Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिटायरमेंट फंड हवाय मोठा? तर वय आणि काळासह इक्विटी-डेब्ट गुंतवणुकीत ‘असा’ करा बदल; शीतल देशपांडे यांचा मोलाचा सल्ला

निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. १०० वजा वय या सूत्राचा वापर करून इक्विटी आणि डेब्टमध्ये कसा समतोल साधावा आणि महागाईवर मात करून मोठा फंड कसा उभा करावा? वाचा महत्वाचा लेख.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 24, 2026 | 06:02 PM
रिटायरमेंट फंड हवाय मोठा? तर वय आणि काळासह इक्विटी-डेब्ट गुंतवणुकीत 'असा' करा बदल (Photo Credit- X)

रिटायरमेंट फंड हवाय मोठा? तर वय आणि काळासह इक्विटी-डेब्ट गुंतवणुकीत 'असा' करा बदल (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • रिटायरमेंट फंड हवाय मोठा?
  • तर वय आणि काळासह इक्विटी-डेब्ट गुंतवणुकीत ‘असा’ करा बदल
  • शीतल देशपांडे यांचा मोलाचा सल्ला
Retirement Planning Investment Tips: निवृत्तीचे नियोजन हा जीवनातील आर्थिक सुरक्षिततेचे सर्वात महत्त्‍वपूर्ण पैलू आहे. या नियोजनामुळे निवृत्तीनंतरच्‍या जीवनामध्‍ये आर्थिक सुरक्षितता, स्थिरता आणि समाधानाची खात्री मिळते. कामामधून निवृत्त झाल्‍यानंतर तुमचे नियमित उत्‍पन्‍न बंद होते, पण खर्च सुरू राहतात, ज्‍यामध्‍ये वैद्यकीय गरजांमुळे अधिक भर होते. योग्‍य नियोजन केले नाही तर जीवनशैली टिकवून ठेवण्‍यासाठी, जीवनावश्‍यक खर्चाची पूर्तता करण्‍यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. निवृत्तीचे नियोजन काळासह या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी आवश्‍यक असलेला पुरेसा निधी जमा होण्‍यास मदत करते, ज्‍यासह तुम्‍ही निवृत्तीनंतरचे जीवन कोणत्‍याही अर्थिक अडचणीशिवाय आरामात व स्‍वावलंबीपणे जगू शकाल.

निवृत्तीसाठी गुंतवणूक करताना गुंतवणूक किमान आर्थिक विकास आणि महागाई यानुसार वाढली पाहिजे. किमान परताव्याचे लक्ष्‍य ठरवताना आर्थिक विकास दर आणि ‘महागाई दर यांचा विचार केला पाहिजे. तुमची गुंतवणूक महागाईपेक्षा संथ गतीने वाढत असेल तर जीवनाश्‍यक गरजांची पूर्तता करण्‍यामध्‍ये आणि निवृत्तीची उद्दिष्टे गाठण्यामध्‍ये अडथळे येऊ शकतात. म्हणून, निवृत्तीचे ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी आणि डेब्‍ट (कर्ज) यांचे योग्य मिश्रण असणे आवश्यक आहे.

इक्विटी (Equity) म्हणजे शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणे. इक्विटी दीर्घकाळापर्यंत उच्‍च वाढ किंवा परतावा देते, पण बाजारपेठेतील चढ-उतारामुळे यामध्‍ये जोखीम देखील असते. डेब्‍टमध्ये मुदत ठेवी, बाँड्स, सरकारी बचत योजना आणि डेब्‍ट म्युच्युअल फंडांचा समावेश असतो. डेब्‍टमधील गुंतवणूक स्थिर आणि सुरक्षित परतावा देते. हे तुमच्या भांडवलाचे संरक्षण करते आणि पोर्टफोलिओमधील चढ-उतार कमी करते. योग्‍य निवृत्ती नियोजन इक्विटी आणि डेब्‍ट यांचे उत्तम संयोजन करून वाढ आणि सुरक्षा यामध्‍ये संतुलन देते. इक्विटी दीर्घकालीन वाढ करते, तर डेब्‍ट मोठ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण करते. जीवनातील विविध टप्प्यांनुसार इक्विटी आणि डेब्‍टचे प्रमाणे बदलत राहिल्‍यास मालमत्ता निर्मिती व भांडवल वाढीची खात्री मिळते.

