कमिन्स इंडियाकडून बी-स्कूल केस स्टडी स्पर्धा 'रिडिफाइन २०२५'चा शुभारंभ, भावी पिढीतील ऊर्जा संक्रमणाला चालना देणार (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
कमिन्स इंडिया लिमिटेड (”कमिन्स इंडिया”) या आघाडीच्या ऊर्जा सोल्यूशन्स तंत्रज्ञान प्रदाता कंपनीने आपली प्रमुख बिझनेस स्कूल (बी-स्कूल) केस स्टडी कॉम्पीटिशन ‘रिडिफाइन २०२५’च्या आठव्या एडिशनच्या शुभारंभाची घोषणा केली. तरूण व्यवसाय विचारवंतांना सक्षम करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली ही स्पर्धा देशभरातील १९ प्रमुख बी-स्कूल्समधील विद्यार्थ्यांना सहभाग घेण्याचे आवाहन करते, तसेच त्यांना वास्तविक विश्वातील व्यवसायसंदर्भातील आव्हानांचे निराकरण करण्याची संधी देते.
यंदा स्पर्धेची थीम आहे ‘फ्रॉम बॅकअप टू बॅकबोन: ड्रायव्हिंग द एनर्जी शिफ्ट’ म्हणजेच ‘बॅकअपपासून आधारस्तंभापर्यंत: ऊर्जा परिवर्तनाला गती’, ज्यामधून नवीकरण, डिकार्बनायझेशन आणि बदलत्या ग्राहक अपेक्षांच्या माध्यमातून संचालित झपाट्याने विकसित होत असलेल्या ऊर्जा क्षेत्राशी जुळून जाण्याची वाढती गरज दिसून येते. सहभागींना एनर्जी-अॅज-ए-सर्विस यासारखे नाविन्यपूर्ण सेवा-केंद्रित मॉडेल्स, नवीकरणीय एकीकरण आणि ग्रिड-कनेक्टेड सोल्यूशन्सचा शोध घेण्याचे चॅलेंज दिलं आहे”या मॉडेल्सचा शाश्वत व प्रभावी पद्धतीने विकसित होत असलेल्या ऊर्जा गरजांची पूर्तता करण्याचा मनसुबा आहे.
या इव्हेण्टबाबत मत व्यक्त करत कमिन्स इंडियाच्या ह्युमन रिसोर्सेस लीडर अनुपमा कौल म्हणाल्या, “ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी कमिन्स भविष्यामध्ये गुंतवणूक करण्याप्रती कटिबद्ध आहे आणि भावी पिढीला निपुण करण्यासह त्याची सुरूवात होते, ज्यामुळे अर्थपूर्ण परिवर्तनाला चालना मिळेल आणि ते भावी प्रमुख बनतील. ‘रिडिफाइन २०२५’ विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण विचार करण्यास आणि वास्तविक विश्वातील आव्हानांचे निराकरण करण्यासाठी नाविन्यपूर्ण सोल्यूशन्स आणण्यास सक्षम करण्यासाठी परिवर्तनात्मक व्यासपीठ म्हणून काम करते. आम्हाला आनंद होत आहे की सहभागी या संधीचा फायदा घेऊन नवीन पैलू आणि नाविन्यपूर्ण सोल्यूशन्स सादर करतील, जे ऊर्जा परिवर्तनाला गती देण्यास मदत करू शकतात आणि ऊर्जा मूल्य साखळीला अधिक मजबूत करू शकतात.”
कमिन्स इंडियाचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर सुब्र्मणियन चिदंबरन म्हणाले, “कमिन्समध्ये आम्हाला माहित आहे की, सहयोगावर आणि सद्यस्थितीला आव्हान देण्याच्या धाडसावर नाविन्यतेला गती मिळते. रिडिफाइनच्या माध्यमातून आमचा सहयोगात्मक परिसंस्था निर्माण करण्याचा मनसुबा आहे, जेथे विद्यार्थी आजच्या आव्हानांसाठी उल्लेखनीय सोल्यूशन्सचा शोध घेऊ शकतात. आजच्या तरूणांमध्ये नाविन्यपूर्ण विचारसरणी बिंबवल्याने भविष्यात उद्योगामध्ये अधिक शाश्वत पद्धती आणि शुद्ध, हरित सोल्यूशन्सचा समावेश करण्यास मदत होईल. भारतातील बिझनेस स्कूल्समधील गुणवंत टॅलेंटशी संलग्न होत आम्ही संकल्पनांचा शोध घेण्यास उत्सुक आहोत, ज्या स्थिरता निर्माण करण्याच्या, प्रगतीला चालना देण्याच्या आणि शाश्वत भविष्याच्या दिशेने परिवर्तनाला गती देण्याच्या नवीन मार्गांना प्रेरित करतील.”
रिडिफाइन २०२५ प्रमुख पीजीपी/पीजीडीएम/पीजीडीबीएम/एमबीए प्रोग्राम्समध्ये नोंदणी केलेल्या बोनाफाइड पहिल्या व दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी खुले आहे. विविध फेऱ्या असलेली ही स्पर्धा १३ ते १४ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील पुणे येथील कमिन्स इंडिया ऑफिस कॅम्पसमध्ये दोन दिवसीय ग्रॅड फिनालेसह समाप्त होईल. विजेत्या टीमला रोख बक्षीस आणि कमिन्स इंडियाच्या मेन्टोरशीप प्रोग्राममध्ये सामील होण्याचे विशेष आमंत्रण मिळेल, जेथे त्यांना भावी व्यवसाय प्रमुख म्हणून त्यांच्या क्षमता अधिक निपुण करण्यासाठी कंपनीच्या नेतृत्वाकडून बहुमूल्य मार्गदर्शन मिळेल.
रिडिफाइनच्या २०२४ मधील एडिशनला उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला, जेथे १८ आघाडीच्या संस्थांमधील १,२६० टीम्सचे ३,७८० विद्यार्थी सहभागी झाले होते. पुण्यातील सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट (एससीएमएचआरडी) मधील टीम चॅम्पियन ठरत या स्पर्धेची सांगता झाली, तसेच तिरूचिरापल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम)मधील टीम उपविजेती ठरली.