Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Zp : पुणे झेडपीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना जुन्याच सुविधा; अध्यक्षांना मिळणार ‘हा’ बंगला

पुणे झेडपी अध्यक्षांना अधिकृत ‘शिवाई’ बंगला उपलब्ध होणार असला, तरी उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांना पुण्यात भाड्याने घर शोधावे लागणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 12, 2026 | 06:42 PM
पुणे झेडपीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना जुन्याच सुविधा; अध्यक्षांना मिळणार 'हा' बंगला

पुणे झेडपीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना जुन्याच सुविधा; अध्यक्षांना मिळणार 'हा' बंगला

Follow Us
Follow Us:
  • झेडपीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना जुन्याच सुविधा
  • निवासासाठी भाड्याचा पर्याय
  • अध्यक्षांना मिळणार ‘शिवाई’ बंगला
पुणे : पुणे जिल्हा परिषदेत नव्याने निवडून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी प्रशासनाने दालनांच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात नेली असली, तरी वाहन आणि निवास व्यवस्थेच्या बाबतीत मात्र जुन्याच सुविधांवर समाधान मानावे लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अध्यक्षांना अधिकृत ‘शिवाई’ बंगला उपलब्ध होणार असला, तरी उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांना पुण्यात भाड्याने घर शोधावे लागणार आहे.

 

२१ मार्च २०२२ रोजी जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर संस्थेत प्रशासक राजवट लागू झाली होती. त्या वेळी पदाधिकाऱ्यांच्या वापरातील सर्व शासकीय वाहने प्रशासनाकडे जमा करण्यात आली. गेल्या चार वर्षांत ही वाहने विविध अधिकाऱ्यांकडे वापरात होती. अध्यक्षांच्या वापरातील इनोव्हा गाडी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती. या कालावधीत पदाधिकाऱ्यांसाठी नव्या वाहनांची खरेदी करण्यात आलेली नसल्याने नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना जुनीच वाहने वापरावी लागणार आहेत.

प्रशासन निवासव्यवस्था उपलब्ध करणार

दरम्यान, अध्यक्षांसाठी क्वीन्स गार्डन परिसरातील ‘शिवाई’ हा अधिकृत बंगला राखीव ठेवण्यात आला आहे. अध्यक्षांची निवड होताच हा बंगला त्यांच्या ताब्यात दिला जाणार आहे. मात्र, उपाध्यक्षांसह इतर पाच पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र शासकीय निवासस्थानाची सोय उपलब्ध नाही. जिल्हा परिषदेची नवी इमारत उभारल्यानंतर जुन्या निवासस्थानांचे पाडकाम करण्यात आले होते; मात्र त्यानंतर नवीन निवासस्थाने उभारण्यात आलेली नाहीत. परिणामी, संबंधित पदाधिकाऱ्यांना पुण्यात भाड्याने घर घ्यावे लागणार असून, त्यासाठी शासनाने ठरविलेल्या भाडे मर्यादेचे बंधन लागू असेल. आवश्यकतेनुसार प्रशासन निवासव्यवस्था उपलब्ध करून देणार आहे.

रंगकामाची कामे अंतिम टप्प्यात

प्रशासक काळात अध्यक्ष व उपाध्यक्षांची दालने मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वापरात होती. सुमारे महिनाभरापूर्वी संबंधित अधिकारी त्यांच्या मूळ दालनात परतले असून, इतर पदाधिकाऱ्यांची दालनेही रिकामी करण्यात आली आहेत. सध्या नव्या खुर्च्या, सोफासेट, पडदे आणि सजावटीच्या कुंड्यांची खरेदी करण्यात आली असून, दुरुस्ती व रंगकामाची कामे अंतिम टप्प्यात आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद भवनात तयारीचा माहोल दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा : टायर फुटला, शालेय सहलीची बस पलटी; जखमींचा आकडाही आला समोर

सजावट आणि प्रशासकीय तयारी वेगात सुरू

चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात संभाव्य निवडणुकांचा विचार करून पदाधिकाऱ्यांचे मानधन, वाहनव्यवस्था, इंधन खर्च, बैठका, चहापान आणि निवास यासाठी टोकन तरतूद करण्यात आली होती. आता शेवटच्या पुरवणी अंदाजपत्रकात या खर्चासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.एकीकडे दालनांची सजावट आणि प्रशासकीय तयारी वेगात सुरू असताना, दुसरीकडे वाहन आणि निवासाच्या मर्यादित सुविधांमुळे नव्या पदाधिकाऱ्यांची कारकीर्द ‘जुन्याच चौकटीतून’ सुरू होणार असल्याचे चित्र समोर येत आहे.

Web Title: Pune zilla parishad to provide old facilities to newly elected office bearers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news
  • ZP Politics

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
2

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
3

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
4

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.