फोटो सौजन्य - Social Media
भारतातील आघाडीच्या तेल आणि वायू कंपन्यांपैकी एक असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) प्रमुख ब्रँड एमएके (मॅक) लुब्रिकंट्सला ऑटोमोटिव्ह लुब्रिकंट्स श्रेणीत ‘प्रतिष्ठित ब्रँड्स ऑफ इंडिया २०२५’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या सन्मानामुळे कंपनीच्या ब्रँडिंग आणि नवोपक्रमाच्या कार्याला अधिक मान्यता मिळाली आहे. २१ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबईत झालेल्या गोलफेस्ट कॉन्क्लेव्ह २०२५ मध्ये हेराल्ड ग्लोबल आणि ब्रँड अॅडव्हर्टायझिंग रिसर्च अँड कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड (बीएआरसी) यांनी हा पुरस्कार प्रदान केला. हा सन्मान मॅक लुब्रिकंट्सच्या ग्राहकांच्या विश्वास, गुणवत्तेवर ठाम लक्ष आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाला अधोरेखित करतो.
‘द प्रेस्टिजियस ब्रँड्स ऑफ इंडिया’ प्लॅटफॉर्म अशा ब्रँडना गौरवतो ज्यांनी त्यांच्या उद्योगांमध्ये बेंचमार्क नव्याने ठरवले आहेत. यात नाविन्य, ग्राहकांचा विश्वास आणि वारसा यांचा समावेश आहे. बीपीसीएलच्या कार्यकारी संचालक (पीआर व ब्रँड) एस. अब्बास अख्तर आणि व्यवसाय प्रमुख (ल्युब्स) एस. कन्नन यांनी पुरस्कार स्वीकारला. एस. अब्बास अख्तर यांनी सांगितले की, “मॅक लुब्रिकंट्स हा भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक विश्वासार्ह ब्रँड आहे, जो ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी ४०० हून अधिक ग्रेड ऑफर करतो. ग्राहकांचा सहभाग हे आमचे उत्पादन आणि सेवा सुधारण्याचे प्रेरक तत्व आहे.”
एस. कन्नन म्हणाले, “एमएके लुब्रिकंट्स हे एका उच्च दर्जाच्या ब्रँडच्या विशिष्ट गुणांचे मूर्त स्वरूप आहे. उत्कृष्ट उत्पादन गुणवत्ता, अपवादात्मक कामगिरी, अतुलनीय विश्वासार्हता आणि व्यापक बाजारपेठ पोहोच, जे ग्राहकांच्या कायमस्वरूपी विश्वासात आणि प्रतिष्ठित ओसीएमच्या (OEM) संरक्षणात प्रतिबिंबित होते. आमचा जोम, नाविन्यपूर्णता आणि ग्राहकांवरील अढळ लक्ष यामुळे आम्हाला भारतात एक प्रतिष्ठित, विश्वासार्ह आणि पसंतीचा ब्रँड म्हणून स्थापित केले आहेच, परंतु परदेशातील बाजारपेठांमध्येही तेवढीच प्रभावी यशोगाथा लिहिण्यासाठी महत्त्वाचे आहेत.” या पुरस्कारामुळे मॅक लुब्रिकंट्सना टाटा स्टील, महिंद्रा सस्टेन, एचएसबीसी इंडिया, हिरो इलेक्ट्रिक, इंडिगो एअरलाइन्स, कोलगेट, रुपे आणि एलजीसारख्या नामांकित ब्रँड्ससोबत स्थान मिळाले आहे. हा गौरव केवळ बीपीसीएलच्या वारशाचे सेलिब्रेशन नाही तर नवोपक्रम, वाढ आणि जागतिक आकांक्षांनी भरलेल्या भविष्याचे संकेत देखील देतो.