चहावाल्याची भन्नाट आयडिया! थेट शेताच्या बांधावर चहा विक्री, रोज मिळते दोन हजार कपची ऑर्डर!
’कोई भी धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता’ हे वाक्य तुम्ही ऐकलेच असेल. मात्र, आता हेच वाक्य उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर भागात काहीसे तंतोतंत खरे ठरताना दिसत आहे. एका फोन कॉलवर थेट शेताच्या बांधावर चहा आणून देण्याचा भन्नाट व्यवसाय महादेव नाना माळी यांनी सुरु केला आहे. त्यांच्या या भन्नाट कल्पनेची अर्थात थेट चहा विक्रीची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा होत आहे.
शेतकऱ्यांना मिळतो थेट बांधावर चहा
आतापर्यंत आपण शहरी भागात पिझ्झा-बर्गर आणि थंड पेय या सारखे खाद्यपदार्थ फोन वरुन मागितले आहेत. ग्रामीण भागात ग्राहकांना अशी सुविधा मिळणे अशक्यप्राय असते. त्यातच ग्रामीण भागात शेतावर थेट चहा मिळणे म्हणजे दुरापास्तच असते. कधी कधी तर पाणी देखील उपस्थित नसते. मात्र, आता धाराशिवच्या तेर येथील महादेव नाना माळी या चहावाल्याने शेतकऱ्यांना थेट बांधावर चहा विक्रीची सोय उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे ते आपला चहा सुद्धा एकदम स्वस्त मिळतो. गरमा गरम चहा ग्राहकांना अवघ्या 5 रुपयांत मिळतो. त्यामुळे त्यांच्या या चहाची सध्या पंचक्रोशीत खूपच चर्चा होत आहे.
दिवसाकाठी दीड ते दोन हजार कपची ऑर्डर
महादेव नाना माळी हे 2004 पासून चहाचा व्यवसाय करतात. चहाच्या व्यावसायात नवल काय? असे कोणाला ही वाटू शकते. पण महादेव माळी यांनी हॉटेलात चहा विकणे ही संकल्पनाच बदलून टाकली आहे .तिसरी पास असलेले महादेव माळी दिवसाकाठी दीड ते दोन हजार कप चहा फक्त फोनवर ऑर्डर घेऊन विक्री करतात. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर चहा पोहचवतात. ऊन ,वारा, पाऊस असला तरी ऑर्डर आल्यावर कशाची ही पर्वा न करता शेताच्या बांधावर जाऊन शेतकरी,मजूर, कामगार यांच्यापर्यंत माळी चहा पोहचवण्याचे काम करतात.
हेही वाचा : मुकेश अंबानींच्या अँटिलिया हाऊसमध्ये नोकरांना किती मिळतो पगार? …मोजता-मोजता थकून जाल!
शेतकरी वर्गाचा चांगला प्रतिसाद
विशेष म्हणजे त्यांच्या या व्यवसायाला शेतकरी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेत मालक, शेतकरी, मजूर, कष्टकरी लोक काम करत असतात. या कष्टकऱ्यांचाच हा चहा आहे. त्याला खास चव आहे. माळी यांना दिवसातून चहासाठी 600 हून अधिक फोन येतात. सकाळी 8 वाजेपासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कमीत कमी दोन हजार कप चहाची विक्री होते. तेर गावापासून तीन किलोमीटरच्या परिसरात त्यांचा हा व्यवसाय चालतो.