FatakPay Ugro Capital Partnership : कोणत्याही तारणाशिवाय त्वरित मिळणार कर्ज! फटाकपे आणि यूग्रो कॅपिटलची नवी भागीदारी; असा मिळवा लाभ

FatakPay Ugro Capital Partnership : औपचारिक कर्ज सुविधांपासून वंचित राहिलेल्या ग्राहकांपर्यंत सुलभ आर्थिक सेवा पोहोचवण्यासाठी फिनटेक कंपनी 'फटाकपे'ने 'यूग्रो कॅपिटल'सोबत सह-कर्ज भागीदारी जाहीर केली आहे.
Photo - Social Media
FatakPay Ugro Capital Partnership :FatakPay Ugro Capital Partnership :
Published on: 
Updated on: 
  • कर्ज घेणे होणार अधिक सोपे अन् जलद!

  • फटाकपे व यूग्रो कॅपिटल एकत्र

  • पगारदार आणि स्वयंरोजगारांना मोठा दिलासा

FatakPay Ugro Capital Partnership : मुंबईस्थित वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यासपीठ असलेल्या 'फटाकपे'ने आज 'यूग्रो कॅपिटल'सोबत सह-कर्ज भागीदारीची घोषणा केली. भारतातील ज्या व्यक्ती आणि क्षेत्रांपर्यंत अद्याप औपचारिक वित्तीय सेवांची पुरेशी पोहोच झालेली नाही, त्यांच्यापर्यंत या सेवा पोहोचवणे हे फटाकपेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तर, यूग्रो कॅपिटल हे डेटा-टेक आधारित कर्ज व्यासपीठ असून, आपल्या विशेष डेटा-आधारित कर्ज मूल्यांकन पद्धती आणि व्यापक वितरण नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील लघु व्यवसायांच्या कर्जविषयक गरजा पूर्ण करण्याचे काम करते. या भागीदारीचा उद्देश फटाकपेची डिजिटल कर्ज परिसंस्था आणि यूग्रो कॅपिटलचे कर्ज व मूल्यांकन क्षेत्रातील कौशल्य एकत्र आणून औपचारिक कर्ज सुविधांची उपलब्धता वाढवणे हा आहे.

Photo - Social Media
LinkedIn Study Entrepreneurship : स्टार्टअप आणि बिझनेसचा क्रेझ! 85% व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचाय; लिंक्डइनचा सर्वे काय सांगतो?

या सहकार्याच्या माध्यमातून, फटाकपेची बिगर बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) असलेली एफडीपीएल फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड आणि यूग्रो कॅपिटल एका संरचित सह-कर्ज व्यवस्थेअंतर्गत पगारदार तसेच स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींसह सर्व पात्र ग्राहकांना त्वरित वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देतील.

फटाकपेची डिजिटल कर्ज वितरण क्षमता आणि व्यापक ग्राहक पोहोच यांना यूग्रो कॅपिटलची भक्कम आर्थिक क्षमता तसेच आकडेवारीवर आधारित कर्ज मूल्यांकन प्रणाली यांची जोड देऊन, कर्ज घेण्याची प्रक्रिया अधिक जलद, सोपी आणि किफायतशीर करण्याचे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे. विशेषतः पारंपरिक कर्ज माध्यमांद्वारे सहजपणे कर्ज उपलब्ध न होणाऱ्या ग्राहकांना याचा लाभ मिळेल.

भागीदारीअंतर्गत या गोष्टींचा समावेश

- फटाकपे आपल्या तंत्रज्ञान व्यासपीठाचा आणि व्यापक ग्राहक पोहोचचा उपयोग करून ग्राहकांची निवड, डिजिटल नोंदणी आणि कर्जाशी संबंधित सेवांची जबाबदारी सांभाळेल. यामुळे ग्राहकांना सुलभपणे कर्ज उपलब्ध होण्यास मदत होईल.

- यूग्रो कॅपिटल सह-कर्ज व्यवस्थेअंतर्गत कर्ज पात्रता निश्चित करणे, जोखीम मूल्यांकन आणि कर्ज वितरण यामधील आपल्या विशेष कौशल्याचे योगदान देईल.

- दोन्ही संस्था संयुक्तपणे कर्ज पोर्टफोलिओसाठी निधी उपलब्ध करून देणे आणि त्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी पार पाडतील. संपूर्ण भारतातील ग्राहकांना जबाबदार कर्ज सुविधा अधिक सुलभतेने उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे.

- या भागीदारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणत्याही तारणाशिवाय त्वरित वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच, भविष्यात अधिक रकमेच्या वैयक्तिक कर्जांच्या क्षेत्रात या सहकार्याचा विस्तार करण्याच्या संधींचाही शोध घेतला जाईल.

भागीदारीविषयी बोलताना, फटाकपेचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अमित गोयल म्हणाले, "फटाकपे येथे तंत्रज्ञान आणि ग्राहककेंद्रित सेवांच्या माध्यमातून औपचारिक वित्तीय उपाययोजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यावर आमचा भर आहे. यूग्रो कॅपिटलसोबतची ही भागीदारी आमची कर्ज वितरण क्षमता अधिक मजबूत करण्याच्या आणि अधिकाधिक ग्राहकांपर्यंत जबाबदार कर्ज सुविधा पोहोचवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आमचे डिजिटल व्यासपीठ आणि यूग्रो कॅपिटलचे सिद्ध झालेले कर्ज मूल्यांकन कौशल्य एकत्र आणून, ग्राहकांना अधिक जलद, सोपी आणि किफायतशीर कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे तसेच देशभरातील ग्राहकांच्या बदलत्या वित्तीय गरजा पूर्ण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे."

यूग्रो कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज पांडेय म्हणाले, "फटाकपेच्या सहकार्याने करण्यात आलेली ही भागीदारी आकडेवारी आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतातील ज्या कर्जदारांपर्यंत पुरेशा कर्ज सुविधा पोहोचलेल्या नाहीत, त्यांच्यातील कर्जाची तफावत दूर करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. जबाबदारीने कर्ज व्यवसायाचा विस्तार करण्यामध्ये सह-कर्ज व्यवस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. या सहकार्याच्या माध्यमातून फटाकपेची डिजिटल पोहोच आणि आमच्या डेटा-टेक आधारित कर्ज मूल्यांकन कौशल्याचा उपयोग करून उद्योजकांपर्यंत पोहोचणे आणि औपचारिक कर्ज सुविधांची उपलब्धता अधिक मजबूत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून आणि विस्तारक्षम अशी कर्ज भागीदारी उभारण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करण्यास उत्सुक आहोत."

ही भागीदारी धोरणात्मक सहकार्याच्या माध्यमातून व्यापक डिजिटल वित्तीय परिसंस्था उभारण्याच्या फटाकपेच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तसेच, अधिकाधिक ग्राहकांना औपचारिक कर्ज व्यवस्थेशी आत्मविश्वासाने जोडण्याची संधी उपलब्ध करून देत, वित्तीय समावेशनाच्या व्यापक राष्ट्रीय उद्दिष्टालाही ही भागीदारी पाठबळ देईल.

Photo - Social Media
NSE Global Ranking : सांगता काय? भारतीय शेअर बाजाराचा जागतिक डंका! NSE बनले जगातील तिसरे सर्वात मोठे एक्सचेंज