Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईडीची मोठी कारवाई… पॉन्झी स्कीमच्या 6 कोटी गुंतवणूकदारांना मोठा दिलासा; पैसे परत मिळणार!

देशातील नामांकित 50 हजार कोटी रुपयांच्या पर्ल ग्रुपच्या पॉन्झी घोटाळ्यात 10 वर्षांनंतर गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आनंद परतला आहे. या योजनेत अडकलेल्या सुमारे 6 कोटी गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्याची मोहीम ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने सुरू केली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 15, 2024 | 03:22 PM
ईडीची मोठी कारवाई... पॉन्झी स्कीमच्या 6 कोटी गुंतवणूकदारांना मोठा दिलासा; पैसे परत मिळणार!

ईडीची मोठी कारवाई... पॉन्झी स्कीमच्या 6 कोटी गुंतवणूकदारांना मोठा दिलासा; पैसे परत मिळणार!

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या दशकभरात देशातील अनेक भागांमध्ये आर्थिक घोटाळे झाल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये अनेक गुंतवणूकदारांची मोठी रक्कम अटकून पडली आहे. अशातच आता 50 हजार कोटी रुपयांच्या पर्ल ग्रुपच्या पॉन्झी घोटाळ्यात 10 वर्षांनंतर गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आनंद परतला आहे. या योजनेत अडकलेल्या सुमारे 6 कोटी गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्याची मोहीम ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने सुरू केली आहे.

49,100 कोटींची गुंतवणूक टांगणीला

पर्ल ग्रुप कंपनीवर 18 वर्षांच्या कालावधीत कोट्यवधी गुंतवणूकदारांकडून ही रक्कम घेतल्याचा आरोप आहे. पर्ल ॲग्रो ग्रुपने या 18 वर्षांत 59 दशलक्ष (5.9 कोटी) गुंतवणूकदारांकडून 49,100 कोटी रुपये गुंतवणूकदारांकडून घेतले होते. ही रक्कम ‘बेकायदेशीर’ घेण्यात आली. बेकायदेशीरपणे पैसे गोळा केल्याच्या याच आरोपावरून सेबीने पर्ल ग्रुपवर बंदी घातली होती. या पॉन्झी योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना भूखंड देण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते. सीबीआयने फेब्रुवारी 2014 मध्ये या प्रकरणी एफआयआर नोंदवला होता. त्यानंतर आता ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

हे देखील वाचा – आरबीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये… चार बड्या बॅंकांसह एका कंपनीवर कारवाईचा हातोडा; तुमचे तर खाते नाही ना!

पर्ल ग्रुपच्या पॉन्झी योजनेंतर्गत कंपनीने गुंतवणूकदारांना भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, रिटर्न देण्याऐवजी, प्रवर्तकांनी कोलकाता येथे नोंदणीकृत बनावट संस्थांना पैसे हस्तांतरित केले. त्यानंतर या कंपन्यांकडून रोख स्वरूपात पैसे काढून ते हवाला चॅनल वापरून दुबईला पाठवण्यात आले. यानंतर हा पैसा अनेक देशांमध्ये हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स खरेदी करण्यासाठी गुंतवण्यात आला.

जस्टिस लोढा समितीसोबत तपशील शेअर

ईडीने सांगितले आहे की, जस्टिस लोढा समितीसोबत पर्ल ॲग्रो ग्रुपच्या 700 कोटी रुपयांच्या अटॅच केलेल्या मालमत्तेचा तपशील शेअर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने लोढा समिती स्थापन केली होती. जप्त केलेल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचे आणि पीडितांना पैसे परत करण्याचे काम या समितीकडे देण्यात आले होते. त्यानंतर आता पर्ल ग्रुपच्या प्रवर्तकांनी पॉन्झी योजना सुरू केल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.

अनेक राज्यांत ईडीकडून शोध

या घोटाळ्यातील रकमेचा शोध घेण्यासाठी ईडीने गेल्या आठवड्यात दिल्ली, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि उत्तराखंडमधील 44 ठिकाणी शोध घेतला. एका नामांकित इंग्रजी वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार, ईडीने गुरुग्राममधील एसआरएस ग्रुपच्या एसआरएस पर्ल, एसआरएस सिटी, एसआरएस प्राइम या प्रकल्पांच्या घर खरेदीदारांना पहिल्या लॉटमधील 78 फ्लॅट्स, ज्यांची किंमत 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. असे फ्लॅट्स् परत करणे सुरू केले आहे.

Web Title: Ed big action relief for 6 crore investors who became victims of ponzi scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 03:22 PM

Topics:  

  • Enforcement Directorate
  • sebi

संबंधित बातम्या

Suresh Raina: बेटिंग App प्रकरणात सुरेश रैनावर कोणते आरोप? ED च्या फेऱ्यात अडकला, चौकशीसाठी बोलावले
1

Suresh Raina: बेटिंग App प्रकरणात सुरेश रैनावर कोणते आरोप? ED च्या फेऱ्यात अडकला, चौकशीसाठी बोलावले

कायद्याच्या चौकटीमध्येच करा काम…! ED च्या तपास यंत्रणेवर सुप्रीम कोर्ट नाराज
2

कायद्याच्या चौकटीमध्येच करा काम…! ED च्या तपास यंत्रणेवर सुप्रीम कोर्ट नाराज

Anil Ambani: उद्योगपती अंबानींच्या अडचणीत वाढ! ED कडून ‘लुकआऊट’ नोटीस; चौकशीसाठी धाडले समन्स
3

Anil Ambani: उद्योगपती अंबानींच्या अडचणीत वाढ! ED कडून ‘लुकआऊट’ नोटीस; चौकशीसाठी धाडले समन्स

मोठी बातमी! छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाला ED कडून अटक; पोलीस अन् कार्यकर्त्यांमध्ये थेट…, पहा VIDEO
4

मोठी बातमी! छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाला ED कडून अटक; पोलीस अन् कार्यकर्त्यांमध्ये थेट…, पहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.