
(PPF Investment:फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
प्रत्येक आई-बापाला एकच वाटतं, आपल्या पोराचं भविष्य सुरक्षित असावं. त्याचं शिक्षण चांगलं व्हावं, लग्नाला पैसे कमी पडू नयेत, पुढे जाऊन त्याला कोणापुढे हात पसरायला लागू नये. यासाठीच लोक पैसे साठवतात. तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा निवृत्तीसाठी एक भरीव निधी उभारू इच्छित असाल, तर सार्वजनिक भविष्य निधी (PPF) हा एक उत्कृष्ट आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो.यासाठी PPF सारखा दुसरा चांगला पर्याय नाही. एकदम सुरक्षित, सरकारची योजना. त्यात चक्रवाढीची ताकद इतकी भारी आहे की, तुम्ही दरमहा फक्त 1,900 रुपयांची म्हणजे रोजची 63 रुपयांची छोटी बचत करून तुमच्या मुलासाठी 1 कोटींचा निधी तयार करू शकता. PPF Investment:
फक्त रोज 63 रुपये. एक वडापाव पण येत नाही आजकाल तेवढ्यात. तेवढे पैसे बाजूला ठेवले तर पोरगा करोडपती होईल. कसं? चला गणित बघू.1. पोराच्या जन्मापासून सुरू केलं तर…तुम्ही तुमच्या मुलाच्या जन्मापासून 50 वर्षांपर्यंत दरमहा 1,900 रुपये जमा केले, तर तुम्ही 1 कोटींचा निधी तयार कराल.
Petrol Diesel Price Today: वीकेंडची भटकंती ठरवण्याआधी पाहा, इंधनाचे दर किती?
दर महिन्याला टाकायचे : 1,900 रुपये
रोजचे झाले : फक्त 63 रुपये
वर्षाला टाकायचे : 22,800 रुपये
व्याज किती मिळतं : सध्या सरकार देतंय 7.1% प्रति वर्ष
किती वर्षे ठेवायचे : 50 वर्षे. आधी 15 वर्षे, मग 5-5 वर्षांनी वाढवत जायचं.
तर एकूण 11,62,800 रुपये. फक्त अकरा लाख.पण व्याज किती मिळणार माहितीये का? चक्रवाढीमुळे तुम्हाला 91 लाख 80 हजार रुपये फक्त व्याज मिळेल.
एकूण 1 कोटी 3 लाख 42 हजार रुपये.म्हणजे पोरगा 51 वर्षांचा होईपर्यंत, त्याने स्वतःच्या खिशातून एक रुपया पण न टाकता तो करोडपती झालेला असेल. तुम्ही फक्त सुरुवात केली, पुढे व्याजच काम करणार. 2. पोरगं 5 वर्षांचं असताना सुरू केलं तर?आता समजा, जन्मापासून नाही जमलं. पोरगं 5 वर्षांचं झाल्यावर तुम्हाला आठवलं, तरी पण जमेल.तुम्ही तुमच्या मुलासाठी ते 5 वर्षांचे असताना गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर 45 वर्षांसाठी दरमहा 2,700 रुपये जमा करावे लागतील.मग वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत एकूण गुंतवणूक होईल 14.58 लाख रुपये आणि व्याज मिळेल 87.58 लाखांपेक्षा जास्त. एकूण हातात येईल 1.02 कोटी रुपये. थोडे उशिरा सुरू केलं तर महिन्याला थोडे जास्त टाकावे लागतील. पण तरीही 1 कोटी होणारच.
1. टॅक्स अजिबात नाही.
PPF ची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे यावर टॅक्स नाही. याला EEE म्हणतात. म्हणजे टाकताना पण सूट, व्याजावर पण सूट, आणि शेवटी पैसे काढताना पण सूट.
आयकर कायद्याच्या कलम 80C खाली वर्षाला 1.5 लाखांपर्यंत टाकलेले पैसे टॅक्समधून वजा होतात. आणि मिळणारं व्याज आणि शेवटचा 1 कोटी पण पूर्ण टॅक्स फ्री असतो.
2. 15 वर्षे लॉक, मग वाढवता येतं
PPF खातं 15 वर्षांसाठी असतं. 15 वर्षे झाली की बंद करायची गरज नाही. एक छोटा फॉर्म भरला की 5-5 वर्षांनी पुढे वाढवता येतं. जेवढी वर्षे वाढवशील, तेवढा पैसा जास्त वाढेल.
3. कोण उघडू शकतं?
कोणताही आई-बाप आपल्या लहान पोराच्या नावाने पोस्ट ऑफिस किंवा बँकेत PPF खातं उघडू शकतो. पोरगं 18 वर्षांचं झालं की खातं त्याच्या हातात जातं. मग तो स्वतः पैसे टाकू शकतो.
4. किती टाकता येतं?
एका वर्षात कमीत कमी 500 रुपये टाकावेच लागतात. आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये टाकता येतात. यापेक्षा जास्त टाकता येत नाही.म्हणूनच म्हणतो, उद्यावर ढकलू नका. आजच 63 रुपये बाजूला ठेवायला सुरुवात करा.
Ans: PPF योजनेवर सध्या 7.1 टक्के वार्षिक व्याजदर आहे.
Ans: दरमहा 1,900 रुपये गुंतवून 50 वर्षांच्या कालावधीत लेखातील गणितानुसार सुमारे 1.03 कोटी रुपये जमा होऊ शकतात.
Ans: होय, पालक आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावाने PPF खाते उघडू शकतात.