'हा' शेअर एकाच दिवसात 17 हजाराने घसरला; गुंतवणूकदारांना मोठा धक्का, याआधी सलग अप्पर सर्किट!
स्मॉल कॅप एनबीएफसी एल्सिड इन्वेस्टमेंट्सचे शेअर्स आजकाल चर्चेत आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये होणारी झपाट्याने वाढ सोमवारी (ता.११) थांबली आणि ती 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटवर गेली. आजच्या व्यवहारादरम्यान कंपनीचे शेअर्स 313949.70 रुपयांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचले होते. याआधी गेल्या शुक्रवारी (ता.८) शेअर्सला अप्पर सर्किट लागले आणि तो 330473.35 रुपयांवर बंद झाला आहे.
एका दिवसात 16,523.65 रुपयांची घसरण
आज एका दिवसात 16,523.65 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. या आठवड्यात कंपनीच्या बोर्ड मेंबरची बैठक होणार आहे. यामध्ये जुलै-सप्टेंबर 2024 त्रैमासिक निकालांचा विचार करून त्याला मान्यता दिली जाईल. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे.
(फोटो सौजन्य – iStock)
हा शेअर्स 29 ऑक्टोबरपासून सतत वाढत आहे. गेल्या आठवड्यात सलग चार दिवस देखील शेअर्सला अप्पर सर्किट होते. या काळात या शेअरमध्ये सुमारे एक लाख रुपयांची वाढ झाली होती. हा भारतातील सर्वात महागडा शेअर्स बनला आहे. यापुढे एमआरएफ लिमिटेडचा शेअर्स आता खूपच मागे पडला आहे. एमआरएफचे शेअर्स आज 1,22,550 रुपये किमतीला विकले जात आहेत.
कंपनीने दिला 25 रुपये लाभांश
अल्साइड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे शेअर्स 29 ऑक्टोबरलाच 2,36,250 रुपयांवर पोहोचले होते. शेअरची लिस्टिंग किंमत 2,25,000 रुपये होती. स्पेशल कॉल लिलावापूर्वी शेअर्स 21 जून 2024 रोजी बीएसईवर 3.53 रुपयांवर बंद झाला होता. म्हणजेच या कालावधीत त्यात 94,16,329 टक्के वाढ झाली आहे. शेअर्सचा भागधारकांना नफा वितरीत करण्याचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड आहे. आर्थिक वर्ष 2024 साठी कंपनीने 25 रुपये लाभांश दिला आहे.
काय काम करते कंपनी?
एल्सिड इन्व्हेस्टमेंट ही आरबीआय अंतर्गत गुंतवणूक श्रेणीतील एक नोंदणीकृत गैर बॅकिंग वित्तपुरवठा कंपनी आहे. कंपनीच्या कमाईतील मुख्य स्त्रोत हा त्यांच्या होल्डिंग कंपन्यांकडून मिळणारा लाभांश आहे. एल्सिड इन्व्हेस्टमेंटने एशियन पेंट्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीकडे पेंट कंपनीत 8500 कोटी म्हणजे 2.95 टक्के वाटा आहे. कंपनीकडे 200,000 शेअर आहेत. त्यातील 150,000 शेअर प्रमोटरोकडे आहेत.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)