Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एनएआर इंडिया सदस्यांसाठी मोफत NEO प्रवेश! नवीन तयार झालेल्या इन्व्हेंटरीमध्ये थेट दृश्यता

एनएआर इंडिया आणि NEO यांच्यातील भागीदारीमुळे सर्व सदस्यांना अमेरिकेतील नव्या प्री-कन्स्ट्रक्शन इन्व्हेंटरीचा मोफत आणि थेट प्रवेश मिळणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 20, 2025 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • सर्व एनएआर इंडिया सदस्यांसाठी मोफत NEO प्रवेश
  • अमेरिकेतील नवीन तयार झालेल्या इन्व्हेंटरीमध्ये थेट दृश्यता
  • आंतरराष्ट्रीय व्यवसायास समर्थन देण्यासाठी प्रशिक्षण, वेबिनार आणि बहुभाषिक साधने
एनएआर एनएक्सटी ह्यूस्टन या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संमेलनादरम्यान नेशनल असोसिएशन ऑफ रियाल्टर्स (NAR India) ने अमेरिकेतील प्री-कन्स्ट्रक्शन आणि अंडर-कन्स्ट्रक्शन रिअल इस्टेट प्रकल्पांसाठी अग्रगण्य असलेल्या NEO या प्लॅटफॉर्मसोबत ऐतिहासिक भागीदारी केली आहे. NEO चे संस्थापक आणि CEO क्रिश्चियन कैलुसा आणि एनएआर इंडिया चे वाईस चेअरमन तरुण भाटिया यांनी या करारावर हस्ताक्षर करताना हातमिळवणी केली. अमेरिकन रिअल इस्टेट बाजारात नव्या बांधकामांच्या घरांची मागणी मोठ्या प्रमाणात असून, अमेरिकेतील एकूण निवासविक्रीपैकी तब्बल 33 टक्के विक्री ही अशा नव्या घरांची असते. त्यामुळे ही भागीदारी भारतीय रियाल्टर्ससाठी एक मोठी संधी निर्माण करणारी ठरत आहे. NEO हा असा प्लॅटफॉर्म आहे जो डेव्हलपर्स आणि रियाल्टर्स यांना थेट जोडून प्रकल्पांची अपडेटेड माहिती, मोकळे नेव्हिगेशन आणि सोप्या व्हिज्युअल स्वरूपात माहिती उपलब्ध करून देतो. त्यामुळे भारतातील रिअल इस्टेट व्यावसायिकांना आता संपूर्ण अमेरिकेतील नव्या इन्व्हेंटरीची बहुभाषिक स्वरूपातील माहिती त्यांच्या स्वतःच्या वेबसाइटवर प्रदर्शित करता येणार आहे. यामुळे ग्राहकांशी संवाद अधिक प्रभावी होणार असून, गुंतवणूक आणि खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या भारतीय डायस्पोरा ग्राहकांसाठीही हा लाभ उपयुक्त ठरेल.

आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा

२०१२ मध्ये मियामी असोसिएशनसोबत लाँच झाल्यानंतर NEO ने फ्लोरिडा आणि टेक्सासमध्ये आपले स्थान निर्माण केले असून आता ते संपूर्ण अमेरिकेत विस्तारत आहे. REACH प्रोग्राम अंतर्गत दोनदा मान्यता मिळाल्यामुळे या प्लॅटफॉर्मची विश्वसनीयता अधिक वाढली आहे. सध्या जगभरातील ३० हून अधिक रिअल्टर्स असोसिएशन्स NEO वापरत असून आता एनएआर इंडिया या क्रमिक विस्ताराचा महत्त्वाचा भाग बनला आहे. विशेष म्हणजे एनएआर इंडिया च्या सर्व सदस्यांना NEO चा वार्षिक 120 डॉलर्स इतक्या किमतीचा प्रवेश पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा लाभ सदस्यांना अमेरिकन रिअल इस्टेट आणि नव्या बांधकाम विक्रीबाबत वेबिनार, सविस्तर अहवाल, ट्रेनिंग आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संबंध निर्माण करण्याच्या संधींसह दिला जाणार आहे. NEO मध्ये हिंदीसह अनेक भारतीय भाषा जोडल्याने भारतीय रियाल्टर्सना अमेरिकन बाजारपेठ समजणे आणि आपल्या ग्राहकांशी संवाद साधणे अधिक सोपे होणार आहे.

Tech Tips: नवऱ्यापासून लपवायची आहे तुमची शॉपिंग पेमेंट हिस्ट्री? Paytm वर असं वापरा ‘हाइड पेमेंट्स’ फीचर

या भागीदारीबाबत बोलताना एनएआर इंडिया चे चेअरमन सुमंथ रेड्डी म्हणाले की, NEO भारतीय सदस्यांसाठी अमेरिकेच्या विशाल रिअल इस्टेट मार्केटकडे जाणारा थेट मार्ग उघडतो. तर वाईस चेअरमन तरुण भाटिया यांनी सांगितले की, भारतीय रियाल्टर्सना अमेरिकन डेव्हलपर्सशी प्रभावीपणे जोडणारा हा एक संरचित आणि डेटा-ड्रिव्हन प्लॅटफॉर्म आहे. अध्यक्ष अमित चोपडा यांनीही सर्व सदस्यांना जागतिक संधींपर्यंत समान प्रवेश मिळावा हा NAR India चा प्रयत्न असल्याचे सांगितले. जागतिक स्तरावरील वाढत्या मागणीच्या काळात ही भागीदारी भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रासाठी एक नवा अध्याय ठरणार असून, एनएआर इंडिया सदस्यांना आंतरराष्ट्रीय अनुभव, प्रशिक्षण आणि नवीन व्यावसायिक नेटवर्किंगचा लाभ मिळवण्याची संधी यातून उपलब्ध होणार आहे. म्हणूनच संस्थेने सर्व सदस्यांना NEO चा सक्रीय वापर करून ही सुवर्णसंधी साधण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Free neo access for nar india members

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 04:15 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.