ठाण्यातील प्रसिद्ध विवियाना मॉलचे नाव बदलले, 'लेक शोअर ठाणे' नावाने नवी ओळख (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Viviana Mall Marathi News: देशातील प्रमुख गुंतवणूकदार, विकासक आणि मोठ्या प्रमाणात शॉपिंग सेंटर्सचे संचालक असलेल्या लेक शोअरने ठाण्यातील विवियाना मॉलचे लेक शोअर ठाणे असे नाव बदलल्याची अधिकृत घोषणा आज केली. डेस्टिनेशन रिटेल मालमत्तेच्या पोर्टफोलिओमध्ये एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या लेक शोअरच्या प्रवासात हे रीब्रँडिंग हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
भारतातील काही प्रमुख रिटेल आणि मनोरंजन ब्रँडना स्थान देणारा विवियाना मॉल हा गेल्या दशकभराहून अधिक काळ, ठाण्यातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. जो दरवर्षी त्याला भेटायला येणाऱ्या लाखो पाहुण्यांचे स्वागत करतो. त्याच्या रीब्रँडिंगसह, हे सेंटर शहरातील सर्वात विश्वासार्ह ठिकाणांपैकी एक म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करेल, तसेच भविष्यासाठीच्या कंपनीच्या व्यापक दृष्टिकोनाशी अधिक जोडले जाईल.
“विवियाना हे केवळ एक शॉपिंग सेंटर नाही, तर ते त्यापेक्षाही जास्त आहे. ते एक असे ठिकाण आहे जिथे खरेदी करण्यासाठी असो, जेवण्यासाठी असो किंवा फक्त मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी असो, अनेक लोक एकत्र येतात,” असे लेक शोअर इंडियाचे एमडी आणि सीईओ अश्विन पुरी म्हणाले. “लेक शोअर ठाणे म्हणून आम्ही हाच वारसा पुढे चालवू. प्रेरणा देणारे, शहराला परस्परांशी जोडणारे आणि सातत्याने वाढणारे संस्मरणीय अनुभव निर्माण करत राहू.”
पुरी पुढे म्हणाले, “हे रीब्रँडिंग म्हणजे केवळ नाव बदलणे नाही तर ते एक धोरणात्मक पाऊल आहे जे ठाणे आणि भारताच्या शहरी रिटेल लँडस्केपला आकार देण्याच्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते. आम्ही आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत असतानाच गुणवत्तेसाठी आणि नावीन्यपूर्णतेसाठी एक बेंचमार्क म्हणून लेक शोअर ठाणे ओळखले जाईल.”
करार, सेवा किंवा दैनंदिन कामकाजात कोणताही बदल न होता किरकोळ विक्रेते, भागीदार आणि ग्राहकांसाठी हा बदल सर्वसमावेशक असेल. मालकी आणि व्यवस्थापनात काहीही बदल झाला नसला तरी सातत्य, गुणवत्ता आणि नावीन्यपूर्णतेवर लेक शोअरचे लक्ष असेल.
₹१,९०० कोटी किमतीचा हा ऐतिहासिक करार भारतीय रिअल इस्टेट आणि रिटेल क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड मानला जात आहे. ठाणे शहर कॉर्पोरेट, निवासी आणि रिटेल हब म्हणून वेगाने विकसित होत आहे. चांगली कनेक्टिव्हिटी, प्रीमियम गृहनिर्माण प्रकल्प आणि वाढत्या शहरी लोकसंख्येमुळे, हे शहर लेक शोर सारख्या प्रमुख रिटेल ठिकाणांसाठी एक मजबूत ग्राहक आधार तयार करत आहे.
मॉलचे नाव आणि मालकी बदलली असली तरी, जागतिक दर्जाचे खरेदी आणि मनोरंजन प्रदान करण्याचे त्याचे आश्वासन तसेच आहे. जागतिक आणि भारतीय ब्रँड येथे उपस्थित राहतील.