Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DSP एमएफचा भारतातील पहिला फ्लेक्सीकॅप ईटीएफ फंड, डीएसपी निफ्टी 500 फ्लेक्सीकॅप क्वालिटी 30 ईटीएफ योजनेचा शुभारंभ

DSP Mutual Fund: डीएसपी म्युच्युअल फंडाच्या पॅसिव्ह फंड्स विभागाचे व्यवसाय प्रमुख गुरजीत कालरा म्हणाले, “भारतीय बाजारपेठेत फ्लेक्सी कॅप धोरणाचा अभाव आहे. बहुतांश विविधांगी फंड किंवा फ्लेक्सीकॅप फंड हे मिड आणि स्मॉल कॅप

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Sep 26, 2025 | 06:08 PM
DSP एमएफचा भारतातील पहिला फ्लेक्सीकॅप ईटीएफ फंड, डीएसपी निफ्टी 500 फ्लेक्सीकॅप क्वालिटी 30 ईटीएफ योजनेचा शुभारंभ (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

DSP एमएफचा भारतातील पहिला फ्लेक्सीकॅप ईटीएफ फंड, डीएसपी निफ्टी 500 फ्लेक्सीकॅप क्वालिटी 30 ईटीएफ योजनेचा शुभारंभ (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

DSP Mutual Fund Marathi News: डीएसपी म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांसाठी डीएसपी निफ्टी ५०० फ्लेक्सीकॅप क्वालिटी ३० ईटीएफ या नवीन फंडाचा शुभारंभ करत असल्याची आज घोषणा केली. हा फंड भारतातील पहिला फ्लेक्सी कॅप एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) आहे. हा फंड ईटीएफ निफ्टी ५०० फ्लेक्सीकॅप क्वालिटी ३० टीआरआय या निर्देशांकानुसार आपली वाटचाल करणार आहे. हा निर्देशांक मानक बिंदू असून ईटीएफ फंड त्याच्या आधारे दर्जेदार व्यवसायांवर लक्ष केंद्रित करताना लार्ज, मिड आणि स्मॉल-कॅप कंपन्यांमध्ये गतिमान पध्दतीने गुंतवणूक करणार आहे.

भारतीय शेअर बाजार अनेकदा प्रवाहानुसार सतत चढउतार दर्शवतो. या प्रवाहामध्ये लार्ज, मिड आणि स्मॉल कंपन्या टप्प्याटप्यात चांगली कामगिरी करतात. परंतु बहुतांश गुंतवणूकदारांसाठी, कोणत्या समभागामध्ये गुंतवणूक करायची, किती निधी गुंतवायचा आणि समभागातून केव्हा आपली गुंतवणूक इतरत्र वळवायची, हे ठरविणे अतिशय कठीण असते. परंतु त्याचबरोबर खूप खर्चिकही असते.

ठाण्यातील प्रसिद्ध विवियाना मॉलचे नाव बदलले, ‘लेक शोअर ठाणे’ नावाने नवी ओळख

ही गुंतागुंत ईटीएफ फंड सहज दूर करतो. मिड आणि स्मॉल कंपन्यांचे समभाग वेगाने वाटचाल करत असताना फ्लेक्सीकॅप ईटीएफ फंड अतिशय पारदर्शक पध्दतीने आणि नियमांच्या चौकटीत या समभागांमधील गुंतवणूक स्वयंचलित पध्दतीने वाढवत जातात. जेव्हा हे समभाग शिखर पातळीवर पोहचतात, त्यावेळी या समभागांमधील गुंतवणूक काढून ती लार्ज कॅप समभागांमध्ये गुंतविली जाते. समभागांच्या निवडीसाठी अतिशय कठोर निकष वापरले जातात. त्यामुळे मूलभूतपणे अतिशय मजबूत असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदाराचा निधी राहील, याची शाश्वती यातून मि‌ळते.

ऑक्टोबर २००९ मध्ये शुभारंभ करण्यात आलेल्या निफ्टी ५०० फ्लेक्सीकॅप क्वालिटी ३० निर्देशांकाने १७.६ टक्के** चक्रवाढ दराने परतावा दिलेला आहे. शेअरबाजाराच्या विविध प्रवाहांमध्येसुध्दा या निर्देशांकाने निफ्टी ५०० टीआरआय या निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी बजावलेली आहे. गतिमान वाटपासोबत गुणवत्तेवर केंद्रीत केलेले लक्ष आणि निर्देशांकात समाविष्ट असलेल्या केवळ ३० समभागांच्या आधारे पोर्टफोलिओची उभारणी या दोन घटकांच्या संयोजनामुळे हा निर्देशांक शक्तीशाली बनला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मंदीच्या काळातही या निर्देशांकाने गुंतवणूकदारांना फारशी झळ पोहचू दिलेली नाही – उदाहरणार्थ, २०११ आणि २०१८ मधील अभूतपुर्व घसरणीवेळी हा निर्देशांक व्यापक बाजाराच्या तुलनेत कमी प्रमाणात घसरला. तसेच २०२० च्या कोविड घसरणीदरम्यानही या निर्देशांकाने आपले नुकसान मर्यादित ठेवले आणि त्यानंतर बाजार सावरताच पुन्हा वेगाने उसळी घेतली.

