मोठी बातमी! नववर्षापासून दाढी-कटिंगचे दर वाढणार, 20 ते 30 टक्क्यांची भाववाढ होणार
नव्या वर्षात केशकर्तनालय, ब्युटी पार्लर आणि सलूनमधील रेट वाढवण्याचा निर्णय सलून आणि ब्युटी पार्लर असोशिएशनने घेतला आहे. जानेवारी 2025 पासून ही दरवाढ लागू होणार आहे. वाढती महागाई, जीएसटी महापालिकेने वाढलेले परवाना शुल्क यामुळे भाववाढ करावी लागत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. सलून आणि ब्युटीपार्लरच्या सध्याच्या दरात किमान 20 ते 30 टक्क्यांची भाववाढ होणार असल्याचे सलून संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय
1 जानेवारी 2025 या नवीन सालापासून मुंबई सह सर्व महाराष्ट्रात सलूनमधील हेअर कट, शेविंग त्याचबरोबर इतर सर्व सौंदर्य प्रसाधन कामावरती किमान 20 ते 30 टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. याबाबत सलून व्यवसायिकांनी निर्णय घेतला आहे. वाढती महागाई, जीएसटी, इन्कम टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, महापालिकेच्या वाढती लायसन फी, सलून उपयोगी वस्तू चा वाढता दर ,वाढत चाललेले हप्ते या सर्व आर्थिक विवेंचनात अडकलेला सलून कारागीर या समस्यावर मात करण्यासाठी ही दरवाढ करत असल्याचे सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
2024 मध्ये भारतीयांनी गुगलवर सर्च केल्यात या गोष्टी; वाचा… टॉप 10 बाबींची यादी!
कुठल्या गोष्टींचे दर किती वाढणार?
हेअर कट- 20 टक्के वाढ
दाढी- 20 टक्के वाढ
हेअर कलर- 30 टक्के वाढ
क्लीन अप,फेशियल अँड डी टॅन- 30 टक्के वाढ
स्मुथनिंग अँड कॅरीटीन- 30 टक्के वाढ
हेड मसाज, मेनिक्यूर, पेडीक्युर- 30 टक्के वाढ
आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पदभार स्वीकारला; ‘ही’ असतील आव्हाने
नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना बसणार जोरदार झटका
सप्टेंबर २०२४च्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2025 मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 ते 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए म्हणजेच महागाई भत्ता 54.49 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महागाई भत्ता किती मिळणार याची आकडेवारी अजून यायची आहे. केंद्रीय निवृत्ती वेतनधारकांसमोरील आव्हाने ओळखून 80 आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना अतिरिक्त निवृत्तीवेतन देण्यात येते.