Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात BrightNight 115 मेगावॅट हायब्रीड रिन्यूएबल एनर्जी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ

पुढील पिढीतील जागतिक नवीकरणीय ऊर्जा उत्पादक कंपनी, ब्राइटनाईटने भारतातील त्यांच्या पहिल्या 115 मेगावॅट हायब्रिड नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प "ऑप्टिमा महाराष्ट्र" चा पहिला टप्पा सुरू करण्याची अभिमानाने घोषणा केली.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 14, 2025 | 06:01 PM
महाराष्ट्रात BrightNight 115 मेगावॅट हायब्रीड नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ

महाराष्ट्रात BrightNight 115 मेगावॅट हायब्रीड नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ

Follow Us
Close
Follow Us:

“ऑप्टिमा महाराष्ट्र” हा प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील पहिला एकत्रित पवन-सौर प्रकल्पांपैकी एक महत्त्वाचा प्रकल्प असून, ब्राइटनाईटने भारतीय पॉवर ग्रीडमध्ये पहिल्यांदाच ऊर्जा पुरवठा केला आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा डिकर्बोनायझेशनच्या त्यांच्या उद्दिष्टाला प्रोत्साहन मिळाले आहे.

दक्षिण महाराष्ट्रातील धाराशिव येथे रणनीतिकदृष्ट्या स्थित आणि सुमारे 500 एकर क्षेत्रफळात पसरलेल्या ऑप्टिमा महाराष्ट्र प्रकल्पाने ब्राइटनाईटच्या मालकीच्या एआय-सक्षम पॉवरअल्फा® प्लॅटफॉर्म द्वारे संचालित प्रगत पवन आणि सौर तंत्रज्ञान एकत्रित केले आहे, जो कमीतकमी पर्यावरणीय प्रभावासह जास्तीत जास्त वीजनिर्मिती सुनिश्चित करतो.

Share Market : शेअर मार्केटने बनवलं कंगाल; गुंतवणूकदारांच्या तब्बल ६० लाख कोटी रुपयांचा चुराडा

भारताच्या स्वच्छ ऊर्जा भविष्यासाठी एक महत्वाचा टप्पा

2030 पर्यंत ऑप्टिमा महाराष्ट्र प्रकल्प राज्याच्या ऊर्जा गरजांपैकी 40% ऊर्जा नवीकरणीय स्रोतांमधून मिळवण्याच्या उद्दिष्टासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल. हा प्रकल्प दरवर्षी सुमारे 2,30,000 घरांना वीज पुरवण्यासाठी पुरेशी स्वच्छ ऊर्जा निर्माण करेल आणि 2,25,000 टन कार्बन उत्सर्जन रोखेल.

ब्राइटनाईटचे सीईओ मार्टिन हरमन यांनी सांगितले, “हा प्रकल्प ब्राइटनाईटच्या आशिया-पॅसिफिक प्रदेशातील कार्यप्रणालीच्या अधिकृत सुरुवातीचा आणि एक स्वच्छ, अधिक शाश्वत भविष्य निर्माण करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाचा प्रारंभ दर्शवतो. आम्हाला खात्री आहे की ऑप्टिमा महाराष्ट्र राज्याच्या स्वच्छ ऊर्जा उद्दिष्टांना पुढे नेण्यास मदत करेल आणि भारताच्या व्यापक नेट झिरो मिशनला पाठिंबा देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल,” असे त्यांनी पुढे नमूद केले.

भारतातील पर्यावरणीय गुंतवणूक आणि विस्ताराला गती देणे

जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणाऱ्या नवीकरणीय ऊर्जा बाजारांपैकी एक असलेल्या भारताला, ब्राइटनाईटच्या आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील विस्ताराचे मुख्य आधारस्तंभ मानले जाते. 2019 मध्ये यूएस मार्केटमध्ये प्रवेश केल्यानंतर, भारत हा ब्राइटनाईटचा दुसरा प्रमुख जागतिक बाजारपेठ बनला. भारतामध्ये ब्राइटनाईटच्या गिगावॅट-स्केल नवीकरणीय ऊर्जा पोर्टफोलिओच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी, आयालाग्रुपचा भाग असलेल्या फिलीपिन्स-आधारित एसीएन कॉर्पोरेशनने 2023 मध्ये ब्राइटनाईट इंडिया मध्ये 250 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे वचन दिले.

Budget 2025: देशातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकार EPFO मधील किमान पेन्शन वाढवण्याच्या तयारीत?

ब्राइटनाईटने अलीकडे भारतातील सर्वात मोठ्या वीज उपक्रम, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडसोबत हायब्रिड पवन-सौर ऊर्जा पुरवठा करण्यासाठी पॉवर पर्चेस अ‍ॅग्रीमेंटवर (पीपीए) स्वाक्षरी केली आहे आणि एनटीपीसी आणि एनएचपीसी कडून स्थिर आणि डिस्पॅचेबल नवीकरणीय ऊर्जा पुरवठ्यासाठी मोठे टेंडर मिळवले आहेत.

प्रादेशिक आर्थिक विकास आणि शाश्वततेला चालना

जीवाश्म इंधनापासून दूर भारताच्या संक्रमणास पाठिंबा देण्याबरोबरच, ऑप्टिमा महाराष्ट्र प्रकल्प विकासाच्या टप्प्यात सुमारे 300 रोजगार निर्माण करेल आणि नवीकरणीय ऊर्जा उद्योगाच्या वृद्धीमध्ये योगदान देईल अशी अपेक्षा आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या उपायांचे मिश्रण लागू करून, ऑप्टिमा महाराष्ट्र राज्याच्या विशेष ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी अनुकूल आणि जटिल ऊर्जा उपाय प्रदान करेल.

ब्राइटनाईट इंडिया चे सीईओ, नवीन खंडेलवाल म्हणाले, “हा प्रकल्प ब्राइटनाईट इंडिया मधील अनेक प्रकल्पांपैकी पहिला प्रकल्प आहे आणि भविष्यातील विकासासाठी एक आराखडा तयार करतो, जे वेगवान आणि खोल डिकर्बोनायझेशनला चालना देतील.”

आगामी काळात, ब्राइटनाईट राजस्थानमधील दोन मोठ्या प्रकल्पांचे बांधकाम सुरू करण्याची तयारी करत आहे, जे राष्ट्रीय ग्रीडशी जोडलेल्या उपभोक्त्यांना जास्तीत जास्त वीज पुरवठा करण्यासाठी पवन, सौर आणि बॅटरी ऊर्जा संचयन प्रणालीसह विविध प्रकारच्या स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान एकत्र करेल. याशिवाय, ब्राइटनाईट गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटका आणि राजस्थान यासह अनेक राज्यांमध्ये विविध हायब्रिड प्रकल्प सक्रियपणे विकसित करत आहे.

Web Title: First phase of brightnight 115 mw hybrid renewable energy project launched in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 05:51 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.