
Cash Withdrawal without ATM Card
Cash Withdrawal without ATM Card: जेव्हा तुम्हाला एटीएम मधून पैसे काढायचे असतात मात्र, तुमच्याकडे एटीएम कार्ड नसते तेव्हा, तुम्हाला बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागते. किंवा अचानक एटीएम कार्ड हरवते किंवा चोरीला जाते अशावेळी तुम्हाला पैशाची गरज पडल्यावर तुम्हाला सुचेनासे होते. तेव्हा तुमच्याकडे बँकेत जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. मात्र, आता देशभरातील बँकांनी नवे फीचर सुरू केले आहे. ज्यामुळे तुम्हाला एटीएम मधून कार्डलेस पैसे काढतात येतील.
सर्व बँकांनी UPI Cardless Cash Withdrawal Feature सुरू केले आहे. ज्यामुळे तुम्ही एटीएम कार्डशिवाय एटीएम मशीनमधून पैसे काढू शकणार आहात. तेही UPI स्कॅन करून पैसे काढता येतील. म्हणजेच, गुगल पे, फोनपे किंवा भीम अॅपवरून तुम्ही थेट एटीएममधून पैसे काढू शकता. हे नवे फीचर फक्त जलद नसून सुरक्षित असल्याचेही बँकांनी सांगितले आहे. कारण, एटीएममधून पैसे काढताना तुम्हाला कार्डची किंवा पिनची गरज लागणार नाही. तसेच, स्किमिंग, कार्ड क्लोनिंग किंवा चोरी यांसारखे धोके सुद्धा टळतील.
आयसीसीडब्ल्यू म्हणजेच Interoperable Cardless Cash Withdrawal असे या फीचरचे नाव असून यामुळे तुम्ही एटीएममधून एटीएम कार्डशिवाय फक्त यूपीआय स्कॅन करून पैसे काढू शकतो.
UPI स्कॅन करून काढा एटीएम मशीनमधून पैसे
या फीचरमुळे ग्राहक एटीएममध्ये UPI अॅप वापरुन जास्तीत जास्त 10 हजार रुपये काढू शकतात. फोनपे, गुगलपे किंवा पेटीअम यांसारख्या UPI अॅपवरुन UPI कॅश विथड्रॉवल फीचरचा वापर करू शकता. ज्या एटीएममध्ये ICCW फीचर आहे. त्याच एटीएममधून तुम्ही हे UPI फीचर वापरुन पैसे काढू शकता.
ICCW या फीचरचे फायदे