उत्पादनाला योग्य किंमत देऊन पुरवठा करणार, अर्थमंत्र्यांची घोषणा
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारताचा अर्थसंकल्प सादर करत आहे. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात शेअतकऱ्यांसाठी विशेष घोषणा केली आहे. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत १ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत देऊन पुरवठा करणार अशा महत्वाची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
सरकार डाळींसाठी ६ वर्षांची आत्मनिर्भरता योजना लागू करणार आहे. तसेच फळ आणि भाजी उत्पादकांवर विशेष लक्ष असणार आहे. योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यावर लक्ष देणार. उत्पादन वाढवणं आणि वितरण करणे यावर सुद्धा सरकारचे विशेष लक्ष असणार आहे. मखाण्याचे उत्पादन वाढवणार असे देखील अर्थमंत्रीनी सांगितले आहे. कापूस उत्पदनावर सुद्धा विशेष लक्ष देणार आहे.
अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना कमी उत्पादकता असलेल्या १०० जिल्ह्यांना व्यापेल. यामुळे कृषी उत्पादकता वाढेल, पीक विविधीकरण आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब केला जाईल, आणि सिंचन सुविधा सुधारतील. तसेच दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्ज उपलब्ध होईल.
मत्स्य उत्पादन आणि जलसंवर्धनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हीच बाब लक्षात घेऊन ,सीतारामन म्हणाल्या यांनी या क्षेत्रावर विशेष लक्षकेंद्रित केले आहे.
मोदी सरकार अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर विशेष लक्ष केंद्रित करून भारतीय विशेष आर्थिक क्षेत्र आणि उच्च समुद्रांमधून मत्स्यव्यवसायाच्या शाश्वत वापरासाठी एक चौकट सादर करेल.