Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘टाटा’ची वाहने खरेदी करणे झाले सोपे; बजाज फायनान्सकडून तात्काळ मिळणार अर्थसहाय्य!

देशातील आघाडीची औद्योगिक वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने बजाज फायनान्स या वित्तीय पुरवठादार समूहासोबत सामंजस्य करार केला आहे. ज्यामुळे आता वाहन खरेदीदारांना तात्काळ कर्जाऊ रक्कम मिळण्यास मदत होणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jun 25, 2024 | 03:59 PM
'टाटा'ची वाहने खरेदी करणे झाले सोपे, बजाज फायनान्सकडून तात्काळ मिळणार अर्थसहाय्य!

'टाटा'ची वाहने खरेदी करणे झाले सोपे, बजाज फायनान्सकडून तात्काळ मिळणार अर्थसहाय्य!

Follow Us
Close
Follow Us:

देशभरातील वाहन खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने, देशातील प्रमुख वित्तीय सेवा पुरवणाऱ्या समूहांपैकी एक असलेल्या बजाज फायनान्ससोबत करार केला आहे. प्रामुख्याने औद्योगिक वाहनांच्या खरेदीदारांना झटपट कर्जासाठी टाटा मोटर्सकडून बजाज फायनान्स सोबत हा करार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता जे लोक टाटा मोटर्सच्या बस, ट्रक, मिनी ट्रॅक आणि पिकअपसह अन्य वाहनांच्या खरेदीचा विचार करत आहे. त्यांना या करारामुळे मोठा फायदा होणार आहे.

देशभरातील उद्योजकांना फायदा होणार

या कराराबाबत बोलताना टाटा मोटर्सचे बिझनेस हेड राजेश कौल यांनी सांगितले आहे की, टाटा मोटर्स कंपनी बजाज फायनान्ससोबत करार करत खूप आनंदित आहे. कंपनीच्या ग्राहकांना त्यांचे आर्थिक समस्येचे निदान वाहन खरेदीदरम्यानच होणार आहे. ज्यामुळे त्यांच्या वाहन खरेदीतील अडचणी तात्काळ दूर होणार आहे. अर्थात कंपनीच्या वाणिज्यिक वाहनांच्या खरेदीदरम्यान ग्राहकांना अर्थसाहाय्य करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या करारामुळे देशभरातील उद्योजकांना फायदा होणार आहे.

ग्राहकांना आर्थिक मदतीचा हात देणे हाच उद्देश

तर कराराबाबत बोलताना बजाज फायनान्स कंपनीचे उप-व्‍यवस्‍थापकीय संचालक अनुप साहा यांनी म्हटले आहे की, ”बजाज फायनान्‍सकडून आपल्या ग्राहकांना सर्वोच्च प्राथमिकता दिली जाते. यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांना समाधानकारक अर्थसहाय्य करत, त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगतीपथावर नेण्यासाठी मदतगार ठरते. टाटा मोटर्ससोबत झालेला हा सामंजस्य करार हा ग्राहकांना आर्थिक मदतीचा हात देणे, याच उद्देशाने करण्यात आलेला आहे. बजाज फायनान्स कंपनीला आशा आहे की, यामुळे अधिकाधिक वाणिज्यिक वाहन खरेदीदारांना यामुळे फायदा होईल.”

टाटा मोटर्स प्रामुख्याने 1 टन ते 55 टन क्षमतेची मालवाहू वाहने आणि 10 सीटर ते 51 सीटर अशी प्रवाशी वाहने निर्मिती करते. यामध्ये लहान व्यावसायिक वाहने आणि पिकअप, ट्रक आणि बसचा देखील समावेश आहे. तर बजाज फायनान्स ही भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण एनबीएफसीपैकी एक आहे. कंपनी 83.64 दशलक्षाहून अधिक ग्राहकांना कर्ज, ठेव आणि पेमेंट सेवा प्रदान करते. 31 मार्च 2024 पर्यंत कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता 3,30,615 कोटी रुपये इतकी होती.

Web Title: Buying tata vehicles made easy instant financing from bajaj finance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2024 | 03:59 PM

Topics:  

  • Business News
  • Tata Group
  • Tata Moters

संबंधित बातम्या

Explainer: Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताय? ‘या’ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
1

Explainer: Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताय? ‘या’ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

बेरोजगारीचा धोका वाढतोय, भारताने रोजगार निर्मितीवर दुहेरी भर द्यावा; मॉर्गन स्टॅनलीचा अहवाल
2

बेरोजगारीचा धोका वाढतोय, भारताने रोजगार निर्मितीवर दुहेरी भर द्यावा; मॉर्गन स्टॅनलीचा अहवाल

Share Market Crash: शेअर बाजारात मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले
3

Share Market Crash: शेअर बाजारात मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले

Karjat News : टोरंटनंतर आता नव्या प्रकल्पाचं सावट ; टाटा जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध
4

Karjat News : टोरंटनंतर आता नव्या प्रकल्पाचं सावट ; टाटा जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.