पंढरपूर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये द्राक्ष छाटणीला जोर धरला होता. तयार झालेले पीक शेतातून सुरक्षित घरी आणण्यासाठी शेतकरी रात्रदिवस मेहनत घेत असताना अचानक कोसळलेल्या या अवकाळी पावसाने त्यांच्या कष्टावर पाणी फिरले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तलवारीने सुरू केलेली लढाई लेखणीने संपविली. शरद जोशी यांनी अडीच लाख रुपये पगाराची नोकरी सोडून आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढा दिला. पण या सरकारने शेतकऱ्यांना भगवा, हिरवा आणि निळ्या…
गेल्या वर्षी साखरेचे उत्पादन कमी झाल्यामुळे सभासदांना दर वर्षी मिळणारी 50 किलो साखर देता आली नाही. मात्र, यंदा हंगाम सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम सभासदांना साखर देण्यात येईल.
वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील जसापूर गावात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांने तब्बल दीडशे संत्रा झाडे तोडून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
विधानसभा निवडणूक प्रचारात महायुतीने अनेक आश्वासने दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचंही आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र सत्ता आल्यानंतरही अद्याप कर्जमाफी करण्यात आलेली नाही.
मागील आठवड्यात पेरणी केलेली पिके सध्या उगवण होऊन जोमात येऊ लागली आहेत. मात्र, उगवलेल्या पिकांमध्ये पाणी साचल्याने पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरही अजित पवार यांनी भाष्य केले. राज्यातील विविध पक्षांचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. महाराष्ट्राची अशी संस्कृती राहिली आहे, असे ते म्हणाले.
तालुक्यात अवकाळी बेसुमार पाऊस पडला आहे. मे महिन्यात शेतात सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेताची नांगरट करून आडसाली ऊस लागण्यासाठी सऱ्या सोडल्या. त्या पावसाने सपाट झाल्या आहेत.
शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे दाखवणारे महाराष्ट्र शासन प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभयंदाच्या खरीप हंगामात देताना दिसत नाही. कारण गेल्या महिन्याभरापासून कृषी विभाग, महाडीबीटीचे संकेतस्थळ बंद आहे.
राष्ट्रवादीचे नेते व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सातत्याने वादग्रस्त विधान करत असल्यामुळे पक्षाच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. त्यांना अजित पवार यांनी समज दिली आहे.
लातूर व परभणी जिल्ह्यामंध्ये झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात ४३ जणांचे वीज पडून मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात २०२२ मध्ये २५ जणांचा, २०२३ मध्ये ८ तर २०२४ मध्ये १० जणांचा वीज…
माझ्यावर 263 गुन्हे दाखल आहेत. हे सगळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील आहेत. काही गुन्हे तर असे की आम्ही आंदोलनस्थळी आहोत हे गृहीत धरून दाखल केले गेले.
पीएम किसानच्या लाभार्थीपैकी 87 हजार शेतकऱ्यांनी अद्यापही ॲग्रिस्टॅक नोंदणी केलेली नाही. उर्वरित शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी न केल्यास त्यांना पीएम किसान योजनेचा व कृषी विभागाच्या इतर योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येईल.
पोपट एकतपुरे यांनी केळीच्या पिकांसाठी उसाचे बग्यास आणले होते. सदर बागेस रात्री पेटवून दिले. नंदकुमार कापसे यांच्या शेतातील मकवानाची गंज रात्री पेटवून दिली. जगन्नाथ शिंदे यांच्या शेतातील ऊस पेटवून दिला.
खुलताबाद तालुक्यात गहू व कांदा पिकाचे सुमारे ३८५ हेक्टरवर तर कन्नड तालुक्यातील १४ गावात ६६ शेतकऱ्यांच्या गहू, बाजरी, मका, केळी कांदा आदी पिकांचे ३०३.८ हेक्टरवर तसेच सोयगाव तालुक्यातील तीन गावात…
ग्राहकासाठी आम्ही हे धोरण राबवत आहोत असे सांगणाऱ्या सरकारचे पितळ उघडे पडले आहे. कारण शहरी ग्राहकांना हा सर्व माल अव्वाच्या सव्वा किंमतीत घ्यायला लागत आहे.
जत बाजार आवारात दर रविवारी बेदाण्याचे सौदे सुरू राहणार आहेत. बेदाणा खरेदी-विक्री धारकांची उलाढाल, आवक वाढल्यास दर गुरुवारी बेदाणे सौदे काढण्याचा विचार सुरू आहे.
शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषि इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करुन घेण्यात सुलभता येईल.