(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सार्वजनिक गणेशमंडळांची मूर्ती आणण्याची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे घरांमध्ये गणेशाच्या आगमनाची तयारी जोरात सुरू आहे. मात्र, या वेळी महागाईमुळे गणेशोत्सवात खरेदीला ग्राहक कमी प्रमाणात येत असल्याने मार्केट दरवर्षी इतकं खुललेलं नाही. अशातच गणेशमूर्तीचे दर ४०० ते ५०० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाचा उत्साह काही प्रमाणात कमी झाला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गमेशमूर्तीच्या किमती कडाडणार आहेत. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती, डिझेलच्या वाढत्या किमती, जागोजागी असलेली पाणी टंचाई, पीओपीच्या दरवाढीचा परिणाम बाप्पाच्या मूर्तींवर होणार आहे. बाप्पाच्या मूर्तीसाठी येणारा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
त्यामुळे यंदा गणेशोत्सव साजरा करताना फक्त आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव सोहळा साजरा करायचा तर सामान्यांना अधिक खर्च करावा लागणार आहे. बाप्पाची मूर्ती घडवताना पीओपी बॅग, रंग, सजावटीचं साहित्य त्याचबरोबर कच्च्या मालासाठी वाहतूक खर्च यासगळ्याचा ताण मूर्तिकारावर पडत आहे. त्यामुळे मूर्तीच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही.
गणपतीच्या आगमनाची चाहूल लागल्यापासून बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी विविध प्रकारचं सामानतही उपलब्ध आहे. कापडी मखरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या सुगंधी अगरबत्ती देखील बाजारात आले आहेत. पण या सगळ्याचे दर पाहता मोठ्या प्रमाणावर सामान्यांना महागाईचा फटका बसणार असून सणाचा उत्साह वाढण्यापेक्षा कमी होणार का असा प्रश्न पडला आहे.






