फोटो सौजन्य - Social Media
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी जागतिक बाजारातील कमकुवत स्थितीमुळे भारतीय शेअर बाजार शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. निफ्टी 50 निर्देशांक 108 अंकांनी घसरून 23,203 वर, तर बीएसई सेन्सेक्स 423 अंकांनी कमी होऊन 76,619 वर स्थिरावला. निफ्टी बँक निर्देशांक 722 अंकांनी घसरून 48,556 वर बंद झाला.
निफ्टी मिड-कॅप 100 आणि निफ्टी स्मॉल-कॅप 100 अनुक्रमे 0.23% आणि 0.16% ने वधारले. तेल आणि गॅस, रियल इस्टेट, मेटल्स आणि एफएमसीजी क्षेत्रांनी तेजी दाखवली, तर आयटी, बँकिंग आणि फायनान्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र, या प्रसंगी लहान आकाराच्या शेअरनी स्थिर कामगिरी दाखवली. त्यांच्या या कामगिरीला अनेक तज्ज्ञांनी प्रतिसाद दिला आहे. या प्रतिसादामुळे शेअर बाजारात जरा वेगळे वातावरण तयार झालेले आहे. बहुतेक गुंतवणूक दारांचे लक्ष काही या स्टॉककडे लागून आहे.
HDFC Securities चे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक नागराज शेट्टी म्हणाले, “निफ्टी सध्या कमकुवत दिसत असला तरी 23,400 च्या वर राहिल्यास नवीन खरेदी होण्याची शक्यता आहे. 23,100 हा निफ्टीसाठी महत्त्वाचा सपोर्ट स्तर ठरेल.” Bank Nifty संदर्भात असित सी मेहता यांचे AVP हृषिकेश येडवे यांनी सांगितले, “Bank Nifty 47,900 च्या सपोर्टसह 48,541 वर स्थिरावला आहे. 49,910 हा पुढील मोठा रेजिस्टन्स असेल.”
₹100 पेक्षा कमी किमतीचे स्टॉक्स यामध्ये सुचवण्यात आले आहेत. SS WealthStreet च्या सुगंधा सचदेवा, Hensex Securities चे महेश एम ओझा आणि Lakshmishree Investment and Securities चे अंशुल जैन यांनी सोमवारी खरेदीसाठी खालील स्टॉक्सची शिफारस केली आहे. तरीही यामध्ये गुंतवणूक स्वतःच्या जोखमीवर आणि योग्य संशोधन आणि मार्गदर्शन घेऊनच करावे अशी शिफारस आहे.
( टीप: वरील सर्व शेअर संबंधित सल्ले तज्ज्ञांचे वैयक्तिक मत आहेत. गुंतवणुकीपूर्वी आपल्या आर्थिक स्थितीचा विचार करा आणि प्रमाणित गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घ्या. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. )