BSE Q1 Results Marathi News: स्टॉक एक्सचेंज बीएसई लिमिटेडचे एप्रिल-जून २०२५ या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाले आहेत. कंपनीने ५३९.४१ कोटी रुपयांचा निव्वळ एकत्रित नफा कमावला आहे. हा गेल्या वर्षीच्या २६५.०५ कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा १०३.५ टक्के जास्त आहे. ऑपरेशन्समधून एकत्रित महसूल वर्षानुवर्षे ५९ टक्क्यांहून अधिक वाढून ९५८.३९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो जून २०२४ च्या तिमाहीत ६०१.८७ कोटी रुपयांचा होता.