Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिजिटल पेमेंट्स सुरक्षितता: Visa द्वारे डिजिटल पेमेंट्सबाबतच्या गैरसमजांचे निराकरण

डिजिटल पेमेंट्समध्‍ये वाढ होण्‍यासह त्यासंबंधी सुरक्षिततेबाबत अनेक मिथकांमध्‍ये देखील वाढ झाली आहे. व्हिसाने विनासायास व सुरक्षित डिजिटल पेमेंटच्या गैरसमजांबाबत स्‍पष्‍टीकरण दिले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 22, 2024 | 03:24 AM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या काळात सर्वच जण मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट्सना प्राधान्य देत आहेत. अगदी भाजी विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करण्यासाठी, फूडस्टॉलवर पदार्थ खरेदी करण्यासाठी ते एखादी महागडी वस्तू खरेदी करण्यापर्यंत डिजिटल व्यवहार वाढले आहेत. महत्वाचे म्हणजे सर्व वयोगटातील व्यक्ती आज डिजिटल पेमेंट्स करताना दिसत आहेत. मात्र या डिजिटल पेमेंट्समध्‍ये वाढ होण्‍यासह डिजिटल पेमेंट्सच्‍या सुरक्षिततेबाबत अनेक मिथकांमध्‍ये देखील वाढ झाली आहे. व्हिसा विनासायास व सुरक्षित डिजिटल पेमेंट अनुभवांचा आनंद घेता येण्‍यासाठी सामान्य गैरसमजांबाबत स्‍पष्‍टीकरण दिले आहे.

Gautam Adani: नेमकं काय घडलं की अदानी अडकले? वाचा सविस्तर

1. मिथक: पेमेंट अ‍ॅप्‍स फोनमध्‍ये संवेनदशील माहिती स्‍टोअर करतात!

तथ्‍य: व्हिसा सारख्‍या आधुनिक डिजिटल पेमेंट सिस्‍टम्‍स युजरच्‍या डेटा संरक्षणासाठी आणि फोन डिवाईसेसच्‍या अनधिकृत वापराला प्रतिबंध करण्‍यासाठी टोकनायझेशन आणि एण्‍ड-टू-एण्‍ड एन्क्रिप्‍शन अशा उपायांचा वापर करतात. त्यामुळे ते मिथक ठरते.

2. मिथक: व्‍यवहार सुरक्षित करण्‍यासाठी प्रबळ पासवर्डस् पुरेसे आहेत!

तथ्‍य: प्रबळ पासवर्डस् हे  पहिले पाऊल आहे, पण ओटीपी सारख्‍या इतर व्‍हेरिफिकेशन पद्धतींसह पासवर्डसना एकत्रित करणारे मल्‍टी-फॅक्‍टर ऑथेन्टिकेशन अतिरिक्‍त सुरक्षितता देते ज्यामुळे व्यवहार सुरक्षित होतात.

3. मिथक: कॉन्‍टॅक्‍टलेस पेमेंटमुळे फसवणूक होण्‍याची शक्‍यता असते!

तथ्‍य: कॉन्‍टॅक्‍टलेस पेमेंट्समध्‍ये एन्क्रिप्‍टेड इलेक्‍ट्रॉनिक प्रक्रियेचा समावेश असतो, जी अत्‍यंत विश्‍वसनीय आहे. कॉन्‍टॅक्‍टलेस पद्धती व्‍यवहार सुरक्षित करणाऱ्या नीअर फिल्‍ड कम्‍युनिकेशन (एनएफसी) सारख्‍या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतात, ज्‍यामधून डेटा अत्‍यंत कमी अंतरापर्यंत प्रसारित होण्‍याची खात्री मिळते, ज्‍यामुळे व्‍यत्‍यय येण्‍याची जोखीम दूर होते.

4. मिथक: क्‍यूआर कोड्स सहजपणे हॅक होतात!

तथ्‍य: फक्‍त विश्‍वसनीय क्‍यूआर कोड्स स्‍कॅन करा आणि सुरक्षित क्‍यूआर व्‍यवहारांसाठी पासवर्डस् शेअर करणे टाळा. क्‍यूआर कोड्स फक्‍त लिंकचा प्रकार आहेत. म्‍हणून सावधगिरी बाळगा आणि क्‍यूआर कोडमुळे फसवणूक करणारी वेबसाइट येत असेल किंवा वैयक्तिक माहितीची विनंती केली जात असेल तर माहिती शेअर करू नका.

5. मिथक: बँक व्‍यवहारांच्‍या तुलनेत डिजिटल वॉलेट्स कमी सुरक्षित आहेत!

तथ्‍य: डिजिटल वॉलेट्समध्‍ये अनेकदा अतिरिक्‍त सुरक्षितता वैशिष्‍ट्यांचा समावेश असतो, जसे टोकनायझेशन, बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन आणि डिवाईस-लेव्‍हल एन्क्रिप्‍शन. विशेषत: टोकनायझेशन संवेदनशील कार्ड माहितीच्‍या ऐवजी टोकन्‍स देते, ज्‍यामधून अतिरिक्‍त सुरक्षिततेची खात्री मिळते.

Google Map Update: अज्ञात ठिकाणं एक्सप्लोर करण्याची इच्छा आहे? गुगल मॅपच्या स्ट्रीट व्यू फीचरसोबत प्रवास होईल मजेदार

डिजिटल व्यवहारांसाठी महत्त्वाचे मुद्दे

डिजिटल पेमेंट्स दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. त्यामुळे डिजिटल व्यवहारांबाबत योग्य माहिती असणे महत्त्वाचे आहे. पेमेंट प्रदात्यांकडून राबवण्यात येणाऱ्या सुरक्षा उपायांचा लाभ घ्या आणि सतर्कतेने व्यवहार करा. योग्य सुरक्षितता पद्धती वापरल्यास डिजिटल व्यवहार अधिक सुलभ आणि सुरक्षित होतात. यामुळे डिजिटल व्यवहारांचा आत्मविश्वासाने आणि सहजतेने आनंद घ्या.

Web Title: Digital payments security visa dispels misconceptions about digital payments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2024 | 03:24 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.