फोटो सौजन्य- Official Website
हिरो मोटोर्कापॅ या जगातील सर्वात मोठ्या मोटरसायकल व स्कूटर उत्पादक कंपनीने विशेष कलेक्टर्स एडिशन मोटरसायकल ‘द सेन्टेनियल’साठी लिलावाचे समापन केले आहे. बारकाईने डिझाइन करण्यात आलेली ही मोटरसायकल कंपनीचे दूरदर्शी संस्थापक व चेअरमन एमेरिटस डॉ. ब्रिजमोहन लाल मुंजाल यांचे स्मरण करते.फक्त १०० युनिट्स उत्पादित करण्यासह प्रत्येक मोटरसायकल आवड व रचनेचे प्रतीक आहे. फक्त कंपनीचे डिलर्स, पुरवठादार, व्यवसाय सहयोगी आणि कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित या लिलावाने अनपेक्षित उत्साह निर्माण केला, जेथे मोटरसायकल नंबर सीई१०० साठी २०.३० लाख रूपयांची सर्वोच्च बोली लागली. ७५ युनिट्ससाठी एकूण बोली रक्कम ८.५८ कोटी रूपयांपर्यंत पोहोचली. यामधून कलेक्टर्स मोटरसायकल्सचे अपवादात्मक मूल्य, लक्षवेधकता आणि विशिष्ट आकर्षकता दिसून येते.
उर्वरित २५ बाइक्स कर्मचाऱ्यांना व ग्राहकांना स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येतील
लक्षणीय बाब म्हणजे, या लिलावामधून मिळालेला निधी चॅरिटेबल उपक्रमांसाठी वापरण्यात येईल, ज्यामुळे समाजाचे ऋण फेडण्याची त्यांची परंपरा कायम राहिल. उर्वरित २५ बाइक्स हिरो मोटोकॉर्प फॅसिलिटीजमध्ये प्रदर्शनार्थ ठेवण्यात येतील आणि कर्मचाऱ्यांना व ग्राहकांना स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येतील.
हिरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. पवन मुंजाल हे या उपक्रमाच्या प्रतिसादाबद्दल म्हणाले की, ‘द सेन्टेनियल’ला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामधून हिरो मॉटोकॉर्पचे चेअरमन एमेरिटस डॉ. ब्रिजमोहन लाल मुंजाल यांच्याप्रती कौतुक व आदर दिसून येतो. ही मास्टरपीस त्यांच्या मूल्यांचे प्रतीक आहे आणि त्यांनी मागे सोडलेल्या उल्लेखनीय वारसाप्रती दीर्घकालीन मानवंदना आहे.
ते पुढे म्हणाले की, माझे वडिल समाजाचे ऋण फेडण्याप्रती कटिबद्ध होते आणि त्यांनी स्थापना केलेल्या संस्थांच्या माध्यमातून त्यांची तत्त्वे व दृष्टीकोन आजही प्रेरित करत आहेत. मी संपूर्ण हिरो समुदायाचे त्यांच्या व्यापक योगदानांसाठी, तसेच चॅरिटेबल उपक्रमांकरिता निधी उभारण्यास साह्य करण्यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो.आमच्या ‘ग्राहक-केंद्रित’ तत्त्वाशी बांधील राहत आम्हाला एआाय-समर्थित स्पर्धेच्या माध्यमातून बहुमूल्य भागधारकांसाठी, तसेच जगभरातील आमच्या ११८ दशलक्षहून अधिक ग्राहकांसाठी ही मास्टरपीस सादर करण्याचा आनंद होत आहे.
सेन्टेनियल कलेक्टर्स एडिशन बाइक जिंकण्यासाठी ग्राहकांकरिता स्पर्धा
विशेष एआय-समर्थित स्पर्धेमध्ये ११८ दशलक्षहून अधिक हिरो मोटोकॉर्प ग्राहकांना या ऐतिहासिक मास्टरपीसचे मालक बनण्याची जीवनातील अमूल्य संधी मिळेल. ही स्पर्धा दोन टप्प्यांमध्ये राबवण्यात येईल. पहिल्या टप्प्यामध्ये, सहभागींना त्यांचे फोटो आणि हिरो उत्पादनाचा त्यांच्या जीवनावर झालेल्या प्रभावाबाबतच्या गाथा myheroforever@heromotocorp.com येथे ईमेल करणे आवश्यक आहे.
दुसऱ्या टप्प्यामध्ये, जनरेशन एआयचा उपयोग करत प्रत्येक सहभागीच्या हिरो प्रवासाचे वैयक्तिकृत व्हिज्युअल सादरीकरण तयार केले जाईल. त्यानंतर, सहभागींनी नाविन्यपूर्ण एआय फिल्टर #MyForeverHero चा उपयोग करत व्हिडिओ तयार करून त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करणे आवश्यक आहे. पॅनेल प्रवेशिकांचे पुनरावलोकन करतील आणि सर्वात प्रेरणादायी गाथेला विजेती प्रवेशिका म्हणून निवडतील.
द सेन्टेनियल बाईक
‘द सेन्टेनियल’ रचना व डिझाइनची मास्टरपीस आहे. या अपवादात्मक मोटरसायकलचा प्रत्येक पैलू बारकाईने डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामधून मोटरसायकलचा अद्वितीय दर्जा दिसून येतो. वजनाने हलके अॅल्युमिनिअम स्विंगआर्म आणि कार्बन फायबर बॉडी पॅनेल्स कार्यक्षमता व कामगिरीमध्ये वाढ करतात, तसेच त्यामधून आधुनिक आकर्षकता देखील दिसून येते. या मोटरसायकलमध्ये कस्टम घटकांसह प्रीसिशन-मशिन्ड हँडलबार्स, रिअर-सेट फूट पेग्स आणि अॅक्रापोविकची टॉप-ऑफ-द-लाइन कार्बन फायबर व टायटॅनियम एक्झॉस्ट सिस्टम आहे. सोलो सीटसह कार्बन फायबर काऊल आणि एक्सक्लुसिव्ह स्पेशल एडिशन नंबर्ड बॅजिंग असलेल्या ‘द सेन्टेनियल’चा हिरो मोटोकॉर्पच्या प्रेरणादायी वारसामध्ये अपवादात्मक दर्जा आहे.