
nimala sitharaman and gautam adani
मुंबई: हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टमुळे अदानी ग्रुपचं खूप नुकसान होत आहे. या रिपोर्टमुळे गेल्या 7 दिवसांत कंपनीचं 10 लाख कोटींहून अधिक नुकसान झाल्याची माहिती आहे. अदानींच्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या भारतीय बँका (SBI) आणि एलआयसीलादेखील (LIC) याचा फटका बसला आहे. गुंतवणुकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या विषयावरून संसदेतही गदारोळ झाला. आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अदानी प्रकरणात पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. (Adani-Hindenburg Saga)
LIC आणि SBI च्या गुंतवणुकीबाबत सोडलं मौन
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, भारतीय बँकींग सिस्टीम चांगल्या स्थितीमध्ये आहे. लोकांनी घाबरण्याची गरज नाही. एसबीआय आणि एलआयसी दोन्हीची अदानी समूहातील गुंतवणूक मर्यादेच्या आत आहे. बँक आणि एलआयसी दोन्ही नफ्यामध्ये आहे. गुंतवणूकदारांनी चिंता करण्याची गरज नाही. एसबीआय आणि एलआयसी या दोघांनीही या प्रकरणी संपूर्ण माहितीसह आपली भूमिका मांडली आहे. दोघांनीही सांगितले आहे की, ग्रुपमध्ये त्यांचा एक्सपोजर विहित मर्यादेच्या आत आहे.
अर्थमंत्र्यांनी बाजार नियंत्रकांबाबत विश्वास व्यक्त केला आणि सांगितले की त्यांनी बाजाराला चांगल्या स्थितीत ठेवले आहे. त्या म्हणाल्या की, आज भारतीय बँकिंग व्यवस्था भक्कम स्थितीत आहे. बँका बाजारातून पैसा उभा करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. बँकांमध्ये जोखीम असती तर ते बाजारातून पैसे उभे करण्याच्या स्थितीत नसते. अदानी समुहाच्या व्हॅल्यूएशनमध्ये घसरण झाल्यानंतरही त्या प्रॉफिटमध्ये आहेत. भारतीय बँकींग सिस्टीमने एनपीएवरचा भार कमी केला आहे. एनपीए आणि वसूलीची स्थिती चांगली आहे.
शेअर मार्केटमध्ये नक्की काय घडलं ?
अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्ग रिसर्च यांच्या रिपोर्टनं गौतम अदानी यांचं साम्राज्यचं पूर्णपणे हादरलेलं आहे. अदानी ग्रुपच्या कंपनीचे शेअर्स विकण्यासाठी बाजारात मोठी घाई सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अदानी ग्रुपचे जास्तीचे शेअर्स हे लोअर सर्किटवर आहेत. अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन पॉ़वर, अदानी पॉवर, अदानी विल्मर आणि एनडीटीव्ही हे सगळे शेअर्स लोअर सर्किटमध्ये पाहायला मिळतायेत. अदानी एंटरप्रायजेसचा शेअर 1178 पर्यंत पोहचला आहे. शेअर्समध्ये 25 टक्क्यांनी घसरण झाली आहे.