शेअर्सने अवघ्या 5 दिवसात दिला 100 टक्के नफा, गाठला 52 आठवड्यांचा नवा उच्चांक!
सध्याच्या घडीला शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशातच तुम्ही दर्जेदार शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. शेअर बाजार तज्ज्ञ भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडवर उत्साही आहेत. ते खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने संरक्षण क्षेत्रातील कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला 6-9 महिन्यांसाठी 317-340 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
किती आहे या शेअरची किंमत?
भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरची सध्याची किंमत 297 रुपये आहे. भारताच्या राष्ट्रपतींकडे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे 373 कोटी शेअर्स आहेत. ही 51.14 टक्के हिस्सेदारी आहे. विश्लेषकाने लक्ष्य किंमतीसाठी दिलेला कालावधी सहामाही असून या कालावधीत, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची किंमत निर्धारित लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो.
(फोटो सौजन्य – iStock)
काय करते ही कंपनी?
भारत इलेक्ट्रॉनिक्स ही संरक्षण क्षेत्रातील 1954 मध्ये स्थापन झालेली लार्ज कॅप कंपनी आहे. कंपनीचे बाजार भांडवल 2,17,100.43 कोटी रुपये आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्सची प्रमुख उत्पादने/महसूल विभागांमध्ये 31-मार्च-2024 रोजी संपलेल्या वर्षासाठी इलेक्ट्रॉनिक घटक आणि उपकरणे, सेवा, इतर ऑपरेटिंग महसूल, स्क्रॅप आणि भाडे यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा – टाटांच्या ‘या’ कंपनीची कमाल, 5 दिवसात छापले 57 हजार कोटी रुपये; वाचा… सविस्तर!
कंपनीने 30-09-2024 ला संपलेल्या तिमाहीत 4762.66 कोटी ची एकत्रित एकूण मिळकत नोंदवली आहे, जी मागील तिमाहीत 4447.15 कोटी च्या एकूण उत्पन्नापेक्षा 7.09 टक्क्यांनी अधिक आहे आणि मागील वर्षीच्या त्याच तिमाहीत 4146.147 टक्क्यांंच्या एकूण उत्पन्नापेक्षा अधिक आहे.
कशी आहे शेअरची कामगिरी?
गेल्या आठवड्यात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या शेअर्सने 4.50 टक्क्यांनी तेजी नोंदवली आहे. गेल्या सहा महिन्यात या शेअरने 70 रुपयांच्या तेजीसह 30 टक्क्यांची तेजी नोंदवली. तसेच याच वर्षी जानेवारीपासून शेअरने गुंतवणुकदारांचा पैसा दुप्पट केला आहे. दीर्घकालावधीतही शेअरने गुंतवणुकदारांना मोठा परतावा दिला असून गेल्या पाच वर्षात शेअरची 700 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गुंतवणुकीसाठी ब्रोकरेजचे मत
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, बीईएलची बाजारपेठेतील मजबूत स्थिती आणि सशस्त्र दलांसह सहयोग, स्थापित पायाभूत सुविधा आणि उत्पादन सुविधा तसेच मजबूत आर&डी क्षमतांमुळे त्याच्या प्रतिस्पर्ध्यांवर वरचष्मा आहे. कंपनीकडे मोठ्या ऑर्डर्सही आहेत. त्यामुळे आगामी काळात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)