा या राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे.
21 जुलै 2024 – रविवार असल्यामुळे देशभरातील बँका बंद राहतील.
27 जुलै 2024 – चौथ्या शनिवारमुळे 27 जुलै 2024 रोजी देशभरात बँकेला सुट्टी असेल.
28 जुलै 2024 – रविवार असल्याने देशभरात बँका बंद राहतील.
शेअर बाजारही राहणार बंद
मुंबई शेअर बाजाराच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, 17 जुलै 2024 रोजी मोहरमच्या निमित्ताने देशातील मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) बंद राहणार आहे. या वर्षी शेअर बाजाराच्या सुट्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर पुढील तारखेला बाजार बंद राहणार आहे.
15 ऑगस्ट 2024 : स्वातंत्र्यदिन
2 ऑक्टोबर 2024 : महात्मा गांधी जयंती
1 नोव्हेंबर 2024 : दिवाळी सणामुळे शेअर बाजार बंद राहील.
15 नोव्हेंबर 2024 : गुरुनानक जयंती
25 डिसेंबर 2024 : नाताळनिमित्त शेअर बाजार बंद असेल.