नवीन फंडाची ऑफर (एनएफओ) २५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत गुंतवणूकीसाठी खुली राहणार आहे. गुणवत्तेच्या शिस्तीबरोबरच अप्रत्यक्ष पध्दतीने (पॅसिव्ह) आणि कमी खर्चात केल्या जाणाऱ्या गुंतवणूकीतून मिळणारी कार्यक्षमता सातत्याने राखत शेअरबाजारातील विविध प्रवाहांदरम्यान संधी हेरणाऱ्या सोयीस्कर गुंतवणूक पर्यायाच्या माध्यमातून दीर्घकाळात भांडवलवृध्दी हव्या असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा ईटीएफ फंड प्रामुख्याने साकारण्यात आलेला आहे.

नवीन फंडाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना डीएसपी म्युच्युअल फंडाच्या पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट्स अँड प्रोडक्ट्स विभागाचे सीएफए (प्रमुख) अनिल घेलानी म्हणाले, “दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी लवचिकता आणि गुणवत्ता या दोन शक्तिशाली संकल्पना आहेत. या ईटीएफद्वारे, आम्ही गुंतवणूकदारांना असा पर्याय सादर करत आहोत, जो सतत देखरेख किंवा गुंतवणूकीचे हस्तांतरण करण्याची आवश्यकता न पडता शेअरबाजाराच्या विविध टप्प्यांशी स्वयंचलित पध्दतीने जुळवून घेतो. त्याच वेळी, केवळ दर्जेदार कंपन्यांवर लक्ष केंद्रित करत दीर्घकाळ कार्यरत राहणाऱ्या कंपन्यांमध्येच पैसे गुंतविले जातात, हा विश्वास गुंतवणूकदारांना प्रदान करणे, हे या ईटीएफ फंडाचे मुख्य उद्दीष्ट आहे.

डीएसपी म्युच्युअल फंडाच्या पॅसिव्ह फंड्स विभागाचे व्यवसाय प्रमुख गुरजीत कालरा म्हणाले, “भारतीय बाजारपेठेत फ्लेक्सी कॅप धोरणाचा अभाव आहे. बहुतांश विविधांगी फंड किंवा फ्लेक्सीकॅप फंड हे मिड आणि स्मॉल कॅप गटातील समभागांत अतिशय मर्यादित प्रमाणात निधी गुंतवतात. डीएसपी निफ्टी ५०० फ्लेक्सीकॅप क्वालिटी ३० ईटीएफ फंडामुळे गुंतवणूकदारांना अखेर एकाच फंडाच्या आधारे लार्ज, मिड आणि स्मॉल समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचा एक सोपा, पारदर्शक आणि अल्प खर्चिक मार्ग उपलब्ध झाला आहे. दीर्घ कालावधीत संपत्ती निर्मितीसाठी हा फंड सर्व परिस्थितींमध्ये योग्य पर्याय प्रदान करू
शकतो. ”

Stock Market Crash: 5 दिवसांत सेन्सेक्स 1800 अंकांनी कोसळला, ‘या’ 4 कारणांनी शेअर बाजार घसरला

Web Title: Dsp mf launches indias first flexicap etf fund dsp nifty 500 flexicap quality 30 etf scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 06:08 PM

Topics:  

  • Business News
  • Mutual Fund
  • share market
  • Stock market

संबंधित बातम्या

Stock Market Crash: 5 दिवसांत सेन्सेक्स 1800 अंकांनी कोसळला, ‘या’ 4 कारणांनी शेअर बाजार घसरला
1

Stock Market Crash: 5 दिवसांत सेन्सेक्स 1800 अंकांनी कोसळला, ‘या’ 4 कारणांनी शेअर बाजार घसरला

बँक खाते निष्क्रिय कधी होते? इनअ‍ॅक्टिव्ह आणि डोरमेंट खात्यातील फरक आणि खाते सक्रिय करण्याच्या सोप्या स्टेप्स जाणून घ्या
2

बँक खाते निष्क्रिय कधी होते? इनअ‍ॅक्टिव्ह आणि डोरमेंट खात्यातील फरक आणि खाते सक्रिय करण्याच्या सोप्या स्टेप्स जाणून घ्या

Share Market Closing: सलग सहाव्या दिवशी बाजारात घसरण! सेन्सेक्स 733 अंकांनी कोसळला, निफ्टी 24,654 वर
3

Share Market Closing: सलग सहाव्या दिवशी बाजारात घसरण! सेन्सेक्स 733 अंकांनी कोसळला, निफ्टी 24,654 वर

औषधांवर 100 टक्के कराचा फटका! भारतीय कंपन्यांवर काय होईल परिणाम? निर्यातदारांवर दबाव वाढणार? जाणून घ्या
4

औषधांवर 100 टक्के कराचा फटका! भारतीय कंपन्यांवर काय होईल परिणाम? निर्यातदारांवर दबाव वाढणार? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.