Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन आयकर प्रणालीत मोठे बदल, तुम्हाला किती भरावा लागणार कर? करमर्यादा आता इतक्या रुपयांपर्यंत वाढली

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात जुनी कर व्यवस्था निवडणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली नाही. मात्र नवीन कर प्रणालीतील स्लॅबमधील बदल आणि मानक वजावट 25 हजार रुपयांनी वाढल्याने पगारदार वर्गाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 23, 2024 | 02:45 PM
नवीन आयकर प्रणालीत मोठे बदल, तुम्हाला किती भरावा लागणार कर? (फोटो सौजन्य-ट्विटर)

नवीन आयकर प्रणालीत मोठे बदल, तुम्हाला किती भरावा लागणार कर? (फोटो सौजन्य-ट्विटर)

Follow Us
Close
Follow Us:

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. मंगळवारी (23 जुलै) सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात वित्त अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पगारदार वर्गासाठी मोठी घोषणा केली आहे. कर स्लॅबमध्ये बदल करण्याच्या मध्यमवर्गाच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीला सरकारने दिलासा दिला आहे.

संसदेत अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की सरकारकडून नवीन कर प्रणाली सुलभ केली जात आहे. दोन तृतीयांश करदाते नवीन कर प्रणाली अंतर्गत आले आहेत. नवीन कर प्रणाली अंतर्गत, मानक वजावट मर्यादा 50 हजार रुपयांवरून 75000 रुपये करण्यात आली आहे. या बदलामुळे सरकारचे 37000 कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे ते म्हणाले. सरकारने केलेल्या बदलांचा थेट फायदा ४ कोटी करदात्यांना होणार आहे.

हे सुद्धा वाचा: सोनं-चांदी खरेदीदारांसाठी खुशखबर! सोन्या-चांदीवरही शुल्क घटले, पाहा आजचे दर

याशिवाय, अर्थमंत्र्यांनी नवीन कर प्रणालीच्या कर स्लॅबमध्येही मोठे बदल केले आहेत. नवीन बदलानुसार, नवीन कर प्रणालीमध्ये 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर भरावा लागेल. 3 ते 7 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के कर लागेल. 7 ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के कर भरावा लागेल. 10 ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15 टक्के कर भरावा लागेल. 12 ते 15 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 20 टक्के कर आकारला जाईल. 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के कर भरावा लागेल.

जुन्या कर प्रणालीत दिलासा नाही
जुन्या करप्रणालीत अर्थमंत्र्यांनी जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा दिलेला नाही. स्टँडर्ड डिडक्शनबाबत जुन्या नियमात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच तुम्हाला जुन्या कर प्रणाली अंतर्गत फक्त 50,000 रुपयांची मानक वजावट मिळेल. याशिवाय, आरोग्य विमा प्रीमियम आणि 80C बाबत सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

नवीन कर प्रणाली म्हणजे काय आहे?

नव्या करप्रणालीचा पर्याय निवडणाऱ्या पगारदार वर्गाला सरकारने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. अर्थमंत्र्यांनी नवीन कर प्रणाली अंतर्गत आयकर स्लॅबमध्ये बदल केले आहेत. पूर्वीची 50,000 रुपयांची मानक वजावट वाढवून 75,000 रुपये करण्यात आली आहे. पूर्वीप्रमाणेच 0 ते 3 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. यानंतर ३ ते ७ लाख रुपयांवर ५ टक्के कर भरावा लागेल. 7 ते 10 रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के कर भरावा लागेल. 10 ते 12 लाखांच्या उत्पन्नावर 15 टक्के, 12 ते 15 लाखांच्या उत्पन्नावर 20 टक्के आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर भरावा लागेल.

जुनी कर व्यवस्था काय आहे?

जुन्या कर प्रणालीमध्ये 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही. यानुसार करदात्यांना २.५ लाख ते ५ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर ५ टक्के दराने कर भरावा लागेल. वार्षिक उत्पन्न 5 लाख ते 10 लाख रुपये असेल तर 20 टक्के दराने कर भरावा लागेल. परंतु 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर लावला जाईल. परंतु या अंतर्गत तुम्हाला अनेक प्रकारचे कर लाभ मिळतात.

Web Title: Changes in the new income tax system old vs proposed income tax slabs under new regime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 02:44 PM

Topics:  

  • Budget 2024
  • New tax slabs
  • Union Budget 2024

संबंधित बातम्या

1 एप्रिलपासून लागू होणार नवीन टॅक्स स्लॅब, करात मोठी सवलत मिळणार, पगार किती वाढणार जाणून घ्या?
1

1 एप्रिलपासून लागू होणार नवीन टॅक्स स्लॅब, करात मोठी सवलत मिळणार, पगार किती वाढणार जाणून घ्या?

New GST Rules: GST नियमांमध्ये मध्ये मोठा बदल, १ एप्रिल पासून लागू होणार ISD प्रणाली
2

New GST Rules: GST नियमांमध्ये मध्ये मोठा बदल, १ एप्रिल पासून लागू होणार ISD प्रणाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.