Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकरी घेणार इस्राईलमध्ये आधुनिक शेतीचे धडे! १० दिवसांचा विशेष अभ्यास दौरा; कृषी अधिकाऱ्यांसह पथक रवाना

Maharashtra Farmer Israel Tour: महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी अधिकारी १० दिवसांच्या इस्राईल दौऱ्यावर रवाना झाले आहेत. कमी पाण्यात आधुनिक शेती आणि ठिबक सिंचनाचे तंत्रज्ञान शिकणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 12, 2026 | 03:38 PM
शेतकरी घेणार इस्राईलमध्ये आधुनिक शेतीचे धडे! १० दिवसांचा विशेष अभ्यास दौरा

शेतकरी घेणार इस्राईलमध्ये आधुनिक शेतीचे धडे! १० दिवसांचा विशेष अभ्यास दौरा

Follow Us
Follow Us:

 

  • शेतकरी घेणार इस्राईलमध्ये आधुनिक शेतीचे धडे!
  • १० दिवसांचा विशेष अभ्यास दौरा
  • कृषी अधिकाऱ्यांसह पथक रवाना
सदाशिव फुले। नवराष्ट्र पिंपळगाव पेठ: राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हेच ध्येय न ठेवता, उत्पादीत होणाऱ्या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे अत्यंत आवश्यक असल्याचे शासनाचे धोरण आहे. शेतीशी निगडीत घटकांमध्ये जगभरात होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान आणि त्याचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणारा सकारात्मक परिणाम थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून देशाबाहेरील अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत आहेत.

या पार्श्वभूमीवर सिल्लोड तालुका कृषी अधिकारी डॉ संदीप जगताप यांची इस्त्राईल अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याने कृषी विभागासह शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. इस्त्राईल हा देश अल्प पाण्यात अधिक उत्पादन, ठिबक व तुषार सिंचन, हरितगृह तंत्रज्ञान, भाजीपाला व फळबाग लागवड, पाणी पुनर्वापर यांसाठी जागतिक पातळीवर ओळखला जातो.

संभाजीनगरमध्ये हायड्रोलिक चाचणीला ‘ब्रेक’! कंत्राटदाराची हमीपत्रानंतरही टाळाटाळ; प्रशासनाचा चाचणी न घेण्याचा निर्णय

या अभ्यास दौऱ्यांतर्गत निवड झालेल्या कृषी अधिकारी संबंधित देशांतील शास्त्रज्ञ, प्रगत शेतकरी यांच्याशी थेट चर्चा करणार असून, क्षेत्रीय भेटी, कृषी संशोधन संस्था व आधुनिक शेती प्रकल्पांना भेटी देऊन तेथील यशस्वी तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करणार आहेत. या ज्ञानाचा उपयोग भविष्यात तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके व मार्गदर्शनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

वेगवेगळ्या देशात दौरा

राज्य शासनाकडून दरवर्षी शेतकऱ्यांसहाठी अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात. यावेळी शेतकऱ्यांसाठी युरोप नेदरलँड़, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इसाईल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाइन्स, चीन व दक्षिण कोरिया या देशांचे दौरे आयोजित करण्यात आले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar: CTET केंद्रावर मंगळसूत्र उतरवल्याने संताप! हिंदू जनजागृती समितीची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

Web Title: Farmers will take lessons in modern agriculture in israel a special 10 day study tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • agriculture
  • Chhatrapati Sambhajinagar
  • farmer
  • Israel
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Flydubai: दुबई-तेल अवीव विमानाकडून आला हायजॅक अलर्ट, सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग; नेतान्याहूंनी बोलावली आपत्कालीन बैठकी
4

Flydubai: दुबई-तेल अवीव विमानाकडून आला हायजॅक अलर्ट, सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग; नेतान्याहूंनी बोलावली आपत्कालीन बैठकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.