Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ED चा YouTuber Anurag Dwivedi ला दणका! आधी मर्सिडीज आणि आता Land Rover ,BMW Car जप्त

युपीचा करोडपती युट्युबर अनुराग द्विवेदीच्या दोन आलिशान कार, Land Rover आणि Defender कार ED कडून जप्त. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 05, 2026 | 09:53 PM
ED चा YouTuber Anurag Dwivedi ला दणका

ED चा YouTuber Anurag Dwivedi ला दणका

Follow Us
Follow Us:
  • युट्युबर अनुराग द्विवेदीवर ED ची कारवाई
  • कोटींची मालमत्ता केली जप्त
  • जाणून घ्या आतापर्यंतची कारवाई
उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील रहिवासी आणि करोडपती यूट्यूबर अनुराग द्विवेदी यांच्यावर ED ने सोमवारी मोठी कारवाई केली आहे. कोलकाता झोनल कार्यालयाने धनशोधन प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.

ईडीकडून 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी दिल्ली, मुंबई, सूरत, लखनऊ आणि वाराणसी येथे एकूण 9 ठिकाणी झडती मोहीम राबवण्यात आली. ही सर्व ठिकाणे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि यूट्यूबर अनुराग द्विवेदी तसेच विविध ऑनलाइन गेमिंग आणि सट्टेबाजी अ‍ॅप्सशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात गुन्ह्याच्या उत्पन्नाचा (POC) वापर करून मनी लॉन्डरिंग केल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे.

असा डिस्काउंट पुन्हा येणे नाही! Honda च्या ‘या’ Cars वर 1.33 लाखांपर्यंतची सूट मिळवण्याची संधी

झडतीदरम्यान ईडीने अनुराग द्विवेदी यांच्या लँड रोव्हर डिफेंडर आणि BMW Z4 या दोन आलिशान गाड्या PMLA, 2002 च्या तरतुदीनुसार जप्त केल्या आहेत. यासोबतच अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणेही हस्तगत करण्यात आली आहेत.

महागड्या गाड्या जप्त

यापूर्वी 17 डिसेंबर रोजी ईडीने लखनऊ, उन्नाव आणि दिल्ली येथे अनुराग द्विवेदी यांच्याशी संबंधित 10 ठिकाणी झडती घेतली होती. त्या कारवाईत लॅम्बॉर्गिनी उरुस, मर्सिडीज, फोर्ड एन्डेवर आणि थार यांसह चार महागड्या गाड्या, आक्षेपार्ह कागदपत्रे, डिजिटल उपकरणे तसेच सुमारे 20 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती.

तब्बल 3 कोटींची संपत्ती जप्त

या प्रकरणाच्या तपासात यापूर्वी दुबईतील हवाला चॅनेल्सच्या माध्यमातून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याचा मोठा खुलासा झाला होता. यासोबतच विमा पॉलिसी, फिक्स्ड डिपॉझिट आणि बँक खात्यांतील शिल्लक यांसह सुमारे 3 कोटी रुपयांची चल मालमत्ता धनशोधन प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 च्या कलम 17(1A) अंतर्गत जप्त करण्यात आली होती.

Jawa Yezdi ची ‘ही’ लोकप्रिय बाईक आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध

ही चौकशी पश्चिम बंगाल पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने सुरू केली असून, ती बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजीशी संबंधित आहे. तपासात असेही समोर आले की, सिलिगुडी येथील सोनू कुमार ठाकूर आणि विशाल भारद्वाज या आरोपींनी म्यूल बँक खात्यांचा (बनावट खाती) आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करून ऑनलाइन सट्टेबाजी पॅनल चालवले होते.

दुबईत खरेदी केलेली मालमत्ता

ईडीच्या तपासात असेही आढळून आले आहे की, अनुराग द्विवेदीने बेकायदेशीर सट्टेबाजी प्लॅटफॉर्म्सचा सक्रियपणे प्रचार केला. तसेच हवाला चॅनेल्स आणि म्यूल खात्यांद्वारे गुन्ह्याची कमाई मिळवून, त्या पैशांतून दुबईमध्ये स्थिर मालमत्ता खरेदी करण्यात आली.

तपासात हेही स्पष्ट झाले आहे की, अनुराग द्विवेदी सध्या भारताबाहेर दुबईत वास्तव्यास असून, ईडीकडून वारंवार समन्स बजावूनही ते तपासासाठी हजर झालेला नाही. यापूर्वी या प्रकरणात ईडीने तीन आरोपींना अटक केली असून, 1 ऑगस्ट 2025 रोजी माननीय विशेष न्यायालय (PMLA), कोलकाता येथे अभियोजन तक्रार दाखल करण्यात आली होती.

याशिवाय, या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत सुमारे 27 कोटी रुपयांची चल मालमत्ता फ्रीज करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.

Web Title: Ed takes action against youtuber anurag dwivedi and siezed his land rover bmw car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 09:53 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • BMW
  • Enforcement Directorate

संबंधित बातम्या

हिरो एक्सट्रीम 160R 4V आणि एक्सट्रीम 250R लाँच; क्रूझ कंट्रोलसह मिळणार भन्नाट फीचर्स!
1

हिरो एक्सट्रीम 160R 4V आणि एक्सट्रीम 250R लाँच; क्रूझ कंट्रोलसह मिळणार भन्नाट फीचर्स!

नवी रेनॉल्ट डस्टर हायब्रिड लॉन्च! तब्बल २९ किमी मायलेजसह किंमत १६.९९ लाखांपासून सुरू
2

नवी रेनॉल्ट डस्टर हायब्रिड लॉन्च! तब्बल २९ किमी मायलेजसह किंमत १६.९९ लाखांपासून सुरू

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!
3

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती
4

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.