पैसे काढण्याची मर्यादा काय? वाचा सविस्तर बातमी एका क्लिकवर (फोटो सौजन्य-X)
EPFO ATM Card Marathi: जगभरातील नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे. EPFO ने आपल्या सदस्यांना आनंदाची बातमी देत नवीन वर्षात EPFO 3.0 लाँच करण्याची घोषणा केली होती. आता ही सेवा कधी सुरू होणार याचा खुलासा केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी केला आहे. याशिवाय एटीएममधून (ATM) ईपीएफओचे पैसे काढण्याची सुविधा एटीएम कार्ड केव्हा उपलब्ध होईल आणि किती मर्यादेपर्यंत योगदान काढता येईल याचीही माहिती समोर आली आहे.
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी मे-जूनपर्यंत EPFO ग्राहकांना EPFO मोबाइल ॲप आणि एटीएम कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. सध्या EPFO 2.0 वर काम सुरू आहे आणि संपूर्ण IT प्रणाली पूर्णपणे अपग्रेड केली जात आहे, हे काम जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण होईल.
EPFO च्या मोबाईल ॲप लाँच करण्याबाबत केंद्रीय मंत्री म्हणाले की, IT सिस्टम अपग्रेडेशन नंतर EPFO 3.0 ॲप मे-जून पर्यंत लॉन्च केले जाईल. या ॲपद्वारे EPFO ग्राहकांना बँकिंग सेवांचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे यामुळे संपूर्ण यंत्रणा केंद्रीकृत होईल आणि क्लेम सेटलमेंटची प्रक्रियाही सुलभ होईल.
कामगार मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, EPFO 3.0 च्या बँकिंग सेवांसाठी रिझर्व्ह बँक आणि वित्त मंत्रालय यांच्यात चर्चा सुरू आहे. त्यानंतर लोकांना डेबिट कार्ड मिळेल आणि एटीएममधून पैसे काढता येतील. किती पैसे काढता येतील याविषयी बोलायचे झाले तर लोक एटीएम कार्डमधून संपूर्ण योगदान काढू शकतील असे नाही, तर त्यासाठी मर्यादा निश्चित केली जाईल. फरक एवढाच असेल की पैसे काढण्यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या परवानगीची गरज भासणार नाही. सरकारच्या या पावलाचा EPFO ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. कारण, आता त्यांना पैसे काढण्यासाठी ऑनलाइन फॉर्मची चिंता करावी लागणार नाही.