Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बँकेची नोकरी सोडून उभारला आइसक्रीम ब्रँड; दीपा पाई यांची प्रेरणादायक कहाणी

दीपा प्रदीप पाई यांनी ३० वर्षांपूर्वी बँकेची नोकरी सोडून आइसक्रीम व्यवसाय सुरू केला आणि सातत्याने मेहनत घेत ३०० कोटींच्या ‘हॅंग्यो’ ब्रँडची सहसंस्थापक बनल्या. आज त्या अनेक उद्योजकांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 20, 2025 | 05:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही वर्षांमध्ये देशातील अनेक तरुणांनी पारंपरिक नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग निवडला आहे. या प्रवासात अनेकांनी यशाची मोठी शिखरे गाठली आहेत. अशाच यशस्वी व्यक्तींपैकी एक म्हणजे दीपा प्रदीप पाई. कदाचित हे नाव तुम्ही याआधी ऐकले नसेल, पण त्यांच्या जिद्दीची आणि मेहनतीची कहाणी ऐकल्यानंतर तुम्हाला हे नाव नक्कीच लक्षात राहील. दीपा पाई या एक महिला उद्योजिका आहेत, ज्यांनी तब्बल ३० वर्षांपूर्वी बँकेतली सुरक्षित नोकरी सोडून आइसक्रीमच्या व्यवसायात पाऊल टाकले.

4 दिवसात सेन्सेक्स 4,700 पेक्षा जास्त अंकांनी वाढला, पुढील आठवड्यात कशी असेल बाजारातील हालचाल? जाणून घ्या

त्या काळात महिलांसाठी नोकरी करणेही कठीण मानले जात होते, त्यातच व्यवसाय करणे म्हणजे धाडसच. तरीही दीपा पाई यांनी समाजाच्या विरोधाला न जुमानता स्वतःचा मार्ग निवडला. त्यांनी मुंबईतील बँकेत नोकरी करताना ती सोडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या व्यवसायासाठी गावाकडे परतल्या. त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली, पण त्यांनी कोणाचंही न ऐकता आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली. 1997 साली त्यांनी फक्त 5 रुपयांची सॉफ्टी आइसक्रीम विकून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या पती प्रदीप पाई आणि दीर दिनेश पाई यांनी आइसक्रीम व्यवसायात पाऊल टाकले होते आणि दीपा पाई याही या प्रवासात त्यांच्यासोबत सहभागी झाल्या.

2003 साली पाई कुटुंबाने ‘हॅंग्यो आइसक्रीम’ या ब्रँडची स्थापना केली. त्यांच्या या ब्रँडचा पहिला प्रॉडक्ट म्हणजे सॉफ्टी आइसक्रीम, जी 90 च्या दशकातील मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. याच सॉफ्टीने हॅंग्यो ब्रँडला ओळख मिळवून दिली. सातत्याने मेहनत, गुणवत्ता आणि नाविन्य यामुळे हळूहळू हॅंग्योने देशातील सात राज्यांमध्ये आपली बाजारपेठ निर्माण केली.

आता शॉपिंग मॉल्समध्ये उघडतील दारूची दुकाने! चित्रपटगृहांमध्ये दारू विक्री आणि पिण्यावर पूर्ण बंदी

आज हॅंग्यो आइसक्रीम ही 300 कोटींची कंपनी झाली आहे आणि दीपा पाई या या कंपनीच्या सहसंस्थापक आणि वाइस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांची ही प्रेरणादायी कहाणी अनेक तरुण-तरुणींना आणि विशेषतः महिलांना व्यवसायात यश मिळवण्यासाठी नवी उमेद आणि दिशा देते.

Web Title: Deepa pais inspiring story of quitting her bank job

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2025 | 05:15 AM

Topics:  

  • Agriculture Success Story
  • Business Idea

संबंधित बातम्या

‘ज्याला आपण कचरा समजतो, त्यातून तिने वैभव उभे केले’ अशिता सिंघलची संघर्षगाथा
1

‘ज्याला आपण कचरा समजतो, त्यातून तिने वैभव उभे केले’ अशिता सिंघलची संघर्षगाथा

परकिन रोचा यांची प्रेरणादायी उद्योजकतेची वाटचाल; धार्मिक ठिकाणांपासून ‘ECKO Hotels’ ची यशोगाथा
2

परकिन रोचा यांची प्रेरणादायी उद्योजकतेची वाटचाल; धार्मिक ठिकाणांपासून ‘ECKO Hotels’ ची यशोगाथा

बेकरीत काउंटर बॉय म्हणून काम करणारा मुलगा बनला कोट्यवधींचा मालक! ब्रँड “९९ पॅनकेक्स”
3

बेकरीत काउंटर बॉय म्हणून काम करणारा मुलगा बनला कोट्यवधींचा मालक! ब्रँड “९९ पॅनकेक्स”

८००० रुपयांपासून घडवले कोटींचे साम्राज्य! “समस्या, समाधान आणि यश…”
4

८००० रुपयांपासून घडवले कोटींचे साम्राज्य! “समस्या, समाधान आणि यश…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.