Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSMIA ६५,००० हून अधिक हज यात्रेकरूंच्‍या प्रवासाची हाताळणी करण्‍यास सज्‍ज, २०२४ मध्‍ये वार्षिक १५७ टक्‍क्‍यांची वाढ होण्‍याची अपेक्षा

सीएसएमआयए मे २०२४ ते जुलै २०२४ दरम्‍यान आगमन व निर्गमनांसह ६५,००० हून अधिक प्रवाशांची हाताळणी करण्‍यास सज्‍ज आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: May 28, 2024 | 03:08 PM
CSMIA ६५,००० हून अधिक हज यात्रेकरूंच्‍या प्रवासाची हाताळणी करण्‍यास सज्‍ज, २०२४ मध्‍ये वार्षिक १५७ टक्‍क्‍यांची वाढ होण्‍याची अपेक्षा
Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (सीएसएमआयए) यंदा हज यात्रेमध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावण्‍यास सज्‍ज आहे. विमानतळाला मुंबईतून सौदी अरेबियाला प्रवास करणाऱ्या ३३,००० यात्रेकरूंना निर्गमनाची सुविधा देण्‍याची अपेक्षा आहे. सीएसएमआयए मे २०२४ ते जुलै २०२४ पर्यंत आगमन व निर्गमनांसह ६५,००० हून अधिक प्रवाशांची हाताळणी करण्‍यास सज्‍ज आहे. या महत्त्वपूर्ण कार्यसंचालनामधून सीएसएमआयएचे भारतातील हज यात्रेसाठी प्रमुख निर्गमन स्‍थळ म्‍हणून महत्त्व दिसून येते. सीएसएमआयए टप्‍प्याटप्‍प्‍याने व समन्‍वयित दृष्टीकोनासह प्रवाशांच्‍या वाढत्‍या रहदारीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास पूर्णपणे सज्‍ज आहे.

वर्ष २०२४ मध्‍ये सीएसएमआयएच्‍या माध्‍यमातून प्रवास करणाऱ्या हज यात्रेकरूंच्‍या आकडेवारीत वार्षिक १५७ टक्‍क्‍यांची वाढ होण्‍याची अपेक्षा आहे, तुलनेत २०२३ मध्‍ये विमानतळावरून १२,८१५ यात्रेकरूंनी प्रवास केला होता. सीएसएमआयएवरून वार्षिक हज फ्लाइट्स वर्षभरात दोन महिन्‍यांच्‍या कालावधीसाठी कार्यरत असतात. २०२४ साठी डिपार्चर फ्लाइट्स २५ मेपासून सुरू झाल्‍या आहेत आणि १२ जूनपर्यंत कार्यरत राहणार आहे. परत येणाऱ्या यात्रेकरूंचे आगमन जुलै २०२४ मध्‍ये सुरू होण्‍यासाठी तात्‍पुरते नियोजन करण्‍यात आले आहे.

[read_also content=”इंडिगो फ्लाइटला बॉम्बची धमकी, प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या अन्… पाहा VIDEO https://www.navarashtra.com/india/delhi-to-varanasi-indigo-flight-evacuated-due-to-bomb-threat-all-passengers-safe-539269.html”]

सीएसएमआयए सौदी अरेबियाकरिता प्रबळ वेळापत्रकाचे नियोजन करते, जेथे इंडिगो, एअर इंडिया, विस्‍तारा व सौदीया एअरलाइन्‍स यासारख्‍या एअरलाइन्‍स एकत्रित दररोज ११ फ्लाइट्स ऑपरेट करतात. हजच्‍या वर्दळीच्‍या काळात सौदीया एअरलाइन्‍सवर सीएसएमआयएमधून ऑफिशियल हज रहदारीची हाताळणी करण्‍याची जबाबदारी असेल. यात्रेकरूंच्‍या प्रवासामधील लक्षणीय वाढीची पूर्तता करण्‍यासाठी १०१ अतिरिक्‍त फेरी फ्लाइट्स निर्गमन व आगमनांसाठी नियोजित करण्‍यात आल्‍या आहेत, ज्‍यामधून सर्व हज यात्रेकरूंना आरामदायी व कार्यक्षम प्रवास अनुभव देण्‍याप्रती सीएसएमआयएची कटिबद्धता दिसून येते.

तसेच, सीएसएमआयए टर्मिनल २ मध्‍ये विशेषत: हज यात्रेकरूंना सुविधा व सेवांची सर्वसमावेशक श्रेणी देण्‍यास सज्‍ज आहे. या सुधारणा हा महत्त्वपूर्ण प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सुलभ व आरामदायी अनुभव देण्‍यासाठी करण्‍यात आला आहेत.