Sonata: जिद्द, आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा! सोनाटाचा ‘Watch Out For Us’ कॅम्पेन चर्चेत

वयानुसार इक्विटी आणि डेब्‍टमध्ये किती गुंतवणूक करावी हे ठरवण्याचा सोपा मार्ग म्हणजे वयावर आधारित सूत्रांचा वापर करणे, जे तुमचे वय वाढेल तसे जोखीम नैसर्गिकरित्या कमी करतील. यामध्ये सर्वात समान्‍य नियम म्हणजे ‘१०० मायनस एज’ सूत्र. या सूत्रानुसार तुमच्या सध्याच्या वयाला १०० मधून वजा केल्यास येणारी संख्या म्हणजे तुमची इक्विटीमधील गुंतवणूक असली पाहिजे आणि उर्वरित रक्‍कम डेब्‍टमध्ये गुंतवली पाहिजे. उदाहरणार्थ, ३० वर्षे वय असलेल्या व्यक्‍तीने ७० टक्‍के गुंतवणूक इक्विटीमध्ये आणि ३० टक्‍के गुंतवणूक डेब्‍टमध्ये केली पाहिजे.

तुम्‍ही तरूण असाल तर अधिक जोखीम घेऊ शकता, कारण तुमच्‍याकडे बाजारपेठेतील चढ-उतारांमधून सावरण्यासाठी पुरेसा वेळ असतो. म्‍हणून दीर्घकाळापर्यंत वाढीसाठी इक्विटीमध्‍ये ७० ते ८० टक्‍के गुंतवणूक करू शकता. निवृत्तीची वेळ जवळ येईल तसे बचत सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. म्‍हणून मोठे नुकसान टाळण्‍यासाठी अनेक व्‍यक्‍ती वयाच्या ५०व्या वर्षाच्या उत्तरार्धात आणि ६०व्या वर्षाच्या सुरुवातीला ५० टक्‍के किंवा त्याहून अधिक गुंतवणूक डेब्‍टमध्‍ये करतात. या बदलाचे व्‍यवस्थापन करण्‍याचा सोपा मार्ग म्‍हणजे ग्‍लाइड पाथ म्‍हणजे वयानुसार गुंतवणूक करण्‍यासंदर्भात बदलणारे धोरण, जे काळासह इक्विटीचे प्रमाण कमी करते आणि डेब्‍टचे प्रमाण वाढवते, ज्‍यामुळे वाढत्‍या वयानुसार जोखीमवर नियंत्रण ठेवण्‍यास मदत होते.

काळासह बाजारपेठ, उत्‍पन्‍न आणि तुमची उद्दिष्टे बदलू शकतात, ज्‍यामुळे दरवर्षी तुमच्या पोर्टफोलिओचा आढावा घेणे आवश्यक आहे. यामुळे इक्विटी व डेब्‍टचे संयोजन तुमची जोखीम स्वीकारण्याची क्षमता, जीवनातील टप्पा आणि आर्थिक ध्‍येयांशी सुसंगत राहण्यास मदत होते. वाढत्या आयुर्मानामुळे आता अधिक मोठ्या निवृत्ती निधीची गरज आहे, ज्यामुळे लवकर नियोजन, शिस्तबद्ध बचत आणि संतुलित गुंतवणूक दृष्टिकोन अत्यंत आवश्यक बनला आहे. सुरक्षा आणि वाढ यांचा योग्य समतोल राखल्यास निवृत्तीनंतरचे जीवन आनंदाने व उत्‍साहात जगता येईल.

गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बुडाले…! शेअर बाजारात Sensex 1150 अंकांनी घसरला, सोनं-चांदीच्या किंमतीचं काय?

Web Title: Want a bigger retirement fund then make these changes in equity debt investments with age and time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • Business News
  • investment
  • Retirement

संबंधित बातम्या

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ
1

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ
2

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी
3

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी

ASCI चा मोठा निर्णय, AI युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल; Vision 2032 द्वारे आखली नवी दिशा
4

ASCI चा मोठा निर्णय, AI युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल; Vision 2032 द्वारे आखली नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.