  • प्रमुख सुविधा पुढीलप्रमाणे:
    • स्‍वतंत्र अप्रोच रोड: निर्गमन स्‍तरावर समर्पित अप्रोच रोड हज यात्रेकरूंना सोयीसुविधा व प्रत्‍यक्ष प्रवेश सुलभ असण्‍याची खात्री देतो.
    • समर्पित ड्रॉप-ऑफ पॉइण्‍ट: हज यात्रेकरूंच्‍या विशेष वापरासाठी विशिष्‍ट ड्रॉप-ऑफ लोकेशन नियुक्‍त करण्‍यात आले आहे.
    • विशेष पार्किंग व लिफ्ट्स: हज यात्रेकरूंना घेऊन जाणारी वाहने एमएलसीपी पी९ येथे समर्पित पार्किंगचा वापर करू शकतात. विशेषत: हज यात्रेकरूंसाठी पूर्वेकडे पी९ व पी१० दरम्‍यान दोन लिफ्ट्स कार्यरत असतील.
    • एकप्रवाहित सुलभता: यात्रेकरू पी१० ईस्‍ट साइड येथील एमएलसीपी येथे बाहेर पडू शकतात, गेट २ कडे जात चेक-इनसाठी डिपार्चर एण्‍ट्री गेट ३ मध्‍ये प्रवेश करू शकतात.
    • समर्पित चेक-इन एरिया: चेक-इन आयलँड सी विशेषत: हज कार्यसंचालनांसाठी आरक्षित करण्‍यात आले आहे.
    • स्‍पेशल स्क्रिनिंग एरिया: हज यात्रेकरूंसाठी सुलभ सुरक्षिता प्रक्रियेची सुविधा देण्‍यासाठी समर्पित तपासणी क्षेत्र स्‍थापित करण्‍यात आले आहे.
    • इमिग्रेशन काऊंटर्स: हज यात्रेकरूंच्‍या इमिग्रेशन तपासणी प्रक्रियेकरिता विशिष्‍ट काऊंटर्स नियुक्‍त करण्‍यात आले आहेत.
    • समर्पित बोर्डिंग गेट्स: सर्व हज निर्गमनांसाठी बोर्डिंग गेट्स ४६, ४७ व ४८ नियुक्‍त करण्‍यात आले आहेत.
    • आरामदायी सुविधा: यात्रेकरूंसाठी स्‍वतंत्र आसन व्‍यवस्‍था, महिला व पुरूषांसाठी समर्पित नमाज कक्ष आणि स्‍वतंत्र वाजू क्षेत्र देण्‍यात आले आहेत.
    • वरिष्‍ठ अधिकारी तैनात: सीएसएमआयएमधील समर्पित वरिष्‍ठ अधिकारी सर्व हज फ्लाइट्ससाठी हज स्‍वयंसेवक व एअरलाइन्‍ससोबत व्‍यवस्‍थापन आणि समन्‍वय साधण्‍यासाठी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत.

सीएसएमआयएला हजचे आध्‍यात्मिक महत्त्व ओळखत हज यात्रेकरूंना पाठिंबा देण्‍याचे सन्‍माननीय वाटते. सीएसएमआयए या वर्षी आगमन व निर्गमनांसह जवळपास ६५,००० यात्रेकरूंची हाताळणी करण्‍यास सज्‍ज असताना विमानतळ विनासायास, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास अनुभवाची खात्री घेण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आहे. सीएसएमआयए अपवादात्‍मक आदरातिथ्‍य दाखवण्‍यासाठी सज्‍ज आहे, तसेच हजारो हज यात्रेकरूंसाठी हा प्रवास सुलभ करण्‍याप्रती कटिबद्ध आहे.

Web Title: Csmia ready to handle more than 65000 haj pilgrims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2024 | 03:08 PM

Topics:  

  • Business News
  • CSMIA

संबंधित बातम्या

नफ्यात तुफान वाढ, शेअरहोल्डर्सना मोठी भेट! रू. 24 चा शेअर मिळणार रू50 चा लाभांश
1

नफ्यात तुफान वाढ, शेअरहोल्डर्सना मोठी भेट! रू. 24 चा शेअर मिळणार रू50 चा लाभांश

अनिल अंबानीच्या ‘या’ कंपनीमध्ये 5% तेजी, सरकारी कंपनी ज्यांना मिळाले प्रोजेक्ट
2

अनिल अंबानीच्या ‘या’ कंपनीमध्ये 5% तेजी, सरकारी कंपनी ज्यांना मिळाले प्रोजेक्ट

आघाडीचा फॅशन ब्रॅंड Libas चे मुंबईत नवे स्टोअर सुरु, वर्षाअखेरपर्यंत 50 पेक्षा जास्त शाखा उघडण्याचे लक्ष
3

आघाडीचा फॅशन ब्रॅंड Libas चे मुंबईत नवे स्टोअर सुरु, वर्षाअखेरपर्यंत 50 पेक्षा जास्त शाखा उघडण्याचे लक्ष

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या
4

